-
-
व्यावसायिक अर्थशास्त्र
Rs.250.00‘व्यावसायिक अर्थशास्त्र’ ह्या पुस्तकाचा उपयोग बी.कॉम. भाग 1 च्या विद्यार्थ्यांसोबतच बी.ए.व एम.ए. अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना सुध्दा होणार आहे. सदर पुस्तकामध्ये व्यावसायिक आणि प्रबंधकीय अर्थशास्त्र, बाजार संरचना, विविध बाजारपेठांतील किंमत निश्चिती, उत्पादन घटकांच्या किंमतीचे निर्धारण ह्या अर्थशास्त्रातील विविध मूलभूत बाबींचा ऊहापोह केला आहे.
अर्थशास्त्राचा मूळ अभ्यासविषय हा अॅडम स्मिथने संपत्तीचा अभ्यास म्हटले आहे. पुढे त्याचा विस्तार झाला परंतु संपत्ती हा महत्वाचा विचार अर्थशास्त्राचा आहे. संपत्तीच्या निर्मितीकरिता जे प्रयत्न किंवा कार्य करण्यात येते त्यामध्ये व्यवसाय ही संज्ञा महत्त्वाची ठरते. प्रा.जोएल डीन यांचा ’चरपरसशीळरश्र एलेपेाळलीश’ हा ग्रंथ 1951 मध्ये प्रकाशित झाला. या ग्रंथाने ‘व्यावसायिक अर्थशास्त्र’ ही अर्थशास्त्राची नवीन शाखा जन्मास घातली.
Vyavsayik Arthashastra