
व्यावहारिक व उपयोजित मराठी (भाग 3)
Rs.175.00शिक्षणाने केवळ ज्ञानसंक्रमण होत नाही तर विद्यार्थांच्या बुध्दी, आकलन व विचारशक्तीचा विकास होतो. त्यांना अनेक कौशल्यांची प्राप्ती होते, त्यांना चांगल्या सवयी लागतात. त्यांच्या अभिरूचीचा व सौंदर्यदृष्टीचा विकास होतो. जीवनविषयक दृष्टीकोनाची व मूल्यांची जोपासना करायला शिकतात. त्यांच्या सर्जनशील शक्तीचा आणि विवकेशीलबुद्धीचा विकास होतो. म्हणून ज्ञानप्राप्तीबरोबर ज्ञानाचे दृष्टीकोन, मूल्ये आणि कौशल्यांची प्राप्ती व उपयोजन शिकविणारे अभ्यासक्रम तयार करावे लागतात. कालसापेक्ष त्यात बदलही करावे लागतात. आजच्या नवसमाज माध्यमांच्या गरजा भागाव्यात आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हा प्रधान हेतू यामागे असतो. मराठी भाषेबाबतचा न्यूनगंड, अल्पसंतुष्टता वृत्ती, विचारांतील साचलेपणा, संकुचितपणा, यापेक्षा येणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन, ज्ञान-कौशल्यांतील आधुनिकता आणि संकटातून संधी शोधण्याचे कौशल्य जर आपल्याकडे असेल तर भाषेच्या भवितव्याची उगा चिंता करण्याची गरज नाही.
Vyavharik V Upyojit Marathi (Bhag 3)



