• समाजशास्त्र परिचय

    समाजशास्त्र परिचय

    समाजशास्त्राचा अभ्यास ही आधुनिक काळाची गरज आहे. समाजशास्त्राचे महत्व दिवसेंदिवस वाढतच आहे. समाजाचा जसाजसा विकास होत गेला तसतश्या सामाजिक घटना, घडामोडी व सामाजिक समस्या यातील जटीलता वाढली. त्यामुळे सामाजिक घटना व घडामोडीचा काल सुसंगत अर्थ लावून निरनिराळ्या सामाजिक समस्यांची कारणे शोधून त्यावरील उपाययोजना करण्यासाठी समाजशास्त्रात काळानुरुप नवनवीन दृष्टीकोन विकसित होत गेले व मानवी समाजजिवन सुखकर करण्यास समाजशास्त्राची मदत होत गेली. समाजशास्त्रात ‌‘समाज’ हा शब्द एक संकल्पना म्हणून उपयोगात आणली व संकल्पना म्हणूनच ‌‘समाज’ हा शब्द समाजशास्त्रात अभ्यासल्या जाते. मानवाच्या इतिहासाकडे दृष्टीक्षेप टाकल्यास असे दिसून येते की, गरजापूर्तीसाठी माणुस स्वैर वर्तन करण्यास मागेपुढे पाहत नाही. अशा स्वैर वर्तनाने समाजात अराजकता निर्माण होईल, गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. व समाजजिवन विस्कळीत होईल असे होवू नये म्हणून सामाजिक नियंत्रणाच्या पद्धतीचे अध्ययन केले जाते.
    प्रस्तुत ग्रंथात समाजशास्त्राचा अर्थ, स्वरुप व व्याप्ती तसेच समाजशास्त्रात वापरल्या जाणाऱ्या विविध संकल्पनांची ओळख करुन देण्यात आली आहे. तसेच मानवाला जिवंत राहण्यासाठी विविध गरजांची परिपुर्ती करावी लागते. गरजांच्या परिपुर्तीसाठी मदत करणाचा विविध सामाजिक संस्था, संस्कृती, सामाजिकरण, सामाजिक अनुचलन, विचलन, सामाजिक नियंत्रण व्यक्तीमत्व विकास, सामाजिक चळवळी, सामाजिक स्पष्टीकरण व परिवर्तन, महिला सक्षमीकरण इत्यादी बाबींची समाजशास्त्रीय माहिती देण्याचा प्रयत्न प्रस्तुत ग्रंथात केला आहे.

    Samajshastra Parichay

    Rs.310.00
    Add to cart
  • समाजशास्त्राची मूलतत्त्वे

    समाजशास्त्राची मूलतत्त्वे

    समाजशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. समाजशास्त्र हे केवळ सैद्धांतिक शास्त्र नाही, तर उपयुक्ततावादी शास्त्र सुद्धा आहे. त्यामुळे समाजशास्त्राचे अभ्यासक विविध क्षेत्रांमध्ये रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घेऊ शकतात.
    प्रस्तुत ग्रंथात समाजशास्त्राचा अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती याबरोबरच समाजशास्त्रात वापरल्या जाणाऱ्या विविध संकल्पनांची ओळख करुन दिली आहे. यामध्ये समाजशास्त्राची उपयोगिता, समाजशास्त्र आणि सामाजिक परिवर्तन, संस्कृतीच्या व्याख्या, वैशिष्ट्ये, घटक आणि कार्य, तसेच सामाजिकरणाचे अर्थ, व्याख्या, मूलतत्त्वे, उद्दिष्टे, अवस्था, साधने आणि सिद्धांत यांची माहिती समाविष्ट आहे.
    याशिवाय, सामाजिक स्तरीकरण आणि गतिशीलता, यांचे अर्थ, प्रकार, घटक, स्तरीकरणाची कार्ये, सामाजिक गतिशीलतेचे परिणाम आणि प्रोत्साहन करणारे घटक यावर सुद्धा चर्चा केली आहे. सामाजिक परिवर्तनाच्या व्याख्या, वैशिष्ट्ये, प्रकार आणि कारणे यांची सुद्धा माहिती या ग्रंथात दिली आहे.
    प्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमानुसार साध्या आणि सोप्या भाषेत मांडणी करण्यात आली आहे. हे पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक आणि जिज्ञासू अभ्यासकांसाठी निश्चित उपयुक्त ठरेल.

    Rs.180.00
    Add to cart