-
व्यावसायिक अर्थशास्त्र (भाग 1)
Rs.250.00व्यावसायिक अर्थशास्त्रातील महत्वाच्या संकल्पना आणि सिद्धान्त उपभोक्ते आणि व्यावसायिकांना व्यावसायिक निर्णय घेण्यास मदत करीत असतात. यात प्रामुख्याने उपभोक्त्याच्या वर्तणुकीचे सिद्धान्त, उत्पादकाच्या वर्तणुकीचे सिद्धान्त, विभाजनाचे सिद्धान्त यांचा अभ्यास केला जातो. त्या पैकी एफ.वाय.बी.कॉम या वर्गाच्या पहिल्या सत्राच्या अभ्यासक्रमात व्यावसायिक अर्थशास्त्राचा परिचय, मूलभूत संकल्पन, उपयोगितेचे संख्यावाचक व क्रमवाचक विश्लेषण, मागणी-पुरवठा विश्लेषण, पुरवठा विश्लेषण या प्रमुख मुद्यांचा समावेश केलेला आहे. प्रस्तुत क्रमिक पुस्तकात अभ्यासक्रमात समाविष्ट सर्व मुख्य आणि उपमुद्यांची विस्तृत, सखोल आणि मुद्देसुद मांडणी केलेली आहे. विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता आणि पातळी विचारात घेवून विषय अत्यंत सोप्या मातृभाषेत मांडला आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हा एक सैद्धान्तिक विषय आहे. तो समजण्यास सोपा जावा म्हणून आकृत्यांचा वापर केलेला आहे. आकृत्यांचे स्पष्टीकरण सहज समजेल असे सोपे केलेले आहे.
Vyavasayik Arthashastra (Bhag 1)
-