• भारतीय आर्थिक पर्यावरण (भाग 1)

    भारतीय आर्थिक पर्यावरण (भाग 1)

    देशातील वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, उपलब्ध संसाधनाचा वापर, तंत्रज्ञान विकास, भांडवलाची उपलब्धता, विकसित मनुष्यबळ, पायाभूत सेवा व सुविधांचा विकास, सरकारचे समग्र आर्थिक धोरण इत्यादीचा आर्थिक पर्यावरणावर प्रभाव पडून शेती, उद्योग, सेवा आणि विदेशी व्यापार क्षेत्र इत्यादीच्या कामगिरीत व सध्यस्थिती संरचनात्मक बदल झाले आहेत. त्याचा आर्थिक विकासावर होणार्‍या परिणामांचे वस्तूनिष्ठ आकलन होऊन, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण व्हावी. देशाच्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील आर्थिक पर्यावरणाची स्थिती समजावी, आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता विकसित व्हावी तसेच भारतीय नागरीक म्हणून आपल्या जबाबदार्‍या व कर्तव्यांची जाणीव निर्माण व्हावी. हा हेतू अभ्यासक्रमाची पुनर्रचना करतांना विचारात घेतला आहे.

    प्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमानुसार घटकनिहाय, संदर्भसाहित्याच्या आधारे ‘भारतीय आर्थिक पर्यावरणाचे’ सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. अर्थशास्त्राच्या विद्यार्थी व अभ्यासकांमध्ये विषयासंबंधी जाणीव निर्माण होऊन त्यांची रुची वाढवी हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून सदर पुस्तकाचे लिखान करतांना विविध संकल्पनाची मांडणी अतिशय साध्या व सोप्या भाषेत केली आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक व संकल्पनेची क्रमबद्ध, सखोल व विस्तृतपणे मांडणी केली आहे.

    Bharatiya Aarthik Paryavaran (Bhag 1)

    Rs.210.00
    Add to cart
  • भारतीय आर्थिक पर्यावरण (भाग 1)

    भारतीय आर्थिक पर्यावरण (भाग 1)

    आधुनिक अर्थव्यवस्थांचे स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचे झाले आहे. उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या व्यवहारांना आर्थिक व्यवहार असे म्हटले जाते. अर्थव्यवस्थेतील सर्व आर्थिक घटक या आर्थिक व्यवहारांशी निगडित असतात. देशाच्या नैसर्गिक, आर्थिक, तांत्रिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वातावरणातून आर्थिक पर्यावरण निश्चित होत असते. देशातील आर्थिक पर्यावरणाचा देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम होतो. देशाचे आर्थिक पर्यावरण अनुकूल असेल तर देशाच्या आर्थिक विकासात वाढ घडून येते. तर प्रतिकूल आर्थिक पर्यावरणामुळे देशाच्या आर्थिक विकासात अडथळे निर्माण होतात. सदर पुस्तकामध्ये आर्थिक पर्यावरणाचा अर्थ, परिणाम करणारे घटक, अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने, जगातील प्रमुख अर्थव्यवस्थाशी तुलना, कृषी पर्यावरण, शेतीची भूमिका, आव्हाने व विविध प्रवृत्ती, कृषी-औद्योगिक पर्यावरण, देशांच्या आर्थिक विकासामध्ये उद्योगांची भूमिका, औद्योगिक धोरण 1991, भारतीय उद्योग क्षेत्रापुढील आव्हाने, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, सेवा क्षेत्राची भूमिका व विकास, आव्हाने, बँकिंग क्षेत्र, लघु आणि देय बँका, बँक खाते प्रकार, पद्धती, प्रक्रिया, ई-बँकिंग, ई-वॉलेट, भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने, दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती कार्यक्रम, कृषी विकास वगैरे महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश आहे.

    Bhartiya Arthik Paryavan (Bhag 1)

    Rs.275.00
    Add to cart