-
राजकीय पत्रकारिता
Rs.225.00आधुनिक काळात पत्रकारितेचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढलेले दिसून येते. पत्रकारितेचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाऊ लागले. पत्रकारितेला हे स्थान आपोआप मिळालेले नाही. लोकशाहीला विकसित करण्यात आणि मजबूती प्रदान करण्यात पत्रकारितेने बजावलेल्या भूमिकेवरून हे स्थान देण्यात आलेले आहे. प्रशासन आणि समाज, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून पत्रकारिता कार्य करत असते.
प्रस्तुत पुस्तकात राजकीय पत्रकारिता विषयाशी निगडित सर्व संकल्पनाचा आढावा घेऊन सविस्तर माहिती दिलेली आहे. आवश्यक तेथे उदाहरणाचा समावेश केलेला आहे. पुस्तकात एकूण सहा प्रकरणाचा समावेश आहे. प्रथम प्रकरणात पत्रकारितेची ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसर्या प्रकरणात जनसंचाराबाबत चर्चा केलेली आहे. तिसर्या प्रकरणात पत्रकारिता आणि जनसंचाराचे मूल्यमापन केलेले आहे. चौथ्या प्रकरणात राजकीय पत्रकारिताविषयीची सखोल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाचव्या प्रकरणात पत्रकारितेच्या पद्धतीबाबत सविस्तर चर्चा केलेली आहे. सहाव्या प्रकरणात राजकारण आणि माध्यमे यांच्या परस्परसंबंधाविषयीची माहिती दिलेली आहे. प्रस्तुत पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक वर्गांला अध्यापन करताना निश्चितच उपयुक्त ठरेल.Rajkiya Patrakarita
-