-
मूलभूत अर्थशास्त्र
अर्थशास्त्र हे एक गतिमान शास्त्र आहे. काळाबरोबर त्याचे स्वरूप आणि व्याप्ती बदलत गेली. अर्थशास्त्र हे एक मानवी जीवनाशी निगडीत अशा आर्थिक व्यवहारांचे अध्ययन करणारे एक सामाजिक शास्त्र आहे. मानवी जीवनात धन किंवा संपत्तीला अनन्य साधारण महत्त्व अहे. विकासाबरोबर मानवाच्या गरजांचे स्वरुप बदलत गेले आणि व्याप्ती विस्तारत गेली. गरजांची अमर्यादितता आणि साधनांची मर्यादितता व पर्यायी वापराची शक्यता यामुळे मानवासमोर अनेक आर्थिक प्रश्न निर्माण होत आहेत. त्या प्रश्नांची मानवाला आपल्या पातळीवर सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. प्रश्नांची सोडवणूक करताना वर्तमान काळाबरोबर भविष्यकालीन विकासाचाही त्याला विचार करावा लागतो. आर्थिक क्रियातून धन किंवा संपत्तीची प्राप्ती, त्यातून स्वत:च्या आणि इतरांच्या कल्याणात वाढ, दुर्मिळ अशा साधनसामग्रीचा वापर करून जास्तीत जास्त वस्तू व सेवांचे उत्पादन आणि जास्तीत जास्त गरजांची पुर्तता, अर्थव्यवस्थेचा विकास आणि वृद्धी इत्यादींशी संबंधीत बाबींचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. सदर पुस्तकात सतत विकास, समावेशक विकास, मानव विकास निर्देशांक, दशलक्ष विकास लक्ष्य, विकास व्यूहरचनेसाठी औद्योगिकीकरण की कृषी, बाजार की सरकार, चलन निचलनीकरण, रोख विरहित व्यवहार, देणी देण्याच्या आणि त्यांचा निपटारा करण्याच्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक पद्धती या मुद्द्यांचा समावेश केला आहे.
Mulbhut Arthashastra
-
मौद्रिक प्रणाली
“मौद्रिक प्रणाली” हा विषय विविध स्पर्धा परीक्षा तसेच अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी या पुस्तकामध्ये नवीन आकडेवारीनुसार मांडणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नोटाबंदीचा मुद्राबाजारावर झालेला परिणाम व त्याचे फायदे आणि तोटे इत्यादी बाबींचे विश्लेषण करण्यात आले आहे. या पुस्तकाची पाच प्रकरणामध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणामध्ये वस्तुविनिमय आणि त्याच्या अडचणी; मुद्रेचा इतिहास, अर्थ, व्याख्या आणि स्वरूप; मुद्रेची कार्ये आणि महत्व; मुद्रेचे प्रकार आणि निश्चलनीकरणाचे फायदे आणि तोटे बाबींचे विश्लेषण करण्यात आले आहे. दुसर्या ‘मुद्रामूल्य’ या प्रकरणात मुद्रेची मागणी व मुद्रेचा पुरवठा त्यांचा अर्थ आणि निर्धारक घटक, मुद्रेचे मूल्य, मुद्रेची मागणी व पुरवठा यांचे संतुलन, फिशरचा मुद्रा परिमाण सिद्धांत याबाबत विश्लेषण करण्यात आले आहे. तिसर्या प्रकरणामध्ये स्फिती व अपस्फिती आणि व्यापारचक्र; चौथ्या मुद्राबाजार या प्रकरणामध्ये भारतीय मुद्राबाजार व्यवस्था आणि त्यावर निश्चलनीकरणाचा झालेला परिणाम तर पाचव्या भांडवल बाजारावरील प्रकरणामध्ये भारतीय भांडवल बाजार, त्याचे महत्व आणि कार्य त्याचप्रमाणे सेबीच्या जबाबदार्या आणि कार्ये इत्यादीसंदर्भात मांडणी करण्यात आली आहे. नवीन आकडेवारीनुसार लिहिलेल्या या पुस्तकाचे स्वागत प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील अभ्यासक करतील याबद्दल विश्वास आहे.
Maudrik Pranali
-
रोजगार हमी योजना आणि शेतमजूर स्त्रियांचे आर्थिक सबलीकरण
स्वातंत्र्यानंतर विविध वैद्यकीय सोयीत वाढ झाल्यामुळे लोकसंख्या वेगाने वाढली. वाढत्या लोकसंख्येला रोजगार पुरविणे अत्यंत आवश्यक होते – कारण बेरोजगारांचा बोझा अर्थव्यवस्थेच्या विकासाला अडथळा निर्माण करतो हे शासनाच्या लक्षात आले होते. त्याकरिता रोजगार उपलब्ध करुन देणारी योजना स्थापने अनिवार्य होते. महाराष्ट्रातील सिंचीत क्षेत्राखालील जमिनीचे प्रमाण खूपच कमी होते व आहे. कोरडवाहू जमिनीचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे शेतीतून विशिष्ट कामासाठीच रोजगार उपलब्ध होत होता. उर्वरीत काळात भूमीहीन शेतमजूर, शेतकरी व अन्य रोजगारावर अवलंबून असणारे मजूर यांची अवस्था अत्यंत हलाखीची होत असे. राज्याचा कोणता ना कोणता भाग अवर्षणाच्या छायेत असायचा. ग्रामीण भागातील अल्पभूधारक, प्रचंड उपासमारी यामुळे ग्रामीण परिसरातील लोक स्थलांतर होत होते. वाढत्या स्थलांतरामुळे ग्रामीण भाग ओस पडून शेती उत्पादनावर विपरित परिणाम होत होता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष श्री.वि.स. पागे यांनी या योजनेची आखणी केली.
देशाला स्वातंत्र्य मिळाले, वेगाने विकासासाठी पंचवार्षिक योजनाही सुरु झाल्यात, परंतु गत सहा दशकात दारिद्य्र निर्मलून व बेरोजगारी नष्ट झाली नाही. एकूण लोकसंख्येत स्त्रियांचा वाटा समाधानकारक असतानाही समाजात आजही स्त्रियांचे स्थान दुय्यमच आहे. समाज व्यवस्थेतील पुरुषांप्रमाणे स्त्रियांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. या हेतूने रोजगार हमी योजना आणि शेतमजूर स्त्रियांचे आर्थिक सबलीकरण या ग्रंथात अत्यंत बारकाईने रोजगार हमी योजनेचे स्वरुप व कार्यपध्दती, स्त्री शेतमजुराची आर्थिक स्थिती, रोजगार हमी योजनेत स्त्री श्रमिकांना उपलब्ध रोजगार व सोयी, रोजगार हमी योजनेतील निधी, खर्च व त्याचे रोजगारावरील परिणाम, स्त्री सबलीकरण व शासन स्तरावरील योजना, जागतिकीकरण व स्त्री सबलीकरण : स्वरुप व परिणाम या अनेक घटकांचा सखोल अभ्यास करण्यात आलेला असून, सदरील ग्रंथ समाजचिंतक, अभ्यासक, धोरणकर्ते यांच्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.Rojgar Hami Yojana Ani Shet Majoor Sriyanche Aarthik Sablikaran
-
लोकसंख्याशास्त्र
लोकसंख्याशास्त्र या पुस्तकाची विभागणी पाच घटकांमध्ये करण्यात आलेली आहे. पहिल्या घटकामध्ये लोकसंख्याशास्त्राचा परिचय, दुसर्या घटकामध्ये प्रजनन क्षमता आणि मृत्यू व तत्संबधी मापन पद्धती, तिसर्या घटकांमध्ये लोकसंख्येचे स्थलांतर, चौथ्या घटकामध्ये लोकसंख्येचे नागरीकरण तर शेवटच्या पाचव्या घटकामध्ये लोकसंख्या आणि विकास व भारतातील पंचवार्षिक योजना काळातील लोकसंख्या धोरणाबाबत माहिती देण्यात आली आहे. पुस्तकाची घटकनिहाय मांडणी करतांना भारतातील लोकसंख्येच्या संदर्भात अद्ययावत आकडेवारी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येक घटकाच्या शेवटी अभ्यासासाठी प्रश्नसंच देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करतांना या प्रश्नसंचाचा निश्चितच उपयोग होईल. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अर्थशास्त्र विषयांतर्गत भारताच्या लोकसंख्या संदर्भांतील घटकाची तयारी करतांना या पुस्तकातील माहिती उपयुक्त ठरणार आहे.
Loksankhayashashra
-
-
वित्तीय प्रणाली
वित्तीय प्रणाली (Financial System) यामध्ये बँकव्यवस्था, रचना, विविध बँका कार्य, उद्दीष्टे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेबी, आयआरडीए, तसेच आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था यामध्ये IMF, World Bank, ADB, Bribkr या घटकांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सदर पुस्तक हे विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त आहे. याशिवाय SET, NET व MPSC साठी उपयुक्त आहे.
सदर पुस्तक हे अत्यंत साध्या पद्धतीने मांडणी करुन विद्यार्थ्याला सहज कसा समजेल यादृष्टीने मांडणी केली आहे. सदर पुस्तक लिहितांना उपयुक्त संदर्भग्रंथ, इंटरनेट वेब, शासकीय प्रकाशने, वेगवेगळे आर्थिक अहवाल यांचा वापर करण्यात आला असून हे पुस्तक प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त ठरेल.Vittiya Pranali
-
व्यवसाय व्यवस्थापन
व्यवसाय व्यवस्थापन या पुस्तकात विद्यार्थ्यांना व्यवसाय व्यवस्थापन म्हणजे काय व्यवस्थापन, संदर्भातील संकल्पना, उद्दिष्टे, व्यवसाय व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, महत्त्व गरज प्रक्रिया, व्यवस्थापनाच्या प्रक्रिया, टप्पे व्यवसाय व्यवस्थापनाची उपयुक्तता, सरकारने उद्योग उद्योग व्यवसाय यासाठी राबवलेल्या विविध योजनांचा अभ्यास यामध्ये आर्थिक विकासात लघु उद्योगाचे स्थान, मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया, मुद्रा योजना, डेअरी उद्योग, फळबाग व्यवसाय व व्यवस्थापन, शेती उत्पादन व विक्री याविषयीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सदर पुस्तक लिहिताना सर्व संकल्पनांचा अचूक, सोप्या भाषेत मांडणी करण्याचा व स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला असून त्यासाठी संदर्भ ग्रंथ, वेबसाईट, वर्तमानपत्र, लेख, शासन अहवाल यांचा आधार घेऊन मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पुस्तक अर्थशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांना तर उपयुक्त आहेच त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी व यूपीएससी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक व उपयुक्त ठरेल.
Vyavsay Vyavsthapan
-
-
व्यावसायिक अर्थशास्त्र
‘व्यावसायिक अर्थशास्त्र’ ह्या पुस्तकाचा उपयोग बी.कॉम. भाग 1 च्या विद्यार्थ्यांसोबतच बी.ए.व एम.ए. अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना सुध्दा होणार आहे. सदर पुस्तकामध्ये व्यावसायिक आणि प्रबंधकीय अर्थशास्त्र, बाजार संरचना, विविध बाजारपेठांतील किंमत निश्चिती, उत्पादन घटकांच्या किंमतीचे निर्धारण ह्या अर्थशास्त्रातील विविध मूलभूत बाबींचा ऊहापोह केला आहे.
अर्थशास्त्राचा मूळ अभ्यासविषय हा अॅडम स्मिथने संपत्तीचा अभ्यास म्हटले आहे. पुढे त्याचा विस्तार झाला परंतु संपत्ती हा महत्वाचा विचार अर्थशास्त्राचा आहे. संपत्तीच्या निर्मितीकरिता जे प्रयत्न किंवा कार्य करण्यात येते त्यामध्ये व्यवसाय ही संज्ञा महत्त्वाची ठरते. प्रा.जोएल डीन यांचा ’चरपरसशीळरश्र एलेपेाळलीश’ हा ग्रंथ 1951 मध्ये प्रकाशित झाला. या ग्रंथाने ‘व्यावसायिक अर्थशास्त्र’ ही अर्थशास्त्राची नवीन शाखा जन्मास घातली.
Vyavsayik Arthashastra
-
व्यावसायिक अर्थशास्त्र (भाग 1)
व्यावसायिक अर्थशास्त्रातील महत्वाच्या संकल्पना आणि सिद्धान्त उपभोक्ते आणि व्यावसायिकांना व्यावसायिक निर्णय घेण्यास मदत करीत असतात. यात प्रामुख्याने उपभोक्त्याच्या वर्तणुकीचे सिद्धान्त, उत्पादकाच्या वर्तणुकीचे सिद्धान्त, विभाजनाचे सिद्धान्त यांचा अभ्यास केला जातो. त्या पैकी एफ.वाय.बी.कॉम या वर्गाच्या पहिल्या सत्राच्या अभ्यासक्रमात व्यावसायिक अर्थशास्त्राचा परिचय, मूलभूत संकल्पन, उपयोगितेचे संख्यावाचक व क्रमवाचक विश्लेषण, मागणी-पुरवठा विश्लेषण, पुरवठा विश्लेषण या प्रमुख मुद्यांचा समावेश केलेला आहे. प्रस्तुत क्रमिक पुस्तकात अभ्यासक्रमात समाविष्ट सर्व मुख्य आणि उपमुद्यांची विस्तृत, सखोल आणि मुद्देसुद मांडणी केलेली आहे. विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता आणि पातळी विचारात घेवून विषय अत्यंत सोप्या मातृभाषेत मांडला आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हा एक सैद्धान्तिक विषय आहे. तो समजण्यास सोपा जावा म्हणून आकृत्यांचा वापर केलेला आहे. आकृत्यांचे स्पष्टीकरण सहज समजेल असे सोपे केलेले आहे.
Vyavasayik Arthashastra (Bhag 1)
-
व्यावसायिक अर्थशास्त्र (भाग-1)
वाणिज्य अर्थशास्त्र ही अर्थशास्त्र या विशाल वृक्ष अभ्यास विषयाची अशी शाखा आहे, की जी सैध्दान्तिक अर्थशास्त्राला (Theoretical Economics) व्यावहारीक अर्थशास्त्राचे (Applied Economics) रुप प्रदान करते. अर्थशास्त्र हे एक असे सामाजिक विज्ञान आहे, की जे मानवाच्या व्यावहारिक वर्तणूकीचे अध्ययन करते. समाजात मानव दुहेरी भूमिका पार पाडतो. एक उपभोक्त्याची आणि दुसरी उत्पादकाची. जेव्हा तो उपभोक्त्याच्या भूमिकेत असतो तेव्हा तो कमीत कमी खर्चात/किंमतीत जास्तीत जास्त वस्तू आणि सेवा प्राप्त करुन म्हणजे मागणी करुन त्यांचा उपभोग आणि त्यातून महत्तम समाधान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. उपभोक्ता आज कोणत्या वस्तू/सेवांची मागणी करत आहे, त्या कोणत्या वस्तूची मागणी करेल याचा अंदाज करुन (Demand Forecasting) कोणत्या वस्तूचे, किती प्रमाणात, कोठे आणि कसे उत्पादन करायचे याचा निर्णय उद्योजक घेतो. त्याचा निर्णय अचूक ठरला तर नफा अन्यथा तोटा सहन करावा लागतो. व्यावसायिक अर्थशास्त्राचा हा पहिला भाग उपभोक्त्याच्या वर्तणूकीशी संबधित आहे.
Vyavsayik Arthashastra (Bhag 1)
-
व्यावसायिक अर्थशास्त्र (भाग-2)
व्यावसायिक अर्थशास्त्राचा हा दुसरा भाग उत्पादनाच्या वर्तणूक / निर्णयाशी संबधित आहे. एक कुशल उद्योजक तोच जो कमीत कमी उत्पादन खर्चात, मर्यादित साधन सामग्रीचा कार्यक्षम वापर करुन जास्तीत जास्त उत्पादन आणि नफ्याचे महत्तमीकरण करतो. उद्योजक जेव्हा उत्पादन विषयक निर्णय घेतो तेव्हा तो अर्थशास्त्राच्या खर्च विषयक आणि उत्पादन विषयक सिद्धान्ताचे पालन करतो. एक उद्योजकाचा अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्रज्ञांवर दृढ विश्वास असतो. तो मनतो की, अर्थशास्त्रज्ञ जे सांगतात तेच सत्य आहे. वेगवेगळ्या बाजारात उत्पादन आणि किंमत कशी निश्चित करायची, उत्पादन घटकांचा मोबदला कसा ठरवायचा याबाबत मार्गदर्शन अर्थशास्त्र करते. उद्योजकाने अर्थशास्त्रातील मागणी-पुरवठा बाजूकडे दुर्लक्ष केले तर अर्थव्यवस्थेत तेजी-मंदीची व्यापार चक्रे निर्माण होतात. व्याचार चक्रे निर्माण होवू न देण्यासाठी उद्योजकांनी अर्थशास्त्रज्ञांच्या विचारांचा आदर केला पाहिजे.
Vyavsayik Arthashastra
-
समग्रलक्षी अर्थशास्त्र
समग्रलक्षी अर्थशास्त्र/स्थूल अर्थशास्त्र या विषयाचा यात स्थूल अर्थशास्त्रचे स्वरूप आणि व्याप्ती, महत्व आणि मर्यादा, राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार व उत्पादनाचे सिद्धांत, उपभोग आणि गुंतवणूक, पैसा, चलनवाढ, व्यापारचक्रे, समग्रलक्षी आर्थिक धोरणे या घटकांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सदर पुस्तक हे विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त आहे. याशिवाय SET, NET व MPSC साठी उपयुक्त आहे.
सदर पुस्तक हे अत्यंत साध्या पद्धतीने मांडणी करुन विद्यार्थ्याला सहज कसा समजेल यादृष्टीने मांडणी केली आहे. सदर पुस्तक लिहितांना उपयुक्त संदर्भग्रंथ, इंटरनेट वेब, शासकीय प्रकाशने, वेगवेगळे आर्थिक अहवाल यांचा वापर करण्यात आला असून हे पुस्तक प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त ठरेल.Samagralakshi Arthashastra
-
समग्रलक्षी अर्थशास्त्र (S.Y.B.A.)
अर्थशास्त्र हे एक मानवी जीवनाशी निगडीत असे मानवी वर्तणूकीचे अध्ययन करणारे सामाजिक शास्त्र आहे. आज जगातील प्रमुख अर्थव्यवस्था आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून आपला विकास साध्य करीत आहेत. खासगीकरण, उदारीकरण जागतिकीकरण माध्यमातून जगाच्या अर्थव्यवस्था एकमेकांमध्ये मिसळत आहेत, जगाचे जागतिक खेड्यात रूपांतरण होत आहे. अर्थशास्त्र या अभ्यास विषयाचा विकास हा व्यापारवादी विचारसरणी, निसर्गवादी विचारसरणी, सनातनपंथीय विचारसरणी, नवसनातनपंथीय विचारसरणी, आधुनिक विचारसरणी, नव-नव सनातनपंथीय विचारसरणी अशा अनेक परस्पर पुरक आणि परस्परविरोधी विचारसरणीतून झालेला आहे. ‘समग्रलक्षी अर्थशास्त्रा’मध्ये समग्र मागणी, समग्र पुरवठा, एकूण उत्पादन, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण रोजगार/बेरोजगारी, सामान्य किंमत पातळी या समग्रलक्षी चलांच्या वर्तणूकी व त्यांचे परस्पर संबंध या महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश होतो. समग्रलक्षी अर्थशास्त्र व्यक्तीगत वा विशिष्ट घटकाचा अभ्यास न करता समुच्चय आणि समुच्चयाच्या वर्तणुकीचा अभ्यास करते त्याचप्रमाणे समग्रलक्षी अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेला विकासाची दिशा दर्शनाचे कार्य करते.
प्रस्तुत पुस्तकात राष्ट्रीय उत्पादन व राष्ट्रीय उत्पन्न, समग्र मागणी, समग्र पुरवठा, एकूण रोजगार, एकूण उत्पन्न, एकूण उपभोग खर्च, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी, व्यापार चक्रे, भाववाढ व भावघट, विदेश व्यापार, विदेश चलन विनिमय दर, समग्रलक्षी चल, त्यांचे परस्पर संबंध, एकमेकांवरील प्रभाव, बेरोजगारी, दारिद्य्र, विषमता ह्या समग्रलक्षी समस्या, त्यांचा उत्पादन, रोजगार, प्रभावी मागणी, पुरवठा बाजूवर पडणारा प्रभाव, समस्या सोडविण्यासाठी वित्तीय धोरण, चलन विषयक धोरण, विदेश व्यापार धोरण या महत्त्वपूर्ण घटकांचा सर्वांगीण समावेश केला आहे.Samagralakshi Arthashastra – SYBA
-
समग्रलक्षी अर्थशास्त्र (S.Y.B.Com.)
अर्थशास्त्र हे एक मानवी जीवनाशी निगडीत असे मानवी वर्तणूकीचे अध्ययन करणारे सामाजिक शास्त्र आहे. आज जगातील प्रमुख अर्थव्यवस्था आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून आपला विकास साध्य करीत आहेत. खासगीकरण, उदारीकरण जागतिकीकरण माध्यमातून जगाच्या अर्थव्यवस्था एकमेकांमध्ये मिसळत आहेत, जगाचे जागतिक खेड्यात रूपांतरण होत आहे. अर्थशास्त्र या अभ्यास विषयाचा विकास हा व्यापारवादी विचारसरणी, निसर्गवादी विचारसरणी, सनातनपंथीय विचारसरणी, नवसनातनपंथीय विचारसरणी, आधुनिक विचारसरणी, नव-नव सनातनपंथीय विचारसरणी अशा अनेक परस्पर पुरक आणि परस्परविरोधी विचारसरणीतून झालेला आहे. ‘समग्रलक्षी अर्थशास्त्रा’मध्ये समग्र मागणी, समग्र पुरवठा, एकूण उत्पादन, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण रोजगार/बेरोजगारी, सामान्य किंमत पातळी या समग्रलक्षी चलांच्या वर्तणूकी व त्यांचे परस्पर संबंध या महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश होतो. समग्रलक्षी अर्थशास्त्र व्यक्तीगत वा विशिष्ट घटकाचा अभ्यास न करता समुच्चय आणि समुच्चयाच्या वर्तणुकीचा अभ्यास करते त्याचप्रमाणे समग्रलक्षी अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेला विकासाची दिशा दर्शनाचे कार्य करते.
प्रस्तुत पुस्तकात राष्ट्रीय उत्पादन व राष्ट्रीय उत्पन्न, समग्र मागणी, समग्र पुरवठा, एकूण रोजगार, एकूण उत्पन्न, एकूण उपभोग खर्च, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी, व्यापार चक्रे, भाववाढ व भावघट, विदेश व्यापार, विदेश चलन विनिमय दर, समग्रलक्षी चल, त्यांचे परस्पर संबंध, एकमेकांवरील प्रभाव, बेरोजगारी, दारिद्य्र, विषमता ह्या समग्रलक्षी समस्या, त्यांचा उत्पादन, रोजगार, प्रभावी मागणी, पुरवठा बाजूवर पडणारा प्रभाव, समस्या सोडविण्यासाठी वित्तीय धोरण, चलन विषयक धोरण, विदेश व्यापार धोरण या महत्त्वपूर्ण घटकांचा सर्वांगीण समावेश केला आहे.Samagralakshi Arthashastra – SYBCOM
-
समग्रलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण – 1 (M.A. II, SEM 3)
समग्रलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण या पुस्तकात समग्रलक्षी अर्थशास्त्रीय पारंपारीक दृष्टिकोन – सनातन दृष्टिकोन / सनातन पंथ : प्रस्तावना व मुख्य वैशिष्ट्ये, केन्सचा दृष्टिकोन : प्रस्तावना व मुख्य वैशिष्ट्ये, नवसनातन दृष्टिकोन – प्रस्तावना व मुख्य वैशिष्ट्ये, राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा – राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह, राष्ट्रीय उत्पन्न लेखाच्या विविध पद्धती, पैशाची मागणी आणि पुरवठा – व्याख्या, रँडक्लिफचा रोखता सिद्धांत, गुर्ले-शॉ दृष्टिकोन, पैशाची मागणी पैशाचा पुरवठा – वित्तीय मध्यस्थ, बँक ठेव निश्चितीचे यांत्रिक प्रतिमाण, पैशाच्या पुरवठ्याच्या निश्चितीचे वर्तनवादी प्रतिमान, मागणी निश्चित पैसा पुरवठा प्रक्रिया, रिझर्व बँकेचा पैशाच्या पुरवठ्यासंबंधीचा दृष्टीकोन, उच्च शक्ती पैसा, पैसा गुणक, अर्थसंकल्पीय तूट व पैशाचा पुरवठा, पैशाचा पुरवठा आणि मुक्त अर्थव्यवस्था, पैशाच्या पुरवठ्यांवरील नियंत्रण या घटकांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
सदर पुस्तकाची मांडणी अत्यंत साध्या पद्धतीने केली आहे. सदर पुस्तक लिहितांना उपयुक्त संदर्भग्रंथ, इंटरनेट वेब, शासकीय प्रकाशने, वेगवेगळे आर्थिक अहवाल यांचा वापर करण्यात आला असून हे पुस्तक प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त ठरेल.Samgarlakshi Arthashastriya Vishelshan – 1
-
-
संशोधन पद्धती – मूलभूत संकल्पना
अर्थशास्त्रीय संशोधन म्हणजे जीवनाच्या आर्थिक व्यवहारास मार्गदर्शक ठरतील असे नियम किंवा सिध्दांत मांडण्यासाठी आर्थिक माहिती किंवा तथ्ये संकलित करणे, ती शिस्तबध्द स्वरूपात मांडणे, तीचे शास्त्रीय विश्लेषण करणे, निरीक्षण व अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून अनेकविध कारणांचे तात्कालिक व अंतिम परिणाम काय होतील हे निश्चित करणे.
संशोधन पद्धती मूलभूत संकल्पना या पुस्तकात संशोधन परिचय/प्रस्तावना, संशोधन आराखडा, तथ्य संकलन/माहिती संकलन, सामग्रीचे/माहितीचे विश्लेषण, केंद्रिय प्रवृत्तीची मापके, संशोधन अहवाल या घटकांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सदरील पुस्तकाची मांडणी अत्यंत साध्या पद्धतीने केली असून हे पुस्तक प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त ठरेल.Sanshodhan Paddhati Mulbhut Sankalpana
-
-
सांख्यिकीय पद्धती
आजच्या वेगवान युगात मानवाचे जीवन खूपच व्यापक व गुंतागुंतीचे होत चालले आहे. त्यामुळे सांख्यिकीचे क्षेत्रही खूपच विस्तारीत होत चालले आहे. आज शेती, उद्योग, व्यापार, वाहतूक या सारख्या सर्वच क्षेत्राच्या अध्यापनासाठी सांख्यिकीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोणत्याही शास्त्रात सांख्यिकीचे महत्त्व हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सांख्यिकीमध्ये अंकाच्या स्वरूपात असलेली माहिती विशिष्ट पद्धतीने मांडली जाते व त्या माहितीच्या आधारे निष्कर्ष काढले जातात. आधुनिक काळात सरकारने कल्याणकारी राज्याची कल्पना स्वीकारल्यामुळे सरकारला आपल्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी सांख्यिकीशिवाय पर्याय नाही. सांख्यिकी हे सर्व शास्त्रात संशोधनासाठी प्रभावी साधन असल्यामुळे संख्याशास्त्राचा उपयोग हा बहुतेक सर्व शास्त्रांत केला जातो. सांख्यिकीची व्याप्ती ही विशाल स्वरूपाची आहे. विविध शास्त्राच्या अभ्यासात सांख्यिकीचा अभ्यास केला जातो. सांख्यिकीच्या सहाय्याने मूळ सिद्धांताचा अभ्यास केला जातो. नवीन सिद्धांताची मांडणी करण्यासाठी सांख्यिकीच्या सहाय्याने संग्रहीत सामग्रीचे वर्गीकरण, श्रेणीयन, सारणीयन आणि विश्लेषण करण्यात येते. याचप्रमाणे व्यवहारिक जीवनात ही सांख्यिकीची उपयुक्तता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
Sankhyikiya Paddhati
-
-
-
-
-
सार्वजनिक आयव्यय
सार्वजनिक आयव्यय या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारत सरकार, महाराष्ट्र सरकार तसेच देशातील उत्पन्न व खर्च या सर्व गोष्टींची माहिती व्हावी, केंद्र व राज्य संबंधांमध्ये उत्पन्नाच्या वाटणी कशा पद्धतीने होते, देशातील उत्पन्नाच्या साधनांची हस्तांतरण कसे होते, अंदाजपत्रकाचे प्रकार व मांडणी, तुटीचे अंदाजपत्रक, केंद्र व राज्य वित्तीय संबंध तसेच त्यासाठी कार्य करत असलेले भारत नियोजन आयोग व त्या जागी नव्याने निती आयोग हे सर्व माहित होण्यासाठी सविस्तरपणे माहिती देण्यात आलेली आहे. सदर पुस्तक लिहिताना अर्थशास्त्रीय संकल्पनांचा अचूक, सोप्या भाषेत मांडणी करण्याचा व स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला असून त्यासाठी संदर्भ ग्रंथ, वेबसाईट, वर्तमानपत्र, लेख, शासन अहवाल अंदाजपत्रक यांचा आधार घेऊन मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पुस्तक अर्थशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांना तर उपयुक्त आहेच त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी व यूपीएससी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक व उपयुक्त ठरेल.
Sarvajanik Ayayvya
-
सार्वजनिक आयव्ययाचे अर्थशास्त्र
सार्वजनिक आयव्यय हा राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या दोन अभ्यास विषयांच्या सीमेवर असलेला विषय आहे. त्याचा एक पाय राज्यशास्त्राच्या दगडावर तर दुसरा पाय अर्थशास्त्राच्या दगडावर आहे. राज्यशास्त्र राज्यकारभार कसा चालवायचा हे सांगते तर राज्यकारभारातून समाजकल्याणात वाढ कशी करायची आणि त्यासाठी उत्पन्न कसे प्राप्त करायचे व ते कसे खर्च करायचे हे सांगते. सरकार कर आणि करेत्तर मार्गाने उत्पन्न प्राप्त करते. कर हे सक्तीचे अंशदान असते. त्याच्या बदल्यात करदात्याला कोणताही विशेष लाभ मिळत नाही. कर महसूल प्राप्त करण्याचे एक साधन आहे. याबरोबरच ते आर्थिक विषमता कमी करण्याचे प्रमुख साधन आहे. आधुनिक काळात कल्याणकारी राज्य संकल्पना स्विकारण्यात आली आहे. जनकल्याणासाठी सरकारला खर्च करावा लागतो आणि तो भागविण्यासाठी सरकारला महसूल प्राप्त करावा लागतो. खर्च आणि महसूल ताळमेळ बसत नसेल तर सार्वजनिक कर्ज, तुटीचा अर्थभरणा यांचा अवलंब करावा लागतो.
प्रस्तुत पुस्तकात राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आयव्ययाची भूमिका/महत्त्व, आयव्ययाचे सिद्धांत, कर, सार्वजनिक वस्तू आणि खासगी वस्तू, कराघात, करभार आणि करभाराचे संक्रमण, बाजाराचे अपयश आणि सरकारचा हस्तक्षेप, सार्वजनिक खर्च, भारतातील सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती, सार्वजनिक कर्जाचे व्यवस्थापन आणि सार्वजनिक कर्जाची परतफेड, अंदाजपत्रक आणि तुटीचा अर्थभरणा, विकसनशील अर्थव्यवस्थेत तुटीच्या अर्थभरणाची भूमिका इ. महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश आहे. प्रस्तुत पुस्तक सर्वांना उपयुक्त ठरेल यात शंका नाही.Sarvajnik Ayavyayvache Arthashastra
-
सिंचन प्रक्रिया उद्योग व बाजार पेठ
भारत कृषीप्रधान देश असून भारतातील 70 टक्के लोक कृषी व्यवसायाशी प्रत्यक्ष निगडित आहे. राष्ट्रीय उत्पन्नात एकेकाळी सर्वाधिक व आजही बहुतांश वाटा कृषी क्षेत्राचा दिसून येतो. भारतातील लघु, कुटिर व इतरही उद्योग क्षेत्र शेतीमधून निर्मित होणार्या कच्च्या मालावर अवलंबून आहेत. अतिरिक्त लोकसंख्या असणार्या या देशातील रोजगार निर्माण करून देणारे सर्वात मोठे क्षेत्र कृषी हेच आहे.
पुरातन काळापासून भारतीय शेतीमधील उत्पादित कृषी माल विविध देशात निर्यात होत आहे. असे असूनही भारतीय शेतीची अवस्था आजही अविकसित स्वरुपाची दिसून येते. याला कोणती कारणे असतील याचा शोध घेण्यासाठी एका जिल्ह्यापुरता प्रयत्न करीत आहे. सोबतच अमरावती महसूल, विदर्भ, महाराष्ट्र व काही प्रमाणात संपूर्ण देशातील कृषी घटकांचा व विकासाचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा प्रयत्नदेखील या पुस्तकात करण्यात आला आहे. अध्ययनासाठी बुलडाणा जिल्ह्याची निवड केली, कारण महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी असणार्या विदर्भातील बुलडाणा जिल्हा हा विविध अंगांनी महत्त्वपूर्ण आहे. माँ जिजाऊंचे जन्मस्थान, जग प्रसिद्ध लोणार सरोवर, थंड हवेचे ठिकाण म्हणून जिल्ह्याचा काही भाग आजही प्रसिद्ध आहे. अशा जिल्ह्यात कृषी क्षेत्रातील विविध पिकांचे, बाजारपेठेचे अध्ययन करून कृषकांची आज असलेली आर्थिक स्थिती अभ्यासण्याचा प्रयत्न केला आहे. जेणे करून त्याची तुलना विदर्भ व महाराष्ट्राशी करता येईल. संशोधनासाठी निवडलेल्या विषयाची सखोलता, विविध प्रकारच्या मर्यादा व अडचणी लक्षात घेऊन अधिक वास्तविकता वाचकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेतून मांडणी करण्याचा आणि वाचण्याची गोडी निर्माण होईल, असाही प्रयत्न केला आहे. असे असले तरी अध्ययनाचा आणि मांडणीचा प्रयत्न त्रुटीरहीत नाही याची जाणीव आहे. वाचकांनी त्रुटी व सदोषता निदर्शनास आणून द्यावी, अशी विनंती आहे.
Sinchan Prakriya Udyog V Bajar Peth
-
-
-
सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्र (व्यावसायिक अर्थशास्त्र)
Sukshmlaxmi Arthashastra (Vyavasayik Arthashatra)
-
सूक्ष्म अर्थशास्त्र
आधुनिक काळात अर्थशास्त्राचा खूपच विकास झालेला आहे. त्यामुळे अर्थशास्त्रात असंख्य गोष्टींची चर्चा किंवा विश्लेषण केले जाते. उदा. अर्थशास्त्रात वेतन, व्याज, खंड, नफा, मागणी, पुरवठा, उद्योगसंस्था, एखाद्या वस्तूची किंमत निश्चिती, देशातील किंमत पातही, बेकारी, रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, लोकसंख्या अशा असंख्य बाबींची चर्चा किंवा विश्लेषण केले जाते. सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील लहानात लहान भागाची किंवा घटकांची चर्चा केली जाते. म्हणजेच अर्थव्यवस्थेत जे अनेक घटक असतात त्यापैकी एखाद्या विशिष्ट किंवा व्यक्तिगत घटकांची चर्चा सूक्ष्म अर्थशास्त्रात केली जाते. अर्थव्यवस्थेत उत्पादन, विभाजन, विनिमय, उपभोग या चार आर्थिक क्रिया चालतात. या चार आर्थिक क्रिया पार पाडतांना प्रत्येक व्यक्ती उत्पादक किंवा उत्पादन घटक आणि उपभोक्ता या दुहेरी भूमिका पार पाडते. दुहेरी भूमिका पार पाडतांना त्याची जी वर्तवणूक असते तिचा सूक्ष्म पातळीवर व व्यक्तीगत पातळीवर अध्ययन सूक्ष्म अर्थशास्त्रात केले जाते. सूक्ष्म अर्थशास्त्राला अंशलक्ष्यी अर्थशास्त्र असेही म्हणतात.
प्रस्तुत पुस्तकात सूक्ष्म अर्थशास्त्राचे सिद्धांत, पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, मक्तेदारीयुक्त बाजार, अल्पाधिकार बाजार तसेच खंड, वेतन, व्याज व नफा या घटकांच्या मोबदल्याची सखोल व विस्तृत मांडणी केलेली आहे.
Sukshama Arthashastra
-
सूक्ष्म अर्थशास्त्र
सदरील पुस्तकात अर्थशास्त्राची ओळख, मागणी आणि पुरवठा, घटत्या किंवा र्हासमान सीमांत उपयोगितेचा सिध्दांत, व्यय (खर्च) आणि प्राप्ती (उत्पन्न) विश्लेषण, बाजारपेठांची संरचना, उत्पादनाचे घटक या घटकांचे यथोचित विश्लेषण करण्यात आलेले आहे. ग्रामीण भागातील विद्याथीवर्ग डोळ्यासमोर ठेवून अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना साध्या व सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आवश्यक तेथे कोष्टके, आकृत्या, भरपूर मुद्दे व व्यावहारिक उदाहरणांचा वापर केलेला आहे. पुस्तकाची मांडणी विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल अशा सोप्या व सुटसुटीत भाषेत केलेली आहे. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र हा विद्यार्थीवर्गाला कठीण वाटणारा विषय सहजतेने समजून तो सोपा वाटेल अशी खात्री वाटते.
Sukshma Arthashastra
-
सूक्ष्म अर्थशास्त्र
सूक्ष्म अर्थशास्त्र हे एक मानवी जीवनाशी निगडीत अशा आर्थिक व्यवहारांचे अध्ययन करणारे एक सामाजिक शास्त्र आहे. मानवी जीवनात धन किंवा संपत्तीला अनन्य साधारण महत्व आहे. धन किंवा संपत्ती म्हणजेच पैशाची प्राप्ती करण्यासाठीच मानव विविध वस्तू वा सेवांचे उत्पादन करतो. उत्पादनासाठी भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन या चार घटकांचे प्रमाणशिर एकत्रीकरण केले जाते. उत्पादन घटकांच्या वापराबद्दल घटक किंवा घटक मालकांना खंड, वेतन, व्याज आणि नफा रूपात आर्थिक मोबदला प्राप्त होतो. प्राप्त मोबदल्याच्या साहाय्याने वस्तू वा सेवांचा विनिमय केला जातो आणि त्यांचा उपभोग घेतला जातो. उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या आर्थिक क्रिया करतांना मानव जे वर्तन करतो त्याचे सूक्ष्म अर्थशास्त्रात अध्ययन केले जाते. 1776 मध्ये अॅडम स्मिथ यांचा ‘राष्ट्राची संपत्ती’ हा मौलीक ग्रंथ प्रकाशित झाला आणि तेव्हापासून अर्थशास्त्र ह्या अभ्यास विषयाला एक स्वतंत्र शास्त्र म्हणून मान्यता मिळाली. 1776 पासून ते आजपर्यंत सूक्ष्म अर्थशास्त्र ह्या विषयाचा प्रचंड विकास आणि विस्तार झाला आहे. या प्रदीर्घ काळात अर्थशास्त्राची व्याख्या, स्वरूप, व्याप्ती यात अनेक बदल झाले आहेत.
प्रत्येक मुद्यांचे विस्तृत विवेचन करण्याचा यथायोग्य प्रयत्न या पुस्तकात केला आहे. विषयाच्या आकलनासाठी आवश्यक तेथे आकृत्यांचा वापर केलेला आहे. प्रत्येक संज्ञा व संकल्पना सर्वांना सहज ज्ञात होतील अशा सुलभ भाषेत मांडण्यात आल्या आहेत.Sukshm Arthashastra
-
-
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र यात सूक्ष्म अर्थशास्त्र-अर्थ, स्वरूप, व्याप्ती व महत्व, उपभोक्ता वर्तणूक सिद्धांत, मागणी, पुरवठा, खर्च आणि प्राप्ती विश्लेषण, बाजार रचना, घटक किंमत निश्चिती, कल्याणकारी अर्थशास्त्र या घटकांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सदर पुस्तक हे विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त आहे. याशिवाय SET, NET व MPSC साठी उपयुक्त आहे.
सदर पुस्तक हे अत्यंत साध्या पद्धतीने मांडणी करुन विद्यार्थ्याला सहज कसा समजेल यादृष्टीने मांडणी केली आहे. सदर पुस्तक लिहितांना उपयुक्त संदर्भग्रंथ, इंटरनेट वेब, शासकीय प्रकाशने, वेगवेगळे आर्थिक अहवाल यांचा वापर करण्यात आला असून हे पुस्तक प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त ठरेल.Sukshmalakshi Arthashastra
-