• मानव संसाधन व्यवस्थापन

    Manav Sansadhan Management

    325.00
    Add to cart
  • मानव संसाधन व्यवस्थापन – III

    Manav Sansadhan Vyavasthapan – III

    295.00
    Add to cart
  • मानव संसाधन व्यवस्थापन-II

    सदर पुस्तक लिहिताना लेखकांनी एम.कॉम.-भाग एक द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या सर्व घटकाची रचना अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सदर पुस्तकात मानव संसाधन विकास, मानव संसाधन व्यवस्थापनातील आर्थिक समस्या, मानवी संबंध आणि प्रोत्साहन, आंतरराष्ट्रीय मानव संसाधन व्यवस्थापन, मानव संसाधनातील नवीन संकल्पना आणि नवीन तंत्रज्ञानाच्या प्रवाहाच्या संकल्पनावर विशेष भर देऊन वाचकांना समजण्यासाठी विविध आकृत्या आणि उदाहरणाचा उपयोग केला आहे. त्यामुळे वाणिज्य विषयातील विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक निश्चितच फलदायी ठरेल. या अपेक्षेने प्रयत्न करून हे पुस्तक वाचकांच्या हाती देत आहोत. या पुस्तकाविषयी आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया आम्हांला अवश्य कळवाव्यात; त्याचे नेहमी स्वागतच होईल.

    Manav Sansadhan Vyavsthapan – II

    220.00
    Add to cart
  • मानवी भूगोल

    Manavi Bhugol

    195.00
    Add to cart
  • मानवी विकासाचे मानसशास्त्र

    व्यक्तीच्या गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंत होणार्‍या शारिरीक मानसिक व इतर विकासाचा केलेला शास्त्रीय अभ्यास म्हणजे मानवी विकासाचा अभ्यास होय. घडून येणारे बदल हे उघड्या डोळ्यांनी सहजपणे दिसून येत नसले तरी ते सातत्याने सुरू असतात. बालपणी मात्र त्यांचा वेग कमालीचा असतो. साधारणपणे विकासाची गती व दिशा एकच असली तरी त्यामध्ये व्यक्ती भिन्नता दिसून येते आणि व्यक्तीच्या विकासावर समाज, संस्कृती, अनुवंश परिवेश ह्या घटकांचाही मोठा प्रभाव दिसून येतो. मूळात मानवी विकास ही संकल्पना अत्यंत व्यापक अशी आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार विविध अडीअडचणींना आणि समस्यांना समर्थ्यपणे तोंड देत व्यक्ती आपला विकास साधत असतो. प्राप्त परिस्थितीशी समायोजन प्रस्थापित करत असते. अत्यंत कठीण परिस्थितीतही मानव यशाच्या उच्च शिखरावर जातांना दिसून येतो.

    बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना मानवी विकास प्रक्रियेच्या बाबतीत संशोधनातून माहिती मिळावी म्हणूनच सदरील पुस्तक लेखनाचे प्रयोजन.

    Manavi Vikasache Manasshastra

    275.00
    Add to cart
  • मानसशास्त्रीय प्रयोग

    काही वर्षाआधी साधा प्रयोग करण्यासाठी प्रयुक्त बनतो का? म्हटलं तर, सर्वच मंडळी ‘रफु चक्कर’ होवून जायची. ‘नको रे बाबा’, ‘काही फरक पडला तर’, असे धास्तावून म्हणायचे, परंतु आज मानसशास्त्रीय प्रयोगाविषयी ‘नजरा’ बदललेल्या आहे. प्रयोगाबाबतीत ‘उत्सुकता’, ‘आवड’ वाढलेली आहे. ‘आपलाच आपण शोध घेवू’ या जाणिवेने मंडळी समोर येत आहे. अलीकडे ‘चिकीत्सक’ वृत्ती वाढते आहे. त्यातूनच नव्या कल्पना उदयास येत आहे. ‘मानसशास्त्रीय प्रयोग’ हा शिस्तबद्धरीत्या व नियंत्रीत वातावरणात करावा लागतो. त्यामुळे प्रत्यक्षात अनेक अडचणींना समोर जावे लागते.

    या पुस्तकामध्ये, मानसभौतिकी, संवेदन, अध्ययन, स्मृती, विस्मरण, अवधान, भावना, विचार प्रक्रिया, नेतृत्व, मानसिक कार्य, प्रतिक्रिया काळ, साहचर्य इत्यादी घटकांवर अनेक प्रयोग इत्थभूत माहितीसह दिलेले आहे. यातून मानसशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांची गरज पूर्ण होईलच तसेच स्वतःचे चिकीत्सक अध्ययन करणार्‍या व्यक्तींना सुद्धा हे पुस्तक पर्वणीच ठरेल.

    Manasshasriya Prayog

    295.00
    Add to cart
  • मार्गदर्शन, समुपदेशन आणि समावेशक शिक्षण (बी.एड.द्वितीय वर्ष)

    आधुनिक माहिती संप्रेषण व तंत्रज्ञानातील विकासामुळे मानवी जीवनातील सामाजिक व वैयक्तिक दोन्ही क्षेत्रात महत्वाचे बदल होत आहेत. सामान्य जीवन गुंतागुंतीचे बनत आहे. बदलत्या परिस्थितीत व्यक्तीच्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी मार्गदर्शन महत्वाचे ठरते. शिक्षण क्षेत्रात देखील खूप बदल होत आहेत. नवनवीन अभ्यासक्रम, व्यवसाय, विशेषीकरण यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या समस्यांचे निराकरण करण्यात अडचणी येतात. यासाठी नवीन माध्यमांचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन उपयुक्त ठरते. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रगतीतील अडथळे, त्याची कारणे, निदान, उपचार मार्गदर्शन आणि समुपदेशनद्वारा होवू शकते. मानव एक अमूल्य संसाधन आहे. या संसाधनाची वाढ, विकास संवेदनशील आणि जाणीवपूर्वक रीतीने होण्याची गरज आहे. शिक्षक प्रशिक्षणात मार्गदर्शन आणि समुपदेशन या विषयाचा समावेश झालेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व एकमेवद्वितीय असते. त्याचा समस्या व गरजा वेगवेगळ्या असतात. यात सर्व प्रकारचे दिव्यांग विद्यार्थीदेखील आहेत. या सर्वांना समजून घेणे, त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार शिक्षणाची संधी प्रदान करणे, समावेशक शिक्षणाचे उद्दिष्ट्य आहे. वर्तमानकालीन सामान्यांच्या शाळेतच विशेष गरज असलेल्या बालकांना शिक्षण दिले जाणार आहे. कोणत्याही प्रकारची विशेष गरज असणारे बालक सर्वसामान्य शाळेत सामावून घेणे ही शाळा, शिक्षक, प्रशासक यांची जबाबदारी आहे. प्रस्तुत पुस्तकात वरील घटकांची विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

    Margadharshan, Samupdeshan & Samaveshak Shikshan

    295.00
    Add to cart
  • मीडिया लेखन

    आधुनिक काल में विज्ञान एवं प्रौद्योगिकी के क्षेत्र में हमने बहुत प्रगति की है। आज विज्ञान ने हमें नित नवीन, सुविकसित संचार माध्यम प्रदान किए हैं। वर्तमान युग में पत्र-पत्रिकाएँ, आकाशवाणी, दूरदर्शन, कम्प्यूटर, व्हॉस्अप, फेसबुक, ट्वीटर, इंस्ट्राग्राम आदि जैसे जनसंचार के माध्यम अत्यंत प्रभावी रूप से सूचना के प्रसारण का काम कर रहे हैं। हमारी आवश्यकता के अनुसार हम इन संचार माध्यमों का उपयोग करते हैं। लाखों किलोमीटर दूर रहनेवाले विभिन्न जाति, वर्ग, संप्रदाय और भाषाओं के लोग अब एक साथ आसानी से एक दूसरे के साथ इन माध्यमों के माध्यम से संपर्क कर सकते हैं। आधुनिक युग में मीडिया का सामान्य अर्थ समाचार पत्र-पत्रिकाओं, टेलीविजऩ, रेडियो, इंटरनेट आदि से लिया जाता है। मीडिया के लिए लेखन, साहित्यिक लेखन से अलग है। पत्रकारिता के पाठक या दर्शक वर्ग की समझ साहित्यिक पाठक वर्ग की तुलना में कहीं ज्यादा सामान्य होती है।
    ‘मीडिया लेखन’ पुस्तक अध्ययन की सुविधा के दृष्टि से पाच अध्यायों में विभाजित किया हैं। प्रथम अध्याय में पत्रकारिता के स्वरूप, महत्त्व, आवश्यकता एवं उसके प्रकारों का विवेचन किया गया है। द्वितीय अध्याय विज्ञापन के लेकर है जिसमें विज्ञापन को स्वरूप, महत्त्व, आवश्यकता एवं विज्ञापन के प्रकारों को स्पष्ट किया गया है। तृतीय अध्याय प्रिंट मीडिया पर केन्द्रित है। इस अध्याय में फीचर लेखन, यात्रा वृत्तांत, साक्षात्कार एवं पुस्तक समीक्षा का विवेचन किया गया है। चतुर्थ अध्याय इलेक्ट्रॉनिक मीडिया को लेकर है। इस अध्याय में रेडियो, दूरदर्शन, फिल्म एवं पटकथा लेखन की जानकारी दी गयी है। अंतिम अध्याय अर्थात पंचम अध्याय में सोशल मीडिया का विवेचन व्हाट्सप, फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम आदि उसके माध्यमों द्वारा किया गया हैं। प्रस्तुत पुस्तक विद्याथियों के साथ-साथ हिन्दी प्रेमी तथा अध्ययन कर्ताओं को भी निश्चित रूप से उपयुक्त साबित होगी।

    Mediya Lekhan

    120.00
    Add to cart
  • मुलभूत बँकिंग

    भारत सरकारने 2020 मध्ये नवीन शैक्षणिक धोरण जाहिर केले त्यात पदवी अभ्यासक्रम कालावधी चार वर्षाचा करण्यात आला. या धोरणात बहुआयामी, बहुविषयी दृष्टिकोन स्विकारण्यात आला. या मागील उद्देश विद्यर्थ्यांना सर्व विषयाचे किमान व्यावहारिक ज्ञान देवून एक संपन्न मानवी संसाधन निर्माण करणे आहे. विद्यापीठाने 2020 चे नवीन शैक्षणिक धोरण स्विकारुन जुन/जुलै 2024 पासून अभ्यासक्रमांची पुनर्रचना करुन त्यांची कार्यवाही केली. विद्यापीठात मानव्य विद्या शाखा, वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र विद्या शाखा, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा, अशा तीन प्रमुख विद्या शाखा आहेत. यांच्यांत समन्वय निर्माण करण्यासाठी काही विषय Multidisciplinary म्हणून स्विकारणे निश्चित झाले.
    Fundamentals of Banking हा असा विषय आहे. ज्यात सर्व शाखाच्या विद्यार्थ्यांमध्ये सहज रस निर्माण, होईल. खरे तर भारताला जर 5 ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था करायची असेल तर देशातील सर्व नागरिकांमध्ये बँकींग विषयाचे ज्ञान आणि जाण असणे आवश्यक आहे. सदर अभ्यासक्रम विद्यार्थी आणि नागरिकामध्ये जाण निर्माण करण्यात निश्चितच यशस्वी ठरणार.

    220.00
    Add to cart
  • मूलभूत शेअर बाजार

    जगप्रसिद्ध गुंतवणूक तज्ज्ञ आणि मोठा गुंतवणूकदार वारेन बफेट म्हणतात. “जर तुम्हाला झोपण्याच्या वेळेस, झोपेत असताना पैसे कमावण्याची एखादी पद्धत सापडत नसेल तर मग तुम्हाला मरेपर्यंत कामच करत राहावे लागेल.” पैसे कमावण्याच्या संदर्भात एक विधान केले जाते. “जर तुमच्याकडे पैसा आहे तर मग तुम्हाला काम करण्याची गरज नाही. तुम्ही पैशाला कामाला लावा स्वत:ला नाही.” या दोन्ही विधानांचा अंगुली निर्देश शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे आहे. जेव्हा तुम्ही दीर्घकाळासाठी वित्तीय नियोजन करतात, तेव्हा तुमच्यासमोर शेअर बाजार हा सक्षम पर्याय आहे. शेअर बाजारात एकदा का विचारपूर्वक गुंतवणूक केली किंवा शेअर ट्रेडिंग केले की मग शेअर बाजारातील चढ उतारांनी तुमच्या Portfolio मध्ये आणि संपत्तीत वाढ होते. मग तुम्ही काम करा की करु नका, झोपेत असा की जागे असा, सुटीवर असा की पर्यटनाला असा. तुमचा पैसा या बाजारात वाढत जातो आणि तुमच्या दीर्घकालीन योजना यशस्वी होतात. पण यासाठी शेअर बाजाराचे बेसिक नॉलेज असणे, अनुभव व कौशल्य असणे, बाजार विश्लेषण करणे यासारखे बौद्धिक श्रम करण्याची तयारी हे सर्व आवश्यक आहे.

    150.00
    Add to cart
  • मूलभूत समाजशास्त्रीय विचार

    मनुष्य हा समाजशील प्राणी असून तो बुद्धिमान आहे. मानवाला प्रत्येक काळात मानवी जीवनाशी संबंधित समस्यांच्या संदर्भात विचार करण्याची आवश्यकता वाटली. या आवश्यकतेतूनच विशिष्ट अशा सामाजिक विचारांचा उदय झाला. नेहमीच नव्या नव्या समस्यांच्या संदर्भात मानव विचार करीत राहिला म्हणून मानवी समाजाच्या अंतापर्यंत सामाजिक विचार अस्तित्वात राहतील. सामाजिक समस्या या कालसापेक्ष असतात; पण समस्या नाहीत असे कधीच घडत नाही. त्यामुळे सामाजिक विचारही मानवी समाजाइतकेच प्राचीन असून त्यांचा अंतही मानवी समाजाबरोबरच आहे. 19 व्या शतकापर्यंत सामाजिक विचारांचा विकास झाला. ग्रीक सामाजिक विचारवंत प्लेटो आणि अ‍ॅरिस्टॉटल यांच्या काळात सामाजिक विचारांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव होता; पण प्रबोधन युग निर्माण झाले. फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांतीमुळे व्यक्तीच्या विचारांमध्ये आमुलाग्र बदल घडून आले आणि यातून सामाजिक विचारांमध्ये शास्त्रीयता येत गेली. सामाजिक विचारांमध्ये ऑगस्त कॉम्त, हर्बर्ट स्पेन्सर, एमिल डरखिम, मॅक्स वेबर, कार्ल मार्क्स या व्यक्तींचेही स्थान महत्त्वपूर्ण आहे.

    Mulbhut Samajshashriy Vichar

    325.00
    Add to cart
  • यात्रा साहित्य का इतिहास

    भारतीय समाज और साहित्य में स्वतंत्रता के बाद आमूलाग्र परिवर्तन हुआ| परिवर्तन की तेज आँधी ने भारतीय समाज को बहुत ज्यादा प्रभावित किया है| साहित्य में नई विधाओं का जन्म हुआ वैसे-वैसे कई साहित्यकारों ने अपनी तुलिकाओं से इनमें तरह-तरह के रंग भरे| उसी तरह हिंदी साहित्य की महत्त्वपूर्ण विधा यात्रा-साहित्य भी है| कालानुरूप आधुनिक युग के सभी साहित्यकारों ने इस विधा को स्वीकार करते हुए उसके महत्त्व को भी प्रतिपादित किया है|
    मानव जीवन स्वयं एक यात्रा है| देश-विदेश के कई घुमक्कड प्राचीन काल से यात्राएँ करते आ रहे हैं| यात्रा का मानव विकास एवं संस्कृतियों के आदान-प्रदान में बहुत महत्त्व है| ‌‘मेरी जापान यात्रा’ यह यात्रा-साहित्य राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज इनके भारत के प्रतिनिधि के रूप में विश्वधर्म-विश्वशांति परिषद, जापान में सम्मिलित होने का यात्रा-वृत्तांत है| जापान देश की प्रगति का सार भी श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ने बीच-बीच में प्रस्तुत किया है और भारत देश के प्रगति की कामन की है|

    Yatra Sahitya Ka Itihas

    135.00
    Add to cart
  • युद्धाचे वैचारिक पैलू (युद्धाचे संकल्पनात्मक पैलू)

    युद्ध हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. युद्ध राष्ट्राच्या अस्तित्व, स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वासाठी आवश्यक बाब असल्याने प्रत्येक राष्ट्र स्व-संरक्षणाची काळजी घेत असते. देशाची सर्वंकष सुरक्षेची जबाबदारी ही सर्व नागरिकांची असते. प्राचीन काळापासून भारतीयांचे राष्ट्रीय एकता, अखंडता, स्वातंत्र्य, संरक्षण व सुरक्षा याकडे दुर्लक्ष झाल्याने परकियांची सातत्याने आक्रमणे झाली. अनेक मोक्यांच्या वेळी भारतीयांना परकीयांविरुद्ध पराभव पत्करावा लागला. भारत हा जगातील नैसर्गिक-स्वाभाविक दृष्टीने सुरक्षित असूनही सीमेच्या रक्षणाकडे दुर्लक्ष केल्याने, आक्रमकांविरूद्ध योग्य उपाययोजना न केल्याने आपल्याला वारंवार पारतंत्र्यात जावे लागले. प्रस्तुत ग्रंथात युद्ध, संघर्षांची कारणे, परिणामांचे मूल्यमापन, युद्धाच्या प्रगत सैद्धांतिक संकल्पना, युद्धोत्तर निराकरण आणि संघर्षोत्तर शांतता निर्माण करण्यासाठीची धोरणे वगैरे विविधांगी मुद्द्यांचा विश्लेषणात्मक उहापोह केला आहे.

    150.00
    Add to cart
  • युद्धाचे वैचारिक पैलू (युद्धाचे संकल्पनात्मक पैलू) भाग 2

    युद्ध हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे प्रत्येक राष्ट्र संरक्षणाची काळजी घेत असते. देशाची सर्वंकष सुरक्षा ही काही केवळ सैन्याचीच जबाबदारी नसून ती देशाच्या सर्व नागरिकांची प्राथमिक जबाबदारी आणि मूलभूत कर्तव्य आहे. मानसशास्त्रीय व आर्थिक युद्धामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या शत्रूच्या लढण्याच्या क्षमतेचे खच्चीकरण करावयाचे असते. तर आण्विक-रासायनिक आणि जैविक युद्धामध्ये संपूर्ण मानवी संस्कृती नष्ट होण्याची क्षमता असून हे अत्यंत अमानवीय असे आहे. भारतीयांचे राष्ट्रीय एकता, अखंडता, स्वातंत्र्य आणि संरक्षण व सुरक्षा याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सर्व भारतीयांनी देशाच्या संरक्षणविषयी जागरूक असणे खूप गरजेचे असून विद्यार्थ्यांनी युद्ध, संघर्षांची कारणे आणि परिणामांचे मूल्यमापन, युद्धाच्या प्रगत सैद्धांतिक संकल्पनांचे अध्ययन केल्याने त्यांना युद्धांचे गंभीरपणे विश्लेषण आणि मूल्यांकन करणे सोपे जाईल.

    110.00
    Add to cart
  • राजकीय पत्रकारिता

    आधुनिक काळात पत्रकारितेचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढलेले दिसून येते. पत्रकारितेचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाऊ लागले. पत्रकारितेला हे स्थान आपोआप मिळालेले नाही. लोकशाहीला विकसित करण्यात आणि मजबूती प्रदान करण्यात पत्रकारितेने बजावलेल्या भूमिकेवरून हे स्थान देण्यात आलेले आहे. प्रशासन आणि समाज, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून पत्रकारिता कार्य करत असते.
    प्रस्तुत पुस्तकात राजकीय पत्रकारिता विषयाशी निगडित सर्व संकल्पनाचा आढावा घेऊन सविस्तर माहिती दिलेली आहे. आवश्यक तेथे उदाहरणाचा समावेश केलेला आहे. पुस्तकात एकूण सहा प्रकरणाचा समावेश आहे. प्रथम प्रकरणात पत्रकारितेची ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसर्‍या प्रकरणात जनसंचाराबाबत चर्चा केलेली आहे. तिसर्‍या प्रकरणात पत्रकारिता आणि जनसंचाराचे मूल्यमापन केलेले आहे. चौथ्या प्रकरणात राजकीय पत्रकारिताविषयीची सखोल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाचव्या प्रकरणात पत्रकारितेच्या पद्धतीबाबत सविस्तर चर्चा केलेली आहे. सहाव्या प्रकरणात राजकारण आणि माध्यमे यांच्या परस्परसंबंधाविषयीची माहिती दिलेली आहे. प्रस्तुत पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक वर्गांला अध्यापन करताना निश्चितच उपयुक्त ठरेल.

    Rajkiya Patrakarita

    225.00
    Add to cart
  • राजकीय भूगोल

    ‘राजकीय भूगोल’ हा विषय थोडासा क्लीष्ट असल्याने पुस्तकात बर्‍याच ठिकाणी संदर्भ व उदाहरणे देऊन संकल्पना अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. या पुस्तकातून राजकिय भूगोलाचा परिचय, राज्य व राष्ट्र उत्क्रांती व विकास, भूराजनिती सिद्धांत आणि दोन राष्ट्रादरम्यान असलेला सिमा यावर सविस्तर लिखाण या पुस्तकातून आम्ही केला असल्याने ‘राजकिय भूगोलाची व्याप्ती’ आपल्या लक्षात येईलच.
    राजकिय भूगोल म्हणजे राजनैतिक दृष्टिकोनातून संगठित क्षेत्र किंवा राज्यांच्या भौगोलिक रचनेच्या संदर्भात केलेला अभ्यास होय. कोणत्याही राज्याशी संबंधित भौगोलिक क्षेत्र त्या राज्यांची भौगोलिक वास्तविकता असते. राज्य हे राजनैतिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक इ. संदर्भात गुणसंपन्न विभागासोबतच एक जिवंत विभागसुद्धा असतो. त्यावरूनच राजकिय भूगोलाची सार्थकता यावरूनच निश्चित होते.

    Rajkiya Bhugol

    175.00
    Add to cart
  • राजकीय समाजशास्त्राचा परिचय

    दुसर्‍या महायुद्धानंतर ‘राजकीय समाजशास्त्र’ हा विषय स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून उदयाला आलेला आला. राजकीय समाजशास्त्रात सामाजिक जीवनाचे राजकीय जीवनाशी होणार्‍या आंतरक्रियाचे विश्लेषण केले जाते. हे विश्लेषण विविध राजकीय आणि सामाजिक स्तरांचे पारस्परिक संबंध व प्रभावाच्या संदर्भात केले जाते. या अध्ययनातून सामाजिक आणि राजकीय यांच्यातील संबंधाची नव्या दृष्टिकोनातून मांडणी केली जाते. राजकीय समाजशास्त्रात राजकीय सामाजिक संरचना, समूह, राजकीय संस्था, संबंध आणि व्यवहाराचे अध्ययन केले जाते. तसेच राजकीय समूहावर पडणार्‍या सामाजिक प्रभावाचाही अभ्यास केला जातो.
    प्रस्तुत पुस्तकात राजकीय समाजशास्त्र विषयाशी निगडित सर्व संकल्पनांची माहिती विविध उदाहरणे आणि आकृत्यांसह दिलेली आहे. तसेच राजकीय समाजशास्त्राचा परिचय, राजकीय व्यवस्था, राजकीय संस्कृती, राजकीय सामाजीकरण, राजकीय सहभाग, राजकीय श्रेष्ठजन, राजकीय नेतृत्व, दुसर्‍या महायुद्धानंतर उदयाला आलेल्या राजकीय बदल, राजकीय विकास व राजकीय आधुनिकीकरण, राजकीय संसूचन व लोकमत, आधुनिक काळातील महत्त्वपूर्ण सत्ता, प्रभाव, अधिकार आणि अधिमान्यता आणि नोकरशाही या विविधांगी मुद्द्यांचा समावेश केलेला आहे.

    Rajkiya Samajshastracha Parichay

    395.00
    Add to cart
  • राज्यशास्त्रातील संशोधन पद्धती

    संशोधन ही सतत चालणारी बौद्धिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत जुन्या त्रुटी दूर करून नवीन वस्तुस्थिती कोणताही पुर्वग्रह मनाशी न बाळगता मांडली जाते. जे साध्य व सिद्ध करायचे असते यासाठी विशिष्ट साधनांचा अथवा रचनांचा भौतिकशास्त्रात ज्या पद्धतीने अवलंब केला जातो तोच फरक हा संशोधनाचे तंत्र व संशोधन पद्धतीमध्ये दिसून येतो. राजकीय अथवा सामाजिक संशोधनात संशोधनाचा अभ्यास, विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सर्वांचा सारखाच असत नाही. संशोधनात आपल्या उद्दिष्टाशी, दृष्टीकोनाशी नेहमीच कटिबद्ध रहावे लागते. हा दृष्टीकोन ऐतिहासिक, तुलनात्मक, विश्लेषणात्मक, रचनात्मक, कार्यात्मक यापैकी कोणताही असू शकतो. संशोधनात बुद्धीनिष्ठता, वस्तुनिष्ठता, तर्कशुद्धतेचा विशेष अवलंब केला जातो.

    सामाजिक शास्त्रातील संशोधनामध्ये संशोधकाचा संबंध हा वास्तविक घटनांशी तसेच सजीव व्यक्तीशी येत असतो. राज्यशास्त्रातील संशोधनामध्ये प्रतीकांची व तथ्यांची हाताळणी व पडताळणी सहेतुक पद्धतीने करावी लागते. विशिष्ट वस्तू किंवा व्यवस्थेविषयी, समस्येविषयी डोक्यात येणारी कल्पना म्हणजे ढोबळ मानाने संकल्पना होय. या संकल्पनेचे अवलोकन करून संशोधक निष्कर्ष काढत असतो. हे निष्कर्ष संशोधनाचे स्वरूप ठरविण्यासाठी महत्वाचे असते. संशोधनात कोणतीही घटना किंवा प्रसंग भावनेच्या चष्म्यातून पाहिला जात नाही. तर वारंवार त्याची पडताळणी केली जाते आणि मगच तथ्यापर्यंत पोहचता येते.

    सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घटनांची वास्तवता कशी शोधावी, राजकीय घटना अथवा घडामोडींचा अन्वयार्थ कसा लावावा, राजकीय सिद्धांताची मांडणी कशी करावी, राजकीय तसेच त्या अनुषंगाने सामाजिक स्वरूपाची गृहीतके कशी मांडावीत तसेच त्यांची पडताळणी करून निष्कर्षाची मांडणी कशा पद्धतीने करावी यासाठी प्रस्तुत ग्रंथ उपयोगी आहेच त्याचबरोबर संशोधनाची ओळख, त्यांचे स्वरूप, संशोधनाची वैशिष्ट्ये, आव्हाने, समस्या व संशोधनाच्या पद्धती, त्याची गृहीतके तसेच ध्येय आणि उद्दिष्टांच्या माहितीचे स्पष्टीकरण यांचेही मुद्देसूद विवेचन शास्त्रीय पद्धतीने केले आहे.

    Rajyashastratil Sanshodhan Paddhati

    110.00
    Add to cart
  • ललितरंग

    सदर पुस्तकात सात लेखकांच्या ललित गद्य लेखनाचा समावेश केला आहे. ‘स्त्रीविषयक ललित गद्य’ असे सदर पुस्तकातील ललित गद्याचे विशिष्ट असे सूत्र आहे. स्त्री आणि पुरुष दोहोंचा म्हणजे ‘मी’चा लेखनातून व्यक्त होणारा स्त्रीविषयक दृष्टिकोन, त्या अंगाने घटना-प्रसंग, व्यक्ती याबाबत ‘मी’चे व्यक्त होणे, भावनात्मकता आणि चिंतनशीलता यातून स्त्रीविषयक अनुभवाचा अन्वयार्थ लावू पाहणे या सगळ्या बाबी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून स्त्रीविषयक ललित गद्याचे सूत्र केंद्रस्थानी ठेवून सदर पुस्तक आकारास आले आहे. लेखक स्त्री असो वा पुरुष, दोहोंच्या निवडक ललित गद्य लेखनाचा अंतर्भाव येथे केला आहे. महत्त्वाचे म्हणजे समकाळातील, म्हणजे साधारणपणे 1990 नंतरच्या कालखंडातील लेखकांचे हे ललित गद्य लेखन आहे. साहित्य, सामाजिक चळवळ, चित्रपट, पत्रकारिता अशा जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये आपला स्वयंपूर्ण ठसा उमटविणार्‍या व्यक्तित्वांची-त्यांच्या संवेदना आणि विचारांची ही ललित गद्यात्मक अभिव्यक्ती आहे.

    Lalitrang

    95.00
    Add to cart
  • ललितरंग आकलन व आस्वाद

    ‘आठवणी’, ‘अनुभव’, ‘लघुनिबंध’, ‘प्रवासलेख’, ‘व्यक्तिचित्रे, ‘ललितलेख’ यांचा समावेश ललित गद्यात होतो. ‘ललितरंग आकलन व आस्वाद’ या पुस्तकात ‘ललितरंग’ या पुस्तकातील लेखांचा आढावा घेतला आहे. स्त्री विषयक ललित गद्य हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. या पुस्तकात आलेल्या लेखातून स्त्री व पुरुष या दोघांचा स्त्री विषयक दृष्टीकोन वर्णन केला आहे. यात ‘मी’ अनुभवाचे स्वरूप सांगितले आहे. ‘मी’ ने जे अनुभवले त्याचे वास्तव वर्णन यात केले आहे. प्रस्तुत लेखनातून भावनात्मक व चिंतनशील अशी वर्णने आली आहेत. तसेच राबणारी, कष्ट करणारी, घर-संसार सांभाळणारी अशा वेगवेगळ्या स्वरूपात स्त्री चे दर्शन घडवले आहे. भाषा व शैली विशेष हे या पुस्तकाचे वेगळेपण आहे.

    Lalitrang Aakalan V Aaswad

    135.00
    Add to cart
  • लेखनकौशल्य मुद्रितशोधन व सर्जनशील लेखन

    ‘लेखनकौशल्य – मुद्रितशोधन व सर्जनशील लेखन’ हा ग्रंथ अनेकांगांनी महत्त्वपूर्ण आहे. मुद्रितशोधन हे लेखन कौशल्याचे महत्त्वाचे अंग आहे. किंबहुना ती भाषासंवर्धन व संरक्षण करणारी महत्त्वाची भाषिक संस्था आहे. प्रस्तुत ग्रंथ यशस्वी, उत्तम मुद्रितशोधक घडविण्यासाठीच्या प्रयत्नांचा महाप्रयत्न आहे. मुद्रितशोधन कौशल्यासाठी आवश्यक ज्ञानाच्या बाजू म्हणजे मुद्रितशोधनाचे स्वरूप, मुद्रितशोधनाचा सातत्यपूर्ण सराव यांचा समावेश या ग्रंथात असल्याने मुद्रितशोधन कौशल्याबाबतचे अ ते ज्ञ म्हणजे हा ग्रंथ होय. मुद्रितशोधनाची प्रक्रिया, विरामचिन्हांचे मुद्रितशोधनातील महत्त्व, अचूक शब्दलेखन, लेखनातल्या चुकांमुळे होणारे अर्थबदल, प्रात्यक्षिकांसाठी भरपूर उतारे ही या ग्रंथाची केवळ जमेचीच बाजू नसून मुद्रितशोधनासंदर्भातला ग्रंथ कसा कमाल स्तरावर पूर्णत्व पावलेला असावा, याची साक्ष देणाराही आहे.
    सर्जनशील लेखनाचे स्वरूप, त्याची अंत: व पृष्ठ स्तरावरून सिद्ध होणारी वैशिष्ट्ये वाचक व अभ्यासकांस अवगत व्हावीत, कथालेखनाची, नाट्यलेखनाची निर्मितिप्रक्रिया नेमकी कशी घडून येते हे त्यांस आकलन व्हावे, या विशुद्ध सारस्वतीय भूमिकेतून या ग्रंथाचे लेखन झाले आहे. सर्जनशील लेखनामागील निर्मितिप्रक्रिया, प्रेरणा, याबद्दल फारशी माहिती उपलब्ध होत नाही, ही मोठी उणीव या ग्रंथाने भरून काढली आहे. सर्जनशील लेखनाची पृथगात्मता, सर्जनशीलतेसंदर्भातील संभावित पैलूंची मीमांसा, भाषेतील सर्जनशीलता, कलावंतांची सर्जनशीलता, विज्ञानातील सर्जनशीलता, साहित्यातील सर्जनशीलता, सर्जनशीलतेची वैशिष्ट्ये, सर्जनशीलतेची अभिव्यक्ती, सर्जनशील लेखन करताना येणार्‍या अडचणी असा बहुआयामी सर्जनविचार हा ग्रंथ मांडतो.
    भाषा पदवीधरांना रोजगार मिळणे ही बाब भाषा अध्यापनाच्या अस्तित्वाशी निगडित आहे. त्यासाठी भाषिक कौशल्ये अवगत असणारा विद्यार्थी घडविणे हे सांस्कृतिक कर्तव्य आहे. हे कर्तव्य तत्परतेने पार पाडण्यासाठी डॉ. संदीप माळी आणि प्रा. समाधान पाटील लिखित ‘लेखनकौशल्य : मुद्रितशोधन व सर्जनशील लेखन’ या ग्रंथाचे स्वागत आहे.

    – प्रा.डॉ. फुला बागूल

    Lekhan Kaushalya Mudritshodhan V Sarjanshil Lekhan

    120.00
    Add to cart
  • लोकरंगभूमी

    लोकसाहित्य अभ्यासाची एक महत्वपूर्ण शाखा असलेली ‘लोकरंगभूमी’ आजच्या विज्ञानवादी युगात महत्वाची ज्ञानशाखा म्हणून पुढे आलेली आहे. मानवाच्या सांस्कृतिक उत्क्रांतवस्थेत लोकसाहित्याचा महत्वाचा वाटा आहे. निसर्गाच्या अलौकिक रूपाच्या आर्त आळवणीतून लोकसाहित्य जन्मले. व्यक्त होणे ही मानवी प्रवृत्ती. व्यक्त होण्यामागे मानवी भावनांचा कार्यकारण भाव असतो. भावनांची अभिव्यक्ती केवळ मौखिक नसते तर ती शारीर पातळीवरही असते. म्हणूनच निसर्ग पूजनाच्या मौखिकतेला शारीरिक अभिव्यक्तीने दृश्यरूप दिले. त्यातूनच लोककलांचा म्हणजेच लोकरंगभूमीचा जन्म झाला. रंजन करणे हाच केवळ लोकरंगभूमीचा उद्देश्य नव्हता तर उदात्त मानवी मुल्यांच्या प्रसारासाठी म्हणजेच प्रबोधनासाठीही लोकरंगभूमी झटलेली पाहावयास मिळते. धार्मिक विधीनाट्य ते रिंगणनाट्यापर्यंतचा प्रवास पाहिला तर संत नामदेव म्हणतात त्याप्रमाणे ‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ।’ हा प्रबोधनाचा वसा लोकरंगभूमीने सोडलेला नाही.

    – डॉ. अक्षय घोरपडे

    Lokrangbhumi

    175.00
    Add to cart
  • लोकसंख्या भूगोल

    Loksankhya Bhugol

    175.00
    Add to cart
  • लोकसंख्या भूगोल

    नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 मधील तरतूदींच्या अनुषंगाने आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आकृतीबंधानुसार व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या अभ्यासक्रमानुसार तसेच महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर पदवीच्या सुधारित अभ्यासक्रमाचा समावेश असलेले ‌‘लोकसंख्या भूगोल’ हे पुस्तक विद्यार्थी मित्र, अभ्यासक आणि प्राध्यापक बंधू-भगिनींच्या हाती सुपूर्द करतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
    सुजान वाचक मित्रहो, कोणत्याही देशाची लोकसंख्या ही त्या देशाच्या प्रगतीतील एक प्रेरक शक्ती असते किंबहुना ही त्या देशाची एक महत्त्वाची साधनसंपत्ती मानली जाते. परंतु आधुनिक काळात झालेली लोकसंख्या वाढ ही एक चिंतनाचा विषय ठरत आहे. कारण 21 व्या शतकात जगातील लोकसंख्या वाढीने विस्फोटक रूप धारण केले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाय शोधणे हे लोकसंख्या भूगोलाचे महत्त्वाचे कार्य आहे. म्हणून लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास करणे ही काळाची गरज बनली. या सर्व बाबींचा विचार करून आम्ही ‌‘लोकसंख्या भूगोल’ हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे.
    प्रस्तुत पुस्तकामध्ये लोकसंख्या भूगोल ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी लोकसंख्या भूगोलाची व्याख्या, स्वरूप व व्याप्ती आणि लोकसंख्या सामग्रीचे प्रकार आणि स्त्रोत, लोकसंख्या घनता, घनतेचे प्रकार आणि लोकसंख्या सिद्धांत, भारताचे व जागतिक लोकसंख्या वितरण, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक, लोकसंख्येची संकल्पना आणि 2000 चे भारताचे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, जनन, मर्त्यता आणि स्थलांतर, लोकसंख्या रचना आणि वैशिष्टे – यात लिंगरचना, वयरचना, भारतातील लिंगरचना, वैवाहिक स्थिती, साक्षरता आणि 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील धार्मिक स्थिती इत्यादी घटकांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
    विद्यार्थ्यांना व वाचकांना सहज समजेल अशी सोपी आणि ओघवती भाषा, अतिशय योग्य पद्धतीने विषयाचमी मांडणी, विषयाच्या मांडणीसाठी आवश्यक तेथे आकृत्या व नकाशे हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. म्हणून प्रस्तुत पुस्तक केवळ विद्यापीठ व महाविद्यालयीन अभ्यासक्रमापुरता मर्यादित न राहता भूगोलप्रेमी अभ्यासक, विद्यार्थी आणि सर्व सुजाण वाचक यांना उपयुक्त ठरेल यादृष्टीने प्रयत्न करण्यात आलेले आहे.

    210.00
    Add to cart
  • वित्तीय साक्षरता

    वित्तिय साक्षरता आणि वित्तीय समावेशन हा आधुनिक माहिती व तंत्रज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थांचा मुलभूत भाग झाला आहे. आधुनिक काळात प्रत्येक नागरिकास आपली आर्थिक प्रगती करण्याचा ध्यास असतो. प्रत्येक व्यक्ती पैसा/उत्पन्न प्राप्त करण्यासाठी शारीरीक आणि बौद्धिक श्रमात सहभाग घेतात. असं मानलं जात की पैसा कमावण्यापेक्षा तो जतन करणे आणि त्यात वाढ करणं जास्त कौशल्यपूर्ण आहे. हे कौशल्य ज्याने आत्मसात केले तो निश्चितच प्रगती करतो. वर्तमान बरोबर भविष्याची चिंता हा मानवाचा स्थायी भाव आहे. चालू उत्पन्नाचा मोठा हिस्सा उपभोगावर खर्च करुन थोडी-थोडी बचत केली, तिची गुंतवणूक केली, संपत्ती निर्मिती केली. भविष्य निश्चितच उज्वल होईल. याची जाणीव वित्तीय साक्षरता निर्माण करते. वित्तीय साक्षरतेतून व्यक्तीस बँकींग व्यवहार करता येतात, पैशांचे हस्तांतरण करता येते, पैशाची योग्य गुंतवणूक करता येते. पण यासाठी देशातील बँकींग व शेअर बाजाराचा विकास आणि विस्तार आवश्यक आहे. भारताला 2025 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी आणि चौथ्या क्रमांकाची मोठी आर्थिक सत्ता होण्यासाठी वित्तीय साक्षरता आवश्यक आहे.

    250.00
    Add to cart
  • विपणन आणि जाहिरात

    विपणन आणि जाहिरात या पुस्तकामध्ये विपणनाचा परिचय- व्याख्या, महत्व, प्रक्रिया अणि कार्ये, ग्रामीण आणि हरित विपणनाचे स्वरूप, बाजारपेठेचे विभागीकरण व ग्राहक वर्तनाचे विश्लेषण, जाहिरातीचा परिचय – जाहिरात म्हणजे काय, तिचे प्रकार आणि आराखडे, जाहिरात मसुदा आणि अंदाजपत्रकाचे महत्त्व, जाहिरातींवर नियमन आणि नियंत्रण, उत्पादन जीवन चक्र, विपणन व्यूहरचना, आणि नेटवर्क विपणन, जाहिरात क्षेत्रातील नैतिकता आणि नियामक संस्था याबद्दल सखोल माहिती दिली आहे. भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या संदर्भात विचारशील बनवण्यास मदत करेल. तसेच विद्यार्थ्यांना विपणन आणि जाहिरात क्षेत्रात ज्ञान मिळवण्यासाठी उपयुक्त ठरेल.

    160.00
    Add to cart
  • विपणन व्यवस्थापन

    विपणन व्यवस्थापनाला वाढते महत्व प्राप्त झालेले आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण विकास व वृद्धी यामध्ये व्यवसायाची महत्वपूर्ण भूमिका आहे आणि व्यवसायासाठी विपणन व्यवस्थापनाची भूमिका सर्वांनीच मान्य केलेली आहे.
    विपणनाची व्याप्ती व्यापक आहे. विपणनाची विविध अंगे जसे सेवा विपणन, ग्रामीण विपणन, आंतरराष्ट्रीय विपणन यांच्यावर प्रकाशझोत टाकण्याचा या पुस्तकाचा हेतू आहे. हे पुस्तक विद्यार्थीकेंद्रीत व अभ्यासकांना उपयुक्त असे आहे. यामध्ये सेवा विपणन, ग्रामीण विपणन व आंतरराष्ट्रीय विपणनाचा अर्थ, व्याख्या, महत्व, विपणन मिश्र, त्याची उपयुक्तता, किमतनिश्चिती प्रक्रिया इ. बाबींचे विस्तृत विवेचन आहे. या संकल्पना समजण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

    Vipanan Vyavsthapan

    225.00
    Add to cart
  • विपणन व्यवस्थापन-II (ग्राहक वर्तणूक)

    आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात विपणन व्यवस्थापनाचे महत्व सर्वमान्य आहे आणि विपणनाचा गाभा म्हणजे ग्राहक होय. अस्तित्वात असलेले आणि संभाव्य ग्राहककेंद्रित असे विपणन धोरण आखावे लागते. त्यासाठी ग्राहक वर्तणूकीला वाढते महत्व प्राप्त झालेले आहे.
    ग्राहक वर्तणूकीची संकल्पना अतिशय व्यापक आहे. ग्राहकांचे मानसशास्त्र, विपणन संदेशवहन आणि ग्राहक वर्तणूकीला प्रभावित करणारे घटक यांच्यावर प्रकाशझोत टाकण्याचा या पुस्तकाचा हेतू आहे. यामध्ये व्यक्तिगत आणि औद्योगिक ग्राहक निर्णय प्रक्रिया, ग्राहक मूल्य, ग्राहकांचे विवध प्रकार, ग्राहक वर्तणूक आणि पर्यावरणीय घटक इ बाबींचे सविस्तर विवेचन दिलेले आहे. त्याचबरोबर खरेदी, विक्री, ग्राहक, उपभोक्ता, मूल्य, किंमत, समाधान, ग्राहक भूमिका यासारख्या संकल्पना सोप्या भाषेत मांडण्याचा हा एक प्रयत्न आहे.

    Vipanan Vyavsthapan – II (Grahak Vartanuk)

    150.00
    Add to cart
  • व्यवसाय प्रशासन (भाग 1)

    Vyavsay Prashasan (Bhag 1)

    275.00
    Add to cart
  • व्यवसाय प्रशासन (भाग 2)

    Vyavasay Prashasan (Bhag 2)

    275.00
    Add to cart
  • व्यवसाय व्यवस्थापन (T.Y.B.Com)

    Vyavasay Vyavasthapan

    350.00
    Add to cart