Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

साहित्य समीक्षा

डॉ. आनंद यादवांच्या आत्मचरित्रात्मक कादंबरीतील जीवनसंघर्ष

Rs.195.00

साठोत्तरी मराठी साहित्यातील एक स्वतंत्र प्रवाह म्हणजे ‘ग्रामीण साहित्य’ होय. शहरी संस्कृतीच्या सान्निध्यात विकसित होणार्‍या ’मध्यमवर्गीय माणसांच्या जीवनदर्शनातील सुखदु:खाचे वर्णन करणार्‍या साहित्यापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात ग्रामीण संस्कृतीच्या आधारे जीवनाची वाटचाल करणार्‍या सामान्य माणसाच्या जीवनातील सुखदु:खासमवेत संघर्षाचे वास्तववादी वर्णन करणारे ‘ग्रामीण साहित्य’ जाणीवपूर्वक विकसित झाले. या परंपरेत काव्य, कथा, कादंबरी, समीक्षात्मक लेखन, वाङ्मयीन संपादने इ. साहित्य रचनेतून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे लेखक म्हणजे डॉ. आनंद यादव होय. अनुभवलेल्या जीवनाच्या आधारावर ग्रामीण जीवन संघर्षाचे यथार्थ दर्शन घडविणारे त्यांचे साहित्य मराठीत मानदंड ठरले आहे. डॉ. यादवांनी प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत आपले जीवन किती सर्वांगसुंदर बनविले व त्यांचा कौटुंबिक संघर्ष किती जीवघेणा होता. त्याही परिस्थितीतून त्यांनी कसा मार्ग काढला, याचे वर्णन त्यांनी आपल्या चारही ‘झोंबी’, ‘नांगरणी’, ‘घरभिंती’ व ‘काचवेल’ या आत्मचरित्रात्मक कादंबर्‍यातून केले आहे. त्यांनी ग्रामीण जीवनातील संघर्ष अचूकपणे टिपले.
डॉ. दिलीप पाटील यांनी सदरील पुस्तकात डॉ. यादवांच्या कादंबर्‍यातील संघर्ष व स्थित्यंतरांचा अचूकपणे वेध घेतल्याने जिज्ञासूंना ते निश्चितच मार्गदर्शक ठरेल. शिवाय या चारही आत्मचरित्रात्मक कादंबरीतील आशय एकत्रितपणे अभ्यासता येईल. ‘कोणत्याही साहित्यकृतीतील आशयद्रव्याला लेखकाच्या जीवनानुभवाचा स्पर्श असतो’ ही जाणीव विकसित होईल. रसिक वाचक या प्रयत्नांचे स्वागत करतीलच!

Dr Anand Yadav Yanchya Kadambaritil Jeevansangharsh

  1. मराठीतील दलित आत्मकथने आणि आत्मचरित्रात्मक लेखन
  2. डॉ. आनंद यादव यांची साहित्यसंपदा
  3. ‘झोंबी’तील आशय व जीवनसंघर्ष
  4. ‘नांगरणी’तील आशय व जीवनसंघर्ष
  5. ‘घरभिंती’तील आशय व जीवनसंघर्ष
  6. ‘काचवेल’तील आशय व जीवनसंघर्ष

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “डॉ. आनंद यादवांच्या आत्मचरित्रात्मक कादंबरीतील जीवनसंघर्ष”
Shopping cart