-
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (इ.स. 1857 ते 1950)
Rs.295.00स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना आपलाही काहीतरी खारीचा वाटा असावा म्हणून प्रस्तुत ग्रंथलेखनाचे प्रयोजन केले. आधुनिक भारताच्या इतिहासातील विविध घडामोडींची माहिती या ग्रंथातून होणार आहे. या ग्रंथाची मांडणी अगदी सोप्या, सुटसुटीत भाषेत, मुद्देसूद केलेली आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्ये म्हणजे विद्यार्थी, वाचकांना समजण्यास सोपे जावे म्हणून प्रत्येक ठिकाणी चौकटींची रचना करून त्यात मुद्दे दिले आहेत. चित्रांचा वापर केलेला आहे. प्रस्तुत ग्रंथात भारतात ब्रिटिशांच्या आगमनापासून तर त्यांच्या सत्तास्थापनेपर्यंतचा, 1857 चा उठाव, कारणे आणि परिणाम, भारतातील सामाजिक, धार्मिक, सुधारकांचे कार्य, काँग्रेसची स्थापना, मवाळ-युग, टिळक युग, गांधी युग, भारतातील क्रांतीकारक, मुस्लिम लिग व भारताची फाळणी आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांनी पाठविलेल्या विविध समित्या, यांची माहिती देण्यात आली आहे. शिवाय भारताची फाळणी आणि स्वातंत्र्याचा कायदा, भारतीय राज्यघटनेची निर्मिती व वैशिष्ट्यांचीही माहिती आलेली आहे. एकूणच भारतात ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेपासून तर 15 ऑगस्ट 1947 पर्यंत स्वातंत्र्य मिळून 1950 मध्ये घटना लागू होऊन भारत लोकशाहीप्रधान देश बनण्यापर्यंतची ऐतिहासिक माहिती म्हणजे हा ग्रंथ!
Bharatiy Swatantrya Chalwalicha Itihas (1857-1950)
-
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (इ.स.1857 ते इ.स.1950)
Rs.365.00भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. अशाप्रसंगी भारताला स्वातंत्र्य कसे मिळाले याचा वेध घेणे आवश्यक ठरते. इ.स.1757 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने प्लासीचे युद्ध करून बंगालमध्ये प्रथमच कंपनीची सत्ता स्थापन केली. बक्सारच्या युद्धाने त्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना होवून तिने ब्रिटीशाविरूद्ध सनदशीर मार्गाने चळवळ सुरू केली. 1905 पर्यंत हे ठीक होते. पण त्यानंतर जहाल मतवाद भारतात निर्माण झाला. चतुःसूत्रीचा स्वीकार करावा असा गजर जहालवाद्यांनी सुरू केला. त्यातून सुरत येथे काँग्रेस फुटली. 1916 मध्ये लखनौच्या अधिवेशनात मवाळ आणि जहाल एकत्र आले. 1920 मध्ये म.गांधीजी युगाला प्रारंभ झाला. अहिंसा, सत्याग्रहाचे पर्व सुरू झाले. असहकार, कायदेभंगाचे युग अवतरले. अनेकांना फासावर लटकावले. कारण त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला. म.गांधीजींना तो मार्ग पसंत नव्हता. 1942 मध्ये दुसरे महायुद्ध चालु असतांना म.गांधीजी यांनी चलेजाव आंदोलनाची घोषणा केली तर तिकडे जपानचे सहाय्य घेवून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना करून जय हिंदची घोषणा केली. अशा अनेक घटना हिंदुस्थानात घडल्या. त्यातून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्य लढ्याची कहानी म्हणजे हा ग्रंथ होय.
Bharatiya Swatantrya Chalwalicha Itihas (1857-1950)