-
व्यावसायिक अर्थशास्त्र (भाग-1)
Rs.325.00वाणिज्य अर्थशास्त्र ही अर्थशास्त्र या विशाल वृक्ष अभ्यास विषयाची अशी शाखा आहे, की जी सैध्दान्तिक अर्थशास्त्राला (Theoretical Economics) व्यावहारीक अर्थशास्त्राचे (Applied Economics) रुप प्रदान करते. अर्थशास्त्र हे एक असे सामाजिक विज्ञान आहे, की जे मानवाच्या व्यावहारिक वर्तणूकीचे अध्ययन करते. समाजात मानव दुहेरी भूमिका पार पाडतो. एक उपभोक्त्याची आणि दुसरी उत्पादकाची. जेव्हा तो उपभोक्त्याच्या भूमिकेत असतो तेव्हा तो कमीत कमी खर्चात/किंमतीत जास्तीत जास्त वस्तू आणि सेवा प्राप्त करुन म्हणजे मागणी करुन त्यांचा उपभोग आणि त्यातून महत्तम समाधान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. उपभोक्ता आज कोणत्या वस्तू/सेवांची मागणी करत आहे, त्या कोणत्या वस्तूची मागणी करेल याचा अंदाज करुन (Demand Forecasting) कोणत्या वस्तूचे, किती प्रमाणात, कोठे आणि कसे उत्पादन करायचे याचा निर्णय उद्योजक घेतो. त्याचा निर्णय अचूक ठरला तर नफा अन्यथा तोटा सहन करावा लागतो. व्यावसायिक अर्थशास्त्राचा हा पहिला भाग उपभोक्त्याच्या वर्तणूकीशी संबधित आहे.
Vyavsayik Arthashastra (Bhag 1)
-