-
भारतीय सेनादलांच्या विद्यमान घडामोडी
Rs.170.00आजच्या काळात भारत आणि जगातील अनेक देशांच्या लष्करी पद्धतींमध्ये ग्रीक-रोमन युद्धपद्धतीचा प्रभाव आहे. एकविसाव्या शतकात युद्धतंत्रात माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विविध आधुनिक शस्त्रे यांचा समावेश झाला आहे, ज्यामुळे भारतीय सेनादलांच्या घडामोडींचा अभ्यास महत्त्वाचा आहे.
प्राचीन भारतात संरक्षण आणि युद्धकला प्रगल्भ होती. रामायण, महाभारत आणि कौटिल्याचे अर्थशास्त्र यामध्ये याबाबतच्या महत्त्वाच्या विचारांची माहिती आहे. दुर्दैवाने, भूतकाळातील या ज्ञानाकडे दुर्लक्ष केल्यामुळे भारताला अनेक वेळा पराभव भोगावे लागले.
समरांगण सूत्रधारासारख्या ग्रंथांमधून प्राचीन भारतीय सैन्याची रचना, युद्धकलेची तत्त्वे आणि तंत्रज्ञान समजून घेता येते. भारताच्या संरक्षण यंत्रणेची रचना सरंजामशाहीवर आधारित होती, ज्यामुळे समाजातील इतर घटक संरक्षण कार्यात कमी सहभागी झाले.
भारतीय सेनादलांच्या विद्यमान घडामोडी या पुस्तकात विद्यार्थ्यांना सेनादलांच्या नावीन्यपूर्ण बाबी, भारतीय लष्करी दलांशी संबंधित वस्तुस्थिती आणि तथ्ये, आधुनिक युद्धाच्या आवश्यकतेनुसार होणारे बदलही याविषयी माहिती तसेच राष्ट्रप्रेमाचे कर्तव्य लक्षात घेऊन, राष्ट्ररक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि तरुणांना सेनादलांमध्ये सामील होण्यास प्रवृत्त करणे आवश्यक आहे. -
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (1885 ते 1947)
Rs.225.001885 मध्ये हिंदुस्थानात राष्ट्रीय सभेची स्थापना झाली आणि सनदशीर मार्गाने पुण्याऐवजी मुंबई येथे राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरुन राष्ट्रीय चळवळीला प्रारंभ झाला. 1905 पर्यंत राष्ट्रीय सभेने हा मार्ग स्वीकारला. त्याला मवाळांची चळवळ म्हणतात. परंतु 1905 नंतर लाल, बाल आणि पाल यांना हा मार्ग योग्य वाटला नाही. त्यांतून जहालांची चळवळ सुरु झाली. विसाव्या शतकाच्या प्रारंभी सशस्त्र क्रांतीकारकांचा उदय झाला. श्यामजी वर्मा, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर आणि गदर क्रांतीकारकांनी परदेशात राहून भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. लोकमान्य टिळकांच्या मृत्युनंतर गांधी युग अवतरले. याकाळात असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग चळवळ, वैयक्तिक सत्याग्रह आणि चले जाव आंदोलनासारख्या चळवळी निर्माण झाल्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची उभारणी करुन ब्रिटीश सत्तेला मोठे आव्हान दिले. यातून शेवटी ब्रिटीशांना फाळणी करुन हिंदुस्थान सोडावा लागला. हा सारा रोमहर्षक इतिहास या ग्रंथात ग्रथीत केला आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा हा इतिहास सर्वांना नक्कीच आवडेल.
Bhartiya Swantraya Chalvalicha Itihas (1885 Te 1947)