Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

सेट / नेट / जेआरएफ - मार्गदर्शन

SET | NET | PET अनिवार्य पेपर 1

(सन 2011 ते 2021 सेट प्रश्नपत्रिकांचे विकल्पासह विश्लेषण)

Rs.250.00

पेपर ख प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सदर पुस्तक लेखन करण्यामागची नेमकी भूमिका हिचं आहे. यात 2011 पासून 2021 पर्यंतच्या एकूण 10 प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे स्वरूप कसे बदलत आहे, हे प्रश्नपत्रिका सोडविताना लक्षात येते. तसेच यात जरी 10 प्रश्नपत्रिकांतील साधारणतः 550 प्रश्नांचा समावेश असला तरी प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण करत असताना प्रत्येक पर्यायाचे देखील विश्लेषण केलेले आहे. त्यामुळे एक प्रश्न सोडवितानाच किमार चार प्रश्नांची तयारी होते. म्हणजेच 2000+ प्रश्नांचा सराव सदर पुस्तकातुन होईल.
सेट/नेट परीक्षा खुप अवघड असल्याची एक सामान्य भावना परीक्षार्थींमध्ये असते परंतु परीक्षेच्या स्वरूपाविषयी माहिती नसणे आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव या कारणांनी सदर परीक्षेविषयीचा भयगंड निर्माण झालेला आहे. पेपर ख मधील 10 उपघटकांचा घटकनिहाय अभ्यास केल्यास लक्षात येईल की, अभ्यासक्रम मर्यादित असुन त्या बाहेरील प्रश्न साधारणतः विचारले जात नाहीत. प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असल्याने वर्णनात्मक माहितीचे वाचन करताना देखील मुद्दे काढण्याची सवय लावली तर परीक्षाभिमुख अभ्यास होईल.
महाराष्ट्रात इतर स्पर्धा परीक्षांविषयी अनेक ठिकाणी मार्गदर्शनवर्ग उपलब्ध आहेत. त्यातुन परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, अवाका, अभ्यास कसा करावा याविषयी मार्गदर्शन प्राप्त होते. परंतु सेट/नेट परीक्षेविषयी विशिष्ट मार्गदर्शन वर्गांचा सर्वत्र अभाव आहे. यामुळे स्वयंअध्ययनावर भर देणे आवश्यक आहे. स्वयंअध्ययन करणाऱ्या परीक्षार्थींना अध्ययनासाठी सुयोग्य दिशा मिळावी म्हणुन हा लेखन प्रपंच. यासमवेतच नेट/सेट परीक्षेत विचारले जाऊ शकणाऱ्या संभाव्य वस्तुनिष्ठ प्रश्नसंच लवकरच प्रकाशित होईल.

सेट प्रश्नपत्रिका – नोव्हेंबर 2011
सेट प्रश्नपत्रिका – फेब्रुवारी 2013
सेट प्रश्नपत्रिका – डिसेंबर 2013
सेट प्रश्नपत्रिका – ऑगस्ट 2015
सेट प्रश्नपत्रिका – मे 2016
सेट प्रश्नपत्रिका – एप्रिल 2017
सेट प्रश्नपत्रिका – जानेवारी 2018
सेट प्रश्नपत्रिका – जून 2019
सेट प्रश्नपत्रिका – जून 2020
सेट प्रश्नपत्रिका – सप्टेंबर 2021

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “SET | NET | PET अनिवार्य पेपर 1”
Shopping cart