-
राजकीय समाजशास्त्राचा परिचय
Rs.395.00दुसर्या महायुद्धानंतर ‘राजकीय समाजशास्त्र’ हा विषय स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून उदयाला आलेला आला. राजकीय समाजशास्त्रात सामाजिक जीवनाचे राजकीय जीवनाशी होणार्या आंतरक्रियाचे विश्लेषण केले जाते. हे विश्लेषण विविध राजकीय आणि सामाजिक स्तरांचे पारस्परिक संबंध व प्रभावाच्या संदर्भात केले जाते. या अध्ययनातून सामाजिक आणि राजकीय यांच्यातील संबंधाची नव्या दृष्टिकोनातून मांडणी केली जाते. राजकीय समाजशास्त्रात राजकीय सामाजिक संरचना, समूह, राजकीय संस्था, संबंध आणि व्यवहाराचे अध्ययन केले जाते. तसेच राजकीय समूहावर पडणार्या सामाजिक प्रभावाचाही अभ्यास केला जातो.
प्रस्तुत पुस्तकात राजकीय समाजशास्त्र विषयाशी निगडित सर्व संकल्पनांची माहिती विविध उदाहरणे आणि आकृत्यांसह दिलेली आहे. तसेच राजकीय समाजशास्त्राचा परिचय, राजकीय व्यवस्था, राजकीय संस्कृती, राजकीय सामाजीकरण, राजकीय सहभाग, राजकीय श्रेष्ठजन, राजकीय नेतृत्व, दुसर्या महायुद्धानंतर उदयाला आलेल्या राजकीय बदल, राजकीय विकास व राजकीय आधुनिकीकरण, राजकीय संसूचन व लोकमत, आधुनिक काळातील महत्त्वपूर्ण सत्ता, प्रभाव, अधिकार आणि अधिमान्यता आणि नोकरशाही या विविधांगी मुद्द्यांचा समावेश केलेला आहे.Rajkiya Samajshastracha Parichay
-