Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

विचार आणि विचारवंत

नाशिक जिल्ह्यातील संसद सदस्य (जीवन व कार्य)

Rs.350.00

स्वातंत्र्यपुर्व व स्वातंत्र्योतर काळात भारतीय राजकारणात नाशिक जिल्ह्यातील विविध राजकीय नेत्यांनी भारताच्या व महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. प्रस्तुत पुस्तकात त्या त्या काळातील सामाजिक-राजकीय व्यवस्थेचे विवेचनासोबतच जिल्ह्यातील बदलत गेलेले राजकारणाचाही समावेश होतो. नाशिक लोकसभा मतदारसंघ अत्यंत जागरुक व संवेदनशील असल्याचे जनतेने वेळोवेळी दाखवून दिले आहे. गेल्या 70 वर्षातील लोकसभेच्या उमेदवारांची माहिती, जिल्ह्यातील राजकीय पक्ष, चिन्ह, विविध नेते, निवडणुकीतील विजयी व पराभूत उमेदवारांना मिळालेली मते तसेच त्या वेळेच्या निवडणुकीतील वातावरण यांचाही यथायोग्य समाचार लेखकाने प्रस्तुत पुस्तकात घेतला आहे.

नाशिक जिल्ह्यातील लोकसभा आणि राज्यसभा यांचा अभ्यासपूर्ण लेखाजोखा राज्यशास्त्राचे प्राध्यापक प्रदीप देशपांडे यांनी प्रस्तुत लिखाणातून घेतला आहे.

सदरील ग्रंथ नाशिक, मालेगांव, धुळे या जिल्ह्यातील राजकीय नेते, कार्यकर्ते सामाजिक, राजकीय कार्याचे अभ्यासक, विद्यार्थी, प्राध्यापक तसेच पत्रकार, राज्यशास्त्राचे अभ्यासक आणि जिज्ञासूंकरीता उपयुक्त ठरेल.

Nashik Jilhyatil Sansad Sadsya (Jeevan V Karya)

  • नाशिक जिल्ह्यातील भौगोलिक, सामाजिक, राजकीय व आर्थिक परिस्थिती
  • नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी (1952 ते 2014)

1) कॉ. श्रीपाद अमृत डांगे, 2) गोविंद हरी देशपांडे, 3) भाऊराव गायकवाड तथा दादासाहेब गायकवाड, 4) महाराष्ट्राचे भाग्यविधाते – यशवंतराव चव्हाण, 5) नि:स्वार्थी कट्टर काँग्रेसी – अण्णासाहेब, 6) शेकापचा लढवय्या सेनापती – विठ्ठलराव हांडे, 7) प्रताप देवराम वाघ, 8) मुरलीधर माने, 9) डॉ. दौलतराव आहेर, 10) डॉ. वसंत पवार, 11) राजाभाऊ गोडसे, 12) माधवराव पाटील, 13) उत्तमराव ढिकले, 14) देविदास पिंगळे, 15) समीर मगन भुजबळ, 16) हेमंत तुकाराम गोडसे, 17) बापु हरी चौरे, 18) रेश्मा मोतीराम भोये, 19) प्रताप नारायण सोनवणे, 20) डॉ. सुभाष भामरे, 21) यादवराव जाधव, 22) माधवराव जाधव, 23) झेड. एम. कहांडोळे, 24) जनसामान्यांचे प्रतिनिधी – हरिभाऊ महाले, 25) सीताराम भोये, 26) कचरुभाऊ राऊत, 27) हरिश्चंद्र देवराम चव्हाण, 28) श्रीमंत धैर्यशीलराव पवार, 29) शंकरराव देशमुख, 30) नरेंद्र जाधव

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “नाशिक जिल्ह्यातील संसद सदस्य (जीवन व कार्य)”
Shopping cart