• सांख्यिकीय पद्धती

    सांख्यिकीय पद्धती

    आजच्या वेगवान युगात मानवाचे जीवन खूपच व्यापक व गुंतागुंतीचे होत चालले आहे. त्यामुळे सांख्यिकीचे क्षेत्रही खूपच विस्तारीत होत चालले आहे. आज शेती, उद्योग, व्यापार, वाहतूक या सारख्या सर्वच क्षेत्राच्या अध्यापनासाठी सांख्यिकीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोणत्याही शास्त्रात सांख्यिकीचे महत्त्व हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सांख्यिकीमध्ये अंकाच्या स्वरूपात असलेली माहिती विशिष्ट पद्धतीने मांडली जाते व त्या माहितीच्या आधारे निष्कर्ष काढले जातात. आधुनिक काळात सरकारने कल्याणकारी राज्याची कल्पना स्वीकारल्यामुळे सरकारला आपल्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी सांख्यिकीशिवाय पर्याय नाही. सांख्यिकी हे सर्व शास्त्रात संशोधनासाठी प्रभावी साधन असल्यामुळे संख्याशास्त्राचा उपयोग हा बहुतेक सर्व शास्त्रांत केला जातो. सांख्यिकीची व्याप्ती ही विशाल स्वरूपाची आहे. विविध शास्त्राच्या अभ्यासात सांख्यिकीचा अभ्यास केला जातो. सांख्यिकीच्या सहाय्याने मूळ सिद्धांताचा अभ्यास केला जातो. नवीन सिद्धांताची मांडणी करण्यासाठी सांख्यिकीच्या सहाय्याने संग्रहीत सामग्रीचे वर्गीकरण, श्रेणीयन, सारणीयन आणि विश्लेषण करण्यात येते. याचप्रमाणे व्यवहारिक जीवनात ही सांख्यिकीची उपयुक्तता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

    Sankhyikiya Paddhati

    Rs.350.00
    Add to cart
  • सामाजिक मानवशास्त्र

    सामाजिक मानवशास्त्र

    आधुनिक सामाजिक शास्त्रात एक अतिशय महत्वपूर्ण शास्त्र म्हणजे मानवशास्त्र होय. मानवाचे अध्ययन करणार्‍या वेगवेगळ्या शाखा आहे. त्या सर्व शाखांना एकत्र करण्याची आवश्यकता 1859 साली फ्रेंच विचारवंत श्री. पॉल ब्रोका यांनी मांडली आणि पुढे सामान्य मानवशास्त्राचा उदय झाला. मानवशास्त्रात मानवाच्या शारीरिक, सांस्कृतिक व सामाजिक या तिन्ही अंगाचा अभ्यास केल्या जातो. त्यादृष्टीने मानवशास्त्र हे विविध प्रकारच्या शास्त्राशी निगडीत असून एक सामाजिक शास्त्र म्हणून मानले जाते. सामाजिक मानवशास्त्र हे विज्ञान आहे. त्यामुळे वैज्ञानिक पद्धतीनेच समाजाचा अभ्यास या शास्त्रात केला जातो. इ.स. 1870 पासून सामाजिक मानवशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात झाली. वर्तमानकाळात सामाजिक मानवशास्त्रात आदिवासी व ग्रामीण समाजाचा अभ्यास केला जातो. परंतु आदिवासी समाजाच्या अभ्यासावर प्रकर्षाने लक्ष दिले जाते.

    मानवशास्त्र मानवाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने अध्ययन करीत असल्यामुळे त्यात मानवी जीवनाच्या सर्व अंगाचा अभ्यास केल्या जातो. मानवशास्त्र एका व्यक्तीचे अध्ययन करीत नसून मानवी समुहाचे अध्ययन करते म्हणून मानवी समाजाअंतर्गत असलेल्या विविध गटाचा मानवशास्त्र अभ्यास करते. मानवशास्त्र हे आदीम व प्रगत अश्या दोन्ही समाजाचे अध्ययन करते.

    सदरील पुस्तकात सामाजिक मानवशास्त्राचा परिचय, सामाजिक मानवशास्त्राच्या अभ्यासपद्धती, भारतातील आदिवासी समाज, आदिवासी धर्म व जादू, आदिवासींची अर्थव्यवस्था, आदिवासींचे सामाजिक जीवन, कुटुंब, देवकवाद, आदिवासी समस्या व विकास इ. मुद्द्यांचा सविस्तरपणे उहापोह केलेला आहे.

    Samajik Manavshastra

    Rs.250.00
    Add to cart