Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

साहित्य समीक्षा

नव्वदोत्तर आदिवासी कविता

Rs.275.00

नव्वद नंतरचे साहित्य हा एकूणच जगभरातील साहित्याच्या बदलाचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. जागतिकीकरणाने मानवी जगण्यात, त्यातून निर्माण झालेल्या वर्तनात, मानव-पशु, मानव-पक्षी, मानव-निसर्ग, मानव-पर्यावरण आणि माणूस-माणूस यांच्या नात्यातील वीण उखडलेली जाणवू लागली. हिंदीतील सुप्रसिद्ध कवी लीलाधर मंडलोई म्हणतात, ‌‘जागतिकीकरण यह ऐसा बाजार है जो हमारे सामान की नही रिश्तों की भी नीलामी करवाता है|’ तसेच मानवी जगण्यातील माणुसकी ह्या चिवट मूल्याला उद्ध्वस्त करून पैसा हेच मानवाचे प्रभावी मूल्य ठरू लागले. एकूणच मानवाच्या आतापर्यंतच्या जीवनमूल्यांना उद्ध्वस्त करून त्याच्या जगण्याला मिळालेली कलाटणी, या सगळ्यांचा परिणाम नव्वदोत्तरच्या जागतिकीकरणातून जाणवतो. त्याचा आदिवासींच्या जगण्यावर परिणाम झाला का? की आणखी कुठल्या घटकाने आदिवासींचे जगणे आपल्या मुळांपासून उखडून टाकले, वर्तुळापासून परिघावर गेले? या सर्वांचा शोध नव्वदोत्तर आदिवासी कवितेतून घेण्याचा प्रयत्न येथे केला आहे.

Navadottar Adivasi Kavita

 • नव्वदोत्तर आदिवासी कवितेच्या निमित्ताने
 • विद्रोहाचा ‌‘पोहटा’ घेऊन उठणारा ‌‘पतुसा’
 • मूलनिवासी आदिवासींच्या मूल्यसंघर्षाची कविता : आगाजा
 • उठावाचे शब्दनिखारे पेरणारी कविता : मी तोडले तुरूंगाचे दार
 • कुसुम अलाम यांची कविता, अस्मिता आणि स्त्रीवाद
 • आदिवासी योजनांवर गिधाडी झडप मारणाऱ्या राजकर्त्यांच्या
  धिक्काराची कविता : झडप
 • वाहरू सोनवणे यांच्या ‌‘रोडाली’ काव्यसंग्रहातील विद्रोह आणि वैश्विकता
 • स्वातंत्र्याविरुद्ध बंड करणारी कविता : माझी सनद कुठे आहे?
 • समतायुध्दाचे आवाहन करणारी कविता : नगाऱ्याप्रमाणे वाजणारे शब्द
 • आदिम स्त्रीवादी अस्तित्त्वासाठी प्रस्थापित व्यवस्थेविरूद्ध लढणारी कविता
 • आदोर : श्रमप्रतिष्ठेचे तत्त्वज्ञान मांडणारी कविता
 • आदिवासी साहित्य व सांस्कृतिक चळवळीच्या विचारधारेशी बांधिलकी सांगून वैश्विक भान व्यक्त करणारी कविता
 • ऐतिहासिक मिथकांना काव्यरूप देणारा : तिरकमठा
 • आदिवासी कवितेचा महानायक – भुजंग मेश्राम
 • आदिम मूल्यभान जपणारी विद्रोही कविता
 • तटबंदी
 • डांगाण गाणा (चिंध्या-चपाट्या उराशी बाळगणारी कवयित्री)
 • आदिवासी समाजवास्तवाचा शोध घेणारा कवितासंग्रह : निवडुंगाला आलेली फुलं
 • रानमेवा
 • वळीव एक आकलन

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “नव्वदोत्तर आदिवासी कविता”
Shopping cart