Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

स्त्रीसाहित्य

स्त्री मानसशास्त्र

Female Psychology

Rs.350.00

वैदिक काळात स्त्रीला कुटुंबात व समाजात उच्च स्थान होते. नंतरच्या काळात मात्र स्त्रीला दुय्यम स्थान प्राप्त झाले. विविध समाजसुधारकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याने स्त्री शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटले. आज स्त्रिया शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात झेप घेत आहेत. हे जरी सत्य असले तरी आजही लाखो स्त्रिया शिक्षणापासून वंचित आहेत. बलात्कार, कुमारीमाता, स्त्रीभृणहत्या, हुंउाबळी, घटस्फोट, मारझोड अशा अनंत संकटांशी स्त्री लढा देत आहे. याचा कारणे समाज व संस्कृतीच्या मूळाशी आहेत. स्त्रीला मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसुती, रजोनिवृत्ती या स्थित्यंतरांमधून जावे लागते. प्रत्येक अवस्थेत स्त्रवणार्‍या संप्रेरकांमुळे तिला पुरुषांपेक्षा कितीतरी पटीने अधिक शारीरिक, मानसिक व भावनिक ताण-संघर्षांचा सामना करावा लागतो. त्यादृष्टीने स्त्री-पुरुषांची शरीर रचना, तिचे शारीरिक व मानसिक आरोग्य, आरोग्यावर परिणाम करणारे घटक, स्त्री आणि पुरुष दोघांनीही समजून घेऊन स्त्रीला प्रत्येक टप्प्यावर समजून घेतले, तिला आधार दिला तर तिचा त्रास, येणारा ताण ती सहजपणे यांचा सामना करु शकेल हा विचार या पुस्तक लेखनामध्ये केलेला आहे. स्त्रियांची मनोसामाजिक भूमिका, स्त्री-स्वभावाची वैशिष्ट्ये आणि वर्तन, स्त्रियांची विविध क्षेत्रातील संपादणूक, आधुनिक स्त्री व नैतिकता-बदलते संदर्भ इत्यादी मुद्यांवर येथे विवेचन केले आहे.

Stri Manasshastra

  1. स्त्री-जीवनाचा इतिहास : 1.1 वैदिक काळातील स्त्री – पति-पत्नी संबंध, पत्नीची कर्तव्ये, वैदिक काळातील विवाहाचे प्रकार (ब्राह्म विवाह, दैव विवाह, आर्ष विवाह, प्रजापत्य विवाह, असूर विवाह. 1.2 बाराव्या शतकानंतरची स्त्री – सतीप्रथा, बालविवाह, विधवा पुनर्विवाह, आंतरजातीय विवाह, घटस्फोट, एकविवाह, हुंडा पद्धत, पडदा पद्धत, साम्पत्तिक अधिकार, स्त्रियांचे शिक्षण. 1.3 आधुनिक काळातील स्त्री – स्त्रीचे स्थान, शिक्षण, विवाह; पती-पत्नी संबंध – आजच्या स्त्रीच्या जीवनातील भावनिक आंदोलने, स्वतःच्या शरीरा संदर्भातील भावनिक आंदोलने
  2. स्त्री-शरीरशास्त्र : 2.1 स्त्रीची शारीरिक संरचना – त्रिदोष, सप्तधातू, त्रिमल; अस्थिसंस्था (कूर्चा, स्नानुसंस्था, श्वसन संस्था, पचनसंस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, मज्जासंस्था). 2.2 स्त्रीत्वाचा आणि पुरूषत्वाचा विकास – मुला-मुलीमध्ये होणारे प्राथमिक स्वरूपाचे बदल, दर्शनिय बदल, मानसिक व भावनिक बदल. 2.3 स्त्रीचा मातृत्व विकास – पुरूष जननसंस्था; बाह्य जननेंद्रिये – रचना आणि कार्य, शिश्न, शिश्नाची लांबी व आकार; वृषणकोष व वृषण – रचना व कार्य
  3. स्त्री-मानसशास्त्र : 3.1 स्त्री-मानसशास्त्र, 3.2 स्त्री-पुरूष भेद – शारीरिक भेद – शरीररचनात्मक भेद, वेदनक्षमता भेद, दीर्घायुत्व; मानसिक भेद (समान उद्दिष्ट/समस्या, विचार, स्मृती, 3.3 लिंगभाव (प्रबलीकरण, निरीक्षण, अनुकरण); लिंगभाव निर्मितीचे दुष्परिणाम – लिंगभावामुळे स्त्रियांवर होणारे दुष्परिणाम, लिंगभावामुळे पुरुषांवर होणारे दुष्परिणाम.
  4. स्त्रियांची मनोसामाजिक भूमिका : 4.1 स्त्री स्वभावाची वैशिष्ट्ये आणि वर्तन, 4.2 आधुनिक स्त्री आणि नैतिकता – बदललेले स्वरूप, 4.3 स्त्रियांची विविध क्षेत्रातील संपादणूक – प्रशासकीय सेवा, राजकीय क्षेत्र, पोलिस सेवा, न्यायव्यवस्था, उद्योग क्षेत्र, पत्रकारिता क्षेत्र, शेती व्यवसाय
  5. स्त्रियांचे शारीरिक व मानसिक आरोग्य : 5.1 आरोग्य, 5.2 स्त्रियांच्या शारीरिक आरोग्याचे नियंत्रण करणारे उपयुक्त घटक – खेळ-व्यायाम, आहार, स्वच्छता, कुटुंब नियोजन (निरोध, कॉपर-टी, गर्भनिरोधक गोळ्या, गर्भनिरोध इंजेक्शन, पुरूष नसबंदी); मासिक पाळी चक्र, ऋतुसमाप्ती, 5.3 मानसिक आरोग्य, 5.4 स्त्रियांच्या मानसिक आरोग्य नियंत्रित करणारे उपयुक्त घटक – सुखी वैवाहिक जीवन, समृद्ध कौटुंबिक वातावरण, जीवनातील सुखद घटना, स्त्रियांचे लैंगिक जीवन व लैंगिक शिक्षण
  6. मार्गदर्शन आणि समुपदेशन : 6.1 मार्गदर्शन, 6.2 समुपदेशन, 6.3 स्त्रियांच्या समस्या आणि त्याविषयी समुपदेशन – किशोरावस्था, विवाह, गर्भावस्था व प्रसूती, नैसर्गिक प्रसुती, अपत्य संगोपन, ऋतुनिवृत्ती, वंध्यत्व, वैधव्य, वैवाहिक जीवनात सूर न जुळणे, 6.4 कुटुंब समुपदेशन – पति-पत्नीमधील मतभेद, व्यभिचार वा अनैतिक संबंध, पती/पत्नीच्या नातेवाईकांची अतिरिक्त लुडबूड, व्यसनाधिनता
  7. स्त्री – एक भावनिक व्यवस्थापक : 7.1 भावना, 7.2 भावनांची वैशिष्ट्ये, 7.3 भावनांची अभिव्यक्ती – भाषा, ध्वनी, हावभाव, कृती, मनःस्थिती, स्वभाव, 7.4 भावनिक व्यवस्थापन – आत्मभान, स्वयंव्यवस्थापन/स्वनियंत्रण, सहसंवेदना/सहानुभव, मानवी संबंधाचे व्यवस्थापन
  8. स्त्री आणि कुटुंब व्यवस्थापन : 8.1 बालकांचे संगोपन व विकासाची जबाबदारी – बालकाचा आहार, बालकाचे स्नान, बालकाचे कपडे, झोप व विश्रांती, सवयी रूजविणे, 8.2 गृहव्यवस्थापन – दैनंदिन कामांचे व्यवस्थापन, आर्थिक व्यवस्थापन, भावनिक व्यवस्थापन; स्त्री जीवनातील स्थित्यंतरे
  9. ध्यान – यशस्वी लढा देण्याची प्रणाली : 9.1 समायोजन, 9.2 विषम समायोजन, 9.3 संरक्षण यंत्रणा – कृतक समर्थन, प्रक्षेपण, विस्थापन, प्रतिपूरण, तादात्म्य, विकृत श्रद्धा, आत्मताडन, नकारात्मकता, आजारीपणाचे सोंग घेणे, अन्याश्रय, दिखाऊपणा, दिवा-स्वप्न रंजन, उदात्तीकरण, प्रतिगमन, दमन

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्त्री मानसशास्त्र”
Shopping cart