• आधुनिक जाहिरात तंत्र

    आजच्या स्पर्धाच्या युगात जाहिरात कार्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. जाहिरात सेवेला जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरण धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील होणारे बदलाचे पडसाद व्यवसायामध्ये दिसून येतात. प्रत्येक उत्पादक आणि व्यावसायिक संस्था आपल्या विक्रय वस्तूंच्या जाहिरातवर मोठ्या प्रमाणावर खर्च करतांना दिसून येतात. अलिकडे जाहिरात हा खर्च नसून ती दीर्घकालीन गुंतवणूक समजली जाते. जाहिरातीमध्ये सुरक्षितता, सौंदर्य, आरोग्य, आत्मविश्वास, प्रेम, वात्सल्य, चिंता इ. क्रयप्रेरणांपैकी योग्य खरेदी प्रेरणाव्दारे आवाहन केले जाते. वस्तू व सेवांची माहिती विविध जाहिरातीच्या माध्यमाद्वारे ग्रहकांच्या मनावर आघात करीत असते. आजच्या स्पर्धायुक्त बाजारपेठेत, वस्तू किंवा सेवांची विक्री वाढावी बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी आणि बाजारपेठेतील हिस्सा वाढविण्यासाठी जाहिरात करणे आवश्यक असते.

    Aadhunik Jahirat Tantre

    195.00
    Add to cart
  • आधुनिक बँकिंग व वित्तीय प्रणाली

    Aadhunik Banking v Vittiy Paddhati

    195.00
    Add to cart
  • आधुनिक बँकींग आणि भारतीय वित्तीय बाजार

    आजच्या प्रगत काळात दिवसेंदिवस बँक व्यवहाराचे व वित्तीय बाजाराचे महत्त्व वाढत आहे. अर्थव्यवस्थेत बँका व वित्तीय संस्थांचा जस-जसा विकास आणि विस्तार होत जातो, तस-तसा आर्थिक विकासाचा वेग वाढत जातो. अर्थव्यवस्थेत अतिरिक्त निधी गोळा करण्याचे व तो गतिशील करण्याचे कार्य बँका व वित्तीय संस्था करीत असतात. अर्थव्यवस्थेत बँकांचे महत्व अनन्य साधारण आहे. बँक जे व्यवहार करते त्यात बरीच जोखीम असते. त्या जोखीमचे व्यवस्थापन करावे लागते. भारतासह जगातील सर्वच बँक व्यवसायामध्ये नवतंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. यात प्रामुख्याने बँकांचे संगणकीयीकरण, इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींग, कोअर बँकींग, एटीएम, डेबीट कार्ड, टेली बँकींग, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, इलेक्ट्रॉनिक क्लिअरींग सर्व्हिस, स्वीफ्ट, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, रियल टाईम ग्रास सेटलमेंट, नॅशनल सेटलमेंट सिस्टीम, ई-परचेस, ई-मनी, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर अ‍ॅट पाँईट ऑफ सेल इत्यादी साधनांचा वापर केला जात आहे. प्रतिभूती बाजार हे वित्तीय बाजाराचे एक अभिन्न अंग आहे. वित्तीय बाजारात अल्पकालीन आणि दिर्घकालीन कर्जाची देवाण-घेवाण केली जाते. नाणेबाजारात अल्पकालीन कर्जाची देवाण घेवाण चालते. यासाठी अल्पसूचनेद्वारे परत मिळणारी कर्जे, कोषागार हुंड्या, व्यापारी हुंडया या साधनांचा वापर केला जातो. भांडवल बाजार दीर्घकालीन कर्जे, गुंतवणूक देवाण घेवाण केली जाते.
    प्रस्तुत पुस्तकात आधुनिक बँकींग व वित्तीय बाजाराची इत्यंभूत माहिती देण्याचा यथोचित प्रयत्न केला आहे.

    Adhunik Banking Ani Bharatiya Vittiya Bajar

    325.00
    Add to cart
  • आधुनिक भारताचा इतिहास (इ.स. 1857 ते 1950)

    आधुनिक भारताचा इतिहास (इ.स. 1857 ते 1950) या ग्रंथात भारतात युरोपियनांच्या आगमनापासून तर त्यांच्या सत्ता स्थापनेपर्यंतचा इतिहास आलेला आहे. भारतातील ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेमुळे भारतात झालेल्या अन्याय-अत्याचाराची कहाणी व त्यातून उद्भवलेला 1857 चा उठाव या उठावाची कारणे व परिणामांची यथोचित चर्चा करण्यात आलेली आहे. एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारक, धर्मसुधारक, पंडिता रमाबाई यांचे कार्य, यांच्या माहितीसह काँग्रेसची स्थापना, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, भारतातील महान क्रांतिकारकांचे योगदान, भारताची फाळणी आणि भारतीय स्वातंत्र्य उदय याची माहिती यथोचित दिलेली आहे. भारत गणराज्य बनण्याला यावर्षी (26 जानेवारी 2023) 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या राज्यघटना निर्मितीचा प्रवास व वैशिष्ट्यांची माहितीही या ग्रंथातून विद्यार्थी आणि अभ्यासकांना होणार आहे.

    325.00
    Add to cart
  • आधुनिक भारताची लष्करी व्यवस्था (1947 पर्यंत)

    भारतातील ‌‘क्षात्र वृत्ती’ हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. मौर्य, गुप्त, चौल अशा असंख्य राजवटींनी भारताबाहेरही आपली सत्ता प्रस्थापित केल्याचे इतिहासात पदोपदी उल्लेख आढळतात. राजपूत, शीख, जाट, गोरखा मराठा, डोगरा, गढवाली व दक्षिणेतील नायर-कुर्ग, आग्नेय भारतातील नागा व मिझो जमाती शौर्याबद्दल प्रसिद्धच आहेत. भारतीयांच्या एकतेअभावी परकियांना या देशावर राज्य निर्माण करणे शक्य झाले. समुद्रमार्गे आलेल्या पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रज यांच्या सागरी शक्तींकडे भारतीय राजांनी खूप दुर्लक्ष केले. अपवाद फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा. महाराजांनी मोठ्या महत्प्रयासाने, दूरदृष्टिने उभारलेले मराठी आरमार पेशव्यांनी बुडविल्याने इंग्रजांना प्रतिकार करणारी सागरी सत्ताच उरली नाही. 1857 च्या सशस्त्र क्रांतीनंतर भारतातील कंपनी कारभाराला खीळ पोहचली. शिस्तबद्ध, आक्रमक, अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त अशा ब्रिटीशांनी स्थानिक लोकांचेच सैन्य उभारून भारतीय सत्तांचा पराभव करीत देशाला गुलामगिरीकडे ढकलले. 20 व्या शतकातील जागतिक महायुद्धांमध्ये भारतीय सैनिकांनी निर्णायक भूमिका बजावून आपले कर्तृत्व सिद्ध केले.

    Aadhunik Bharatachi Lashakri Vyavsatha (1947 Paryant)

    185.00
    Add to cart
  • आधुनिक युरोपचा इतिहास (इ.स. 1780 ते 1945)

    मध्ययुगात युरोप हा धर्मगुरू व राजा यांच्या गुलामगिरीत वाढलेला. इंग्लंडने गुलामगिरीचे सर्वप्रथम उच्चाटन केले. फे्रंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्रवाद व राज्यघटनेचे महत्त्व विशद केले. वैज्ञानिक शोधांमुळे ‘औद्योगिक क्रांती’ युरोपमध्ये उदयास आली. वसाहतीच्या शोधामुळे युरोपमध्ये विनाशकारी साम्राज्यवादाचा उदय झाला. संपूर्ण जगाला विनाशाच्या गर्तेत फेकणार्‍या दोन्ही महायुद्धांना युरोप कारणीभूत ठरले. दोन्ही महायुद्धात प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी, आर्थिकहानी झाली. मानवजातीचा समूळ विनाश करणार्‍या विध्वंसकारी अणुबॉम्बचा शोध याच काळात लागला. महायुद्धांतील संहारक अस्त्रांमुळे मानव जात स्तब्ध झाली. जगात पुन्हा महायुद्ध होऊ नये, विध्वंसकारी अणुबॉम्बच्या वापरास निर्बंध घालावा तसेच शांततापूर्ण सहकार्य यासाठी यूनो या जागतिक दर्जाच्या संघटनेची निर्मिती झाली.
    प्रस्तुत पुस्तकात इंग्लंडमधील लोकशाही, फे्रंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती, साम्राज्यवाद, राष्ट्रवाद, राष्ट्रसंघ व संयुक्त राष्ट्र संघटना यांची निर्मिती, रशियन राज्यक्रांती, फॅसिझम, नाझीझम, तुर्कस्थानचे आधुनिकीकरण इ. महत्त्वपूर्ण मुद्द्यांचे सविस्तर विवेचन केलेले आहे.

    Aadhunik Yuropcha Itihas (A.D. 1780 – 1945)

    225.00
    Add to cart
  • आधुनिक विपणन तंत्र

    विपणन हे व्यवसायाचे एक कार्य आहे. आजच्या जागतिकीकरण, उदारीकरण व खाजगीकरण यामुळे बाजारपेठ क्षेत्र आंतरराष्ट्रीय झाले आहे. बाजारपेठ क्षेत्रात तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. बाजारपेठेत सर्वत्र असंख्य ग्राहक विखुरलेले असतात. त्यांच्या आवडीनिवडी आणि गरजा सारख्या नसतात. खरेदीदाराची वर्तणूक एक शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. प्रमाणित वस्तू जीवन चक्रामध्ये प्रवर्तन, विकास, परिपक्व आणि समाप्ती अशा चार अवस्था आहे. नेटवर्क विपणनात काम करणारे सर्व व्यक्ती एक दुसऱ्यासोबत साखळीसारखे जोडलेले असतात. आज जगभरात माहिती तंत्रज्ञानाचा वापर मानवी जिवनाच्या विविध क्षेत्रात केला जात आहे. बाजारपेठेत विविध कंपन्यांच्या व नाना तऱ्हेच्या आकर्षक वस्तू येऊ लागल्यामुळे स्पर्धेचे स्वरूप तीव्र होऊ लागले. वस्तू आणि सेवेचे विपणन गतीमान करण्यासाठी माहितीचा देवाण-घेवाणासाठी परंपरागत माध्यमाचा वापर न करता आधुनिक माहिती तंत्रज्ञानावर आधारलेल्या सोशल मीडियाचा वापर करतात.

    Andhunik Vipanan Tantre

    235.00
    Add to cart
  • आधुनिक समाजमाध्यमांचा परिचय

    आधुनिक समाजमाध्यमेही आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आहेत. फेसबुक, युट्युब, व्हॉटस्‌‍अप, ट्विटर (एक्स), इंस्टाग्राम, ब्लॉग या आधुनिक समाजमाध्यमांनी पारंपारिक मुद्रित व दृकश्राव्य माध्यमांसमोर केवळ आव्हानच उभे केले नाही तर या समाजमाध्यमांना अधिक विकसित व प्रगत बनवले. 24 तास चालणाऱ्या या माध्यमांनी चकचकीतपणा, आकर्षक मांडणी व तांत्रिकतेमुळे सर्वसामान्यांवर भुरळ पाडली. या माध्यमांशिवाय आजच्या आधुनिक जीवनाचा विचारच करता येत नाही. म्हणून ही माध्यमे समजावून घेणे आणि त्यावर कसे अभिव्यक्त व्हावे हे जाणून घेणे गरजेचे आहे. या माध्यमांसाठी लेखन कसे करायचे? या लेखनाचा आकृतिबंध कसा आहे? त्यासाठी कोणते तंत्र व कोणती पथ्ये पाळावयाची याची माहिती सदर पुस्तकातून प्राप्त होते. नवागतांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.

    100.00
    Add to cart
  • आनंद आणि निरामय स्वास्थ्याचे मानसशास्त्र

    शोपन हॉवर सारख्या टोकाच्या निराशावादी तत्त्वज्ञानापासून ते अनेक वैश्विक तत्त्वज्ञानाचे सार दर्शविते की “दु:खम सर्वम्‌‍” अर्थात ‌‘संसार-जीवन दु:खमय आहे.’ सिग्मड फ्राईड या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाच्या मते, मानव सुख तत्त्वावर काम करतो. प्रत्येकाला जीवनात सुख-आनंद हवा असतो. दु:ख, दु:खाची कारण राहणारच, पण दु:खातही सुख शोधण्याची दृष्टी सकारात्मक मानसशास्त्रातून अभ्यासली जाते. स्थितीस्थापकत्त्व भाव अंगीकारुन फिनीक्स पक्षांसारखे उभे रहा! दुर्दम्य इच्छाशक्ती, आशावादी वृत्ती आणि कणखरपणाच्या बळावर व्याधीवर मात करा! धैर्य आणि चिकाटीच्या बळावर कठिणतम निर्धारित ध्येय साध्य करा. प्रामाणिकपणा, सामंजस्य, उच्च नैतिक मूल्य अंगिकारुन जीवनात यशस्वी व्हा! भावनिक बुद्धिमत्ता साकारुन स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि इतरांच्या भावना जाणून सहानुभूतीपूर्ण व्यवहार करा! कृतज्ञताभाव आणि क्षमाशील वृत्तीतून इतरांप्रतीचा राग, द्वेष भावना मनातून हद्दपार करा! विचारात नाविण्यपूर्णता, खुलेपणा आसू द्या! सौंदर्यदृष्टी दर्शवून फ्लो आणि सेव्हरिंग अनुभवातून जीवनात पुरेपूर आनंद मिळवा. जीवनात सकारात्मक भावनांचे प्राबल्य दिसू द्या. मनोसजगता सारख्या ध्यानतंत्राद्वारा कटू, दु:खद नकारात्मक विचारांकडे स्थितप्रज्ञवृत्तीने पाहण्यास शिकून मन:शांती मिळवा! यातूनच जीवन आनंदमय होईल आणि निरामय स्वास्थ्य लाभेल. हेच सकारात्मक मानसशास्त्राचे सार या आवृत्तीतून प्रस्तुत करण्याचा प्रयास आहे.
    सर्व लिखाण बामगार्डनर आणि मँरी क्रोथर्स च्या ‌‘सकारात्मक मानसशास्त्र’ तसेच स्नायडर आणि लोपेझचे ‌‘हँडबुक ऑफ पॉझिटिव्ह सायकालॉजी’ या पुस्तकांच्या आधारे केलेले आहे.

    120.00
    Add to cart
  • आपत्ती व्यवस्थापन

    Apatti Vyavasthapan

    175.00
    Add to cart
  • आरोग्य, योग आणि शारीरिक शिक्षण

    Arogya, Yog Ani Sharirik Shikshan

    375.00
    Add to cart
  • आर्थिक भूगोल

    ‘आर्थिक भूगोल’ ही मानवी भूगोलाची एक महत्वाची शाखा असून भूगोलशास्त्राच्या अभ्यासात या ज्ञानशाखेच्या अध्ययन-अध्यापनास अनन्य साधारण महत्व आहे. बदलत्या परिस्थितीत विविध उपक्रमांचे आर्थिक नियोजन करणे हा आर्थिक भूगोलाचा महत्त्वाचा उद्देश आहे. एखाद्या भूभागाची प्रगती व विकास नेहमीच सुबध्द नियोजनाव्दारेच घडून येतो. आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर, आपण आपल्या उपलब्ध साधनसामग्रीचा आढावा घेणे गरजेचे असते. आपण कोणत्या उत्पादनांमध्ये सक्षम आहोत व कोठे कमी पडतो? यावर विचार करणे आवश्यक आहे. त्यानुसार विकासाची दिशा ठरविण्यास मदत होते. साधनसंपत्तीचा अंदाज व्यक्त करण्यासाठी आर्थिक भूगोलाचा उपयोग होऊ शकतो. सर्वसाधारणपणे विविध मार्गाद्वारे उपाय योजून, मानव स्वत:च्या आर्थिक, सामाजिक व बौद्धिक गरजा भागवितो त्यास आर्थिक क्रिया असे म्हणतात.
    उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर विविध प्रकारच्या प्राकृतिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय घटकांचा परिणाम होतो. या घटकांचे प्रमाण व स्वरूप सर्वदूर सारखे आढळत नाही. परिणामी उद्योगधंद्यांचा विकास सर्वदूर सारखा झालेला दिसून येत नाही. उद्योगधंद्यांच्या स्थानावर परिणाम करणार्‍या या विविध घटकांचा पद्धतशीर अभ्यास करून जर्मन अर्थशास्त्रज्ञ ऑल्फ्रेड वेबर यांनी 1909 मध्ये उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणाच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण सिद्धांत मांडला. त्यास ‘ऑल्फ्रेड वेबरचा सिद्धांत’ असे म्हणतात. कोणताही उद्योग उभारतांना किमान उत्पादन खर्च लागेल असे स्थान शोधण्यासाठी हा सिद्धांत अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे या सिद्धांतास ’ङशरीीं उेीीं चेवशश्र’ म्हणूनही संबोधले जाते. देशाचा आर्थिक विकास त्या देशातील उपलब्ध खनिजसपंत्तीवर आणि उद्योगधंद्यांच्या विकासावर अवलंबून असतो.

    Arthik Bhugol

    160.00
    Add to cart
  • इतिहास : अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अभ्यास

    Itihas – AbhyaItihas – Abhyasakram Aani Adhyapanshastriya Abhyas – IIsakram Aani Adhyapanshastriya Abhyas – II

    245.00
    Add to cart
  • इतिहासातील संशोधन पद्धती

    इतिहासकार कसा असावा याबाबत महान इतिहासकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,
    इतिहासकार हा काटेकोर, तळमळीचा आणि पंक्तिप्रपंच न करणारा असा असला पाहिजे. भावनाविरहित, आपुलकिची भावना, भीती, तिरस्कार किंवा प्रेमाची ओढ यांच्यापासून मुक्त असा असला पाहिजे. इतिहासाची जननी जी सत्यनिष्ठा ती त्याच्या रोमारोमात भिनलेली असली पाहिजे. महत्कृत्यांना सुरक्षित ठेवणारा, अंधाराचा संहार करणारा, पूर्वकाळाचा साक्षी आणि भावी काळाचा नेता असा असला पाहिजे. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे अगदी रिकामे नसणारे नव्हे पण उघडे असणारे त्यांचे मन पाहिजे. खोटे-नाटे पुरावे जरी त्याच्या हाती लागले तरी त्या सर्व पुराव्यांची छाननी करण्याची त्याची तयारी पाहिजे म्हणजे सत्यानिष्ठा हा इतिहासाचा आत्मा असतो. डॉ. आंबेडकरांनी भारतीय इतिहासावर जे लिखाण केले ते वस्तुनिष्ठता व सत्यनिष्ठेने केले.

    डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
    (शुद्र मूळचे कोण होते)

    Itihaas Sanshodhan Paddhati

    150.00
    Add to cart
  • उद्योजकता व्यवस्थापन

    Udyojakta Vyavsthapan

    295.00
    Add to cart
  • औद्योगिक अर्थशास्त्र

    आधुनिक काळात औद्योगिक व आर्थिक विकासात उद्योगधंद्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची समजली जाते. आधुनिक काळात ‘औद्योगिक अर्थशास्त्र’ हा विषय विकसित होत आहे. 1930 च्या जागतिक महामंदीच्या काळात औद्योगिक अर्थशास्त्र प्रस्थापित झाले. इंग्लंड, अमेरिका या देशांमध्ये मोठे उद्योग, व्यवस्थापक आणि व्यवस्थापन कार्ये यांचे महत्त्व वाढल्यामुळे औद्योगिक अर्थशास्त्र असेही म्हणतात. म्हणून उद्योग आणि उद्योगासंबंधीचे घटक या विषयीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच औद्योगिक अर्थशास्त्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

    या पुस्तकात औद्योगिक अर्थशास्त्राची व्याप्ती, आवश्यकता, महत्त्व याबरोबरच औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक, उद्योग संस्थेची वर्तवणूक, संगनमत एकत्रीकरण यांचा अभ्यास केलेला आहे. तसेच उद्योगाची स्थाननिश्चिती, स्थानिकीकरणाचे घटक त्यासंबंधीचा वेबरचा व फ्लोरेन्सचा सिद्धांत याविषयीचा अभ्यास या पुस्तकात केलेला आहे. तसेच गुंतवणूक संशोधन विकास किंमतविषयक पद्धती, प्रकल्पाचे मूल्यमापन या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. किंमतविषयक निर्णय, किंमत पद्धतींचा हा अभ्यास केलेला दिसून येतो. पहिल्या भागात वरील सर्व गोष्टींचा अभ्यास केलेला आहे तर दुसर्‍या भागात खाजगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र, उदारीकरण, जागतिकीकरण, लघुउद्योग व मोठे उद्योग, त्यांच्या भूमिका व समस्यांचा विचार केलेला आहे.

    Audyogik Arthashastra

    380.00
    Add to cart
  • औद्योगिक अर्थशास्त्र

    औद्योगिक अर्थशास्त्र हा एक व्यावहारिक अर्थशास्त्राचा (Applied Economics) भाग आहे. याचा संबंध सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र, समग्रलक्षी अर्थशास्त्र, बँकिंग व वित्तीय व्यवस्था, विदेश व्यापार, सार्वजनिक अर्थशास्त्र यांच्याशी थेट येतो. औद्योगिक अर्थशास्त्र हा उद्योग संस्थेच्या वर्तनाच्या अध्ययनाचा विषय आहे. उद्योग संस्था कोणत्या वस्तूचे कोणासाठी, किती, कोणत्या पद्धतीने उत्पादन करायचे, किंमत कशी निश्चित करायची, नफ्याच्या महत्तमीकरणाबरोबरच विक्री महत्तमीकरण, वृद्धी महत्तमीकरण यांचेही अध्ययन औद्योगिक अर्थशास्त्रात केले जाते.
    प्रस्तुत पुस्तकात औद्योगिक अर्र्थशास्त्राचा परिचय आणि औद्योगिकीकरण, बाजार संरचना आणि औद्योगिक निर्णय, औद्योगिक स्थानियीकरणाचे विश्लेषण, गुंतवणूक निर्णय आणि प्रकल्प मूल्यमापन, नवोन्मेष, संशोधन आणि विकास, किंमत निर्णय, औद्योगिक उत्पादकता आणि वित्त या महत्त्वपूर्ण मुद्द्यांची विस्तृत आणि मुद्देसूद मांडणी केली आहे.

    450.00
    Add to cart
  • कथारंग

    विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना विज्ञान कथा व विनोदी कथा अशा दोन कथाप्रकारांची ओळख करून देणारे सदर पुस्तक आहे. मानवी नातेसंबंध, मानवी मूल्ये यांपुढे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अफाट प्रगतीने उभी केलेली आव्हाने विद्यार्थ्यांनी जाणून घ्यावीत आणि त्याबाबतची त्यांची जाण प्रगल्भ व्हावी या भूमिकेतून विज्ञान कथांची निवड करण्यात आली आहे. आभासी विश्वाच्या तात्कालिक भुलभुलैयात गुरफटल्यामुळे जगण्यातील समाधानाचे क्षण हातातून निसटत चालले आहेत. शब्द, वाक्य, भाषा, स्वभाव, वर्तन, व्यवहार अशा विविध स्तरांवरील गमत-जमती आज सापडेनाशा झाल्या आहेत. याचे भान विद्यार्थ्यांना यावे म्हणून विनोदाच्या निरनिराळ्या परी व्यक्त करणार्‍या निवडक विनोदी कथांचा समावेश सदर पुस्तकात करण्यात आला आहे. यासोबतच विज्ञानकोशासाठी नोंद लेखन आणि विज्ञानपर लघुलेख लेखन या उपयोजित घटकांची जोड येथे देण्यात आली आहे.

    Katharang

    85.00
    Add to cart
  • कथेतर गद्य विधाएँ : विविध विमर्श

    गद्य साहित्य और पद्य साहित्य यह साहित्य की दो शैलियाँ हैं। गद्य साहित्य के दो रूप है- कथात्मक गद्य और कथेतर गद्य। साहित्य की सार्थकता में निबंध, संस्मरण, रेखाचित्र, जीवनी, आत्मकथा, रिपोर्ताज, यात्रा वर्णन, व्यंग्य, डायरी, सम्बोधन आदि कथेतर गद्य विधाओं का योगदान भी महत्त्वपूर्ण हैं। चरित्रगत अध्ययन एवं वैचारिक लेखन की दृष्टि से निबंध, आत्मकथा, यात्रा-वर्णन, जीवनी आदि विधाएँ काफी महत्त्वपूर्ण है।
    ‘कथेतर गद्य विधाएँ : विविध विमर्श’ इस पुस्तक में वासुदेवशरण अग्रवाल- ‘राष्ट्र का सेवक’ (निबंध), अमृतलाल नागर- ‘तीस बरस का साथी : रामविलास शर्मा’ (संस्मरण), रामवृक्ष बेनीपुरी- ‘रजिया’ (रेखाचित्र), पाण्डेय बेचन शर्मा ‘उग्र’- ‘धरती और धान’ (जीवनी अंश), महात्मा गांधी- ‘चोरी और प्रायश्चित’ (आत्मकथा अंश), रांगेय राघव- ‘अदम्य जीवन’ (रिपोर्ताज), सचिदानन्द हीरानन्द वात्सायन ‘अज्ञेय’- ‘पतझर एक पात’ (यात्रा वर्णन), शंकर पुणतांबेकर- ‘एक गोप कक्ष’ (व्यंग्य), हरिवंशराय बच्चन- ‘प्रवास की डायरी’ (डायरी) तथा स्वामी विवेकानन्द- ‘सम्बोधन: युवाओं से’ (सम्बोधन) आदि कथेतर गद्य विधाओं की रचनाओं की समीक्षा की हैं। इन रचनाओं की समीक्षा से पूर्व मैंने रचनाकारों का जीवन परिचय एवं कृतियों का परिचय दिया हैं।

    95.00
    Add to cart
  • किरकोळ विक्री व्यवस्थापन

    Kirkol Vikri Vyavsthapan

    195.00
    Add to cart
  • किरकोळ विक्री व्यवस्थापन (भाग 2)

    Kirkol Vikri Vyavsthapan (Bhag 2)

    145.00
    Add to cart
  • किरकोळ विक्री व्यवस्थापन सिद्धांत आणि प्रक्रिया

    अंतर्गत व्यापारातील किरकोळ विक्री महत्त्वपूर्ण असा अविभाज्य घटक आहे. उपभोक्त्यांना हवी असलेली वस्तू किंवा सेवा त्यांच्या मागणीनुसार किरकोळ विक्रीद्वारे उपलब्ध करून दिल्या जातात. किरकोळ विक्रेता वस्तूंची विक्री लहान-लहान प्रमाणात करून एक प्रकारे तुकडे किंवा छोटे भागच विक्री करीत असतो. किरकोळ विक्रेता घाऊक व्यापारी किंवा उत्पादक किंवा वितरक यांच्याकडून वस्तूंची खरेदी करतो आणि अंतिम ग्राहक किंवा उपभोक्ता यांना पाहिजे त्या प्रमाणात हवी असलेली वस्तू उपलब्ध करवून देत असतो. किरकोळ विक्रेता हा वस्तू वाटप साखळीतील घाऊक विक्रेता आणि अंतिम ग्राहक (उपभोक्ता) यांच्यातील महत्वाचा दुवा आहे. किरकोळ विक्रेता हा एखादी कंपनी, अभिकर्ता किंवा संस्था स्वरूपात कार्यरत असू शकतो. सद्य:स्थितीत किरकोळ विक्री ही केवळ दुकानांद्वारेच केली जाते असे नव्हे, तर इंटरनेट, पोस्ट किंवा मार्केटिंगद्वारे केली जाते. वाणिज्य आणि व्यवस्थापन शिक्षणाचे बदलते व आधुनिक स्वरूप विचारात घेऊन सदरील पुस्तकात किरकोळ विक्री, विक्री व्यवस्था, विक्री पध्दती, विक्री व्यवस्थेचा आकृतीबंध, विक्रीचे अर्थशास्त्र, बाजारपेठेचे प्रभागीकरण, ग्राहक संबंध व्यवस्थापन, उपभोक्ता वर्तणूक, विक्री विपणन मिश्र, मॉल व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञानाचा वापर तसेच आधुनिक विचारप्रवाहात ग्राहकानंद, ई-रिटेलिंग अशा विविध विषय व तंत्र याविषयी सविस्तर चर्चा केली आहे.

    Kirkol Vikri Vyavasthapan Siddhant Aani Prakriya

    450.00
    Add to cart
  • कृषी अर्थशास्त्र

    भारत हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. ग्रामीण भागात शेतीक्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रमाणात आहे. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 68% जनता या क्षेत्रात गुंतलेली आहे. जगातील कोणत्याही राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत शेतीला महत्वाचे स्थान असते.

    20 व्या शतकाच्या सुरूवातीला अर्थशास्त्राची एक स्वतंत्र शाखा म्हणून ‘कृषी अर्थशास्त्र’ कार्यरत झाले. दुसर्‍या जागतिक महायुद्धानंतर या शाखेचे महत्व मोठ्या प्रमाणात वाढले. सध्या जगातील बहुसंख्य विकसनशील अर्थव्यवस्थांमधील उदा. राष्ट्रीय उत्पन्न, निर्यात, अन्नधान्य, कच्चा मालाचा पुरवठा, रोजगार वगैरे क्षेत्रात कृषी क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे. वाढत जाणार्‍या लोकसंख्येची अन्नधान्याची आणि सातत्याने वाढत जाणार्‍या विविध उद्योगांच्या कच्च्या मालाची गरज शेती क्षेत्राकडूनच पूर्ण होत आहे.

    कृषी आधारीत अर्थव्यवस्थेचे रूपांतर उद्योगाधारीत अर्थव्यवस्थेत होण्यासाठी शेतीबद्दलचा पारंपारिक दृष्टीकोन बदलवून आधुनिक दृष्टीकोनाचा स्विकार होणे काळाची गरज ठरते. संसाधनाचा योग्य वापर, घटकांचा युक्त संयोग, पर्यायी उत्पादन तंत्राची निवड, विपणनाच्या समस्या, व्यवस्थापन, उत्पादन फलन इत्यादी अनेक बाबतीत कृषी अर्थशास्त्र महत्वाची भूमिका निभावू शकते. शेती क्षेत्रात व्यापारी दृष्टीकोन रुजवण्यात शेतीच अर्थशास्त्र महत्वपूर्ण योगदान देवू शकते.

    Krushi Arthashastra

    225.00
    Add to cart
  • कृषी भूगोल

    कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील OE/GE पेपरच्या अभ्यासक्रमानुसार ‌‘कृषी भूगोल’ हे पुस्तक वाचकांपुढे येत आहे.
    कृषी व्यवसाय जगातील महत्त्वाचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय अजूनही काही देशात फारसा विकसित नाही. परंतु काही देशांनी या व्यवसायात खूपच प्रगती केली आहे. भारतासारख्या विकसनशील देशात कृषी व्यवसायाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या व्यवसायाचे महत्त्व पाहता भूगोल अभ्यासमंडळाने कृषी भूगोलाचा अभ्यासक्रमात समावेश केला. ही अतिशय चांगली बाब आहे.
    पुस्तक लिहिताना अभ्यासक्रमातील विषय वेगवेगळे करुन त्याचे विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यापीठ अभ्यासक्रमानुसार प्रकरणामध्ये विषय विवेचन करण्यात आले आहे.
    सदरचे पुस्तक लिहिताना आमचे सहकारी मित्रांनी खूपच उपयुक्त सूचना केल्या. त्याचा आम्ही पुस्तक लिहितांना विचारात घेतल्या.

    110.00
    Add to cart
  • क्षेत्रतंत्र आणि प्रकल्प अहवालाची तोंडओळख

    ‘क्षेत्राभ्यास’ हे भूगोल विषयातील संशोधनातील एक महत्वाचे अंग आहे. योग्य शास्त्रीय तंत्र व तंत्रज्ञान वापरुन क्षेत्राचा पद्धतशीरपणे अभ्यास करता येतो. क्षेत्रकार्य करतांना संशोधकाला किंवा अभ्यासकाला भौगोलिक व वैज्ञानिक दृष्टीकोन वापरता आला पाहिजे. क्षेत्रकार्यामुळे चिकित्सक वृत्तीचा विकास होतो. क्षेत्रकार्य करतांना काही नितीमूल्यांचे पालन करणे आवश्यक असते. अभ्यासक्षेत्र हे कोणत्या स्वरूपाचे आहे हे क्षेत्रकार्य करण्यापूर्वी जाणून घेणे महत्वाचे असते. क्षेत्राभ्यास हा निरिक्षण पद्धतीने, प्रश्नावलीच्या आणि मुलाखतीच्या माध्यमातून पार पडतो.
    ‘नमुना संकलन’ हे क्षेत्रकार्या दरम्यानचे एक महत्वाचे कार्य आहे. नमुना निवडीच्या अनेक पद्धती आहेत. समग्रातून निवडलेल्या नमुन्याच्या विश्लेषणावरुन संपूर्ण सामग्रीबद्दल निष्कर्ष मांडता येतो. लघु संशोधन सादरीकरण हे प्रकल्प अहवालाच्या माध्यमातून करतात. प्रकल्पाचे सादरीकरण अनेक मुद्द्यांमधून मुद्देसूदपणे करतात. ध्येय, उद्दीष्ट्ये, गृहीततत्वे, अभ्यासपद्धती, विवेचन, निष्कर्ष, अनुमान इत्यादी मुद्द्यांच्या आधारे प्रकल्पाचे सादरीकरण केले जाते.

    95.00
    Add to cart
  • खानदेश रत्नावली आस्वाद व रसग्रहण

    Khandesh Ratnavali : Aswad v Rasgrahan

    250.00
    Add to cart
  • खानदेशचा इतिहास

    आम्ही ज्या मातीत वाढलो, घडलो त्या मातीला उतराई होण्याच्या निमित्ताने खानदेशचा इतिहास लिहिण्याची कदाचित ही सुवर्णसंधी मला लाभली म्हणून कृतकृतार्थ वाटतेय किंबहुना ती जबाबदारी जाणीवपूर्वक मी घेतली. सदर अभ्यासक्रमाच्या पुस्तकात मानवी वसाहतपूर्व, ताम्रपाषाण वसाहतीपासून तर आजच्या सुवर्णनगरी जळगांव पर्यंत विविध कालखंडातील खानदेशचा इतिहास समाविष्ट केला आहे.
    अभिमानाची गोष्ट म्हणजे प्राचीन काळी सम्राटांनी आपल्या मांडलिकांच्या मार्फत (निकुंभ, मौर्य, आभीर, गवळी), तर सुलतान काळात फारुकी सुलतानांनी, मुघलकाळात दख्खनच्या सुभेदारांनी, मराठाकाळात कमाविसदार-सरंजामदारांनी प्रशासन करत राज्यकारभार खानदेशात चालवला. त्यानंतर कंपनी व ब्रिटिश सरकारने राज्यकारभार केला.
    या विविध कालखंडात सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक व राजकीय प्रभावाची घुसळण (मिश्रण) खानदेशात फार मोठ्या प्रमाणात दिसून येते. सातपुडा पर्वत ते सातमाळ्याची डोंगर रांग, तापी व तिच्या उपनद्यांचे खोरे(पांबोगिता-पांझरा, बोरी, गिरणा, तापी), कान नदी, कानबाईचा उत्सव, कान्हाचा जागर आणि अहिराणी लोकबोली इत्यादीने समृध्द प्रदेश म्हणजे खानदेश.
    इथला भिल्ल, कोळी व तत्सम आदिवासी ते बारा बलुता-अठरा अलुता तसेच कुणबी-मराठा, गुजर, लेवा, राजपूत, माळी इ. कृषक जाती-जमाती, मुस्लिम व व्यापारी ज्ञातीसमूह या सगळ्यांच्या सहिष्णू, सर्वसमावेशक व सलोख्याचा, गर्वाने मन फुलावे असा हा उज्वल इतिहास विद्यार्थ्यांसमोर सादर करण्याचा आनंद काही औरच आहे.

    350.00
    Add to cart
  • खान्देश कथाप्रबोध

    या सर्वच कथा खान्देश परिसरातल्या आहेत. बोली भूगोलाचा विचार केला तर ह्या कथा मध्यप्रदेश, गुजराथी प्रदेशातील सीमेलगतच्या बोलीच्या भूगोलातील आहेत. त्यामुळे जशा त्या आशयाने नाविन्यपूर्ण आहेत तशाच त्या अभिव्यक्ती शैलीनेही नाविन्यपूर्ण आहेत.
    सदर संग्रहातल्या कथा वाचताना आपण खान्देशच्या बोलीतील किती मोठी श्रीमंती हरवून बसत आहोत, याची तीव्र जाणीव होते. ही जाणीव हा कथासंग्रह तरूण्ा वाचकांच्या मनात रुजवल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री आहे.

    – दत्ता भगत

    120.00
    Add to cart
  • खान्देश का लोकसाहित्य

    भाषा और साहित्य यह एकमात्र ऐसा साधन होता है जिसके माध्यम से हम किसी भी प्रांत अथवा भूप्रदेश की लोक-भाषा, लोक-साहित्य, लोक-संस्कृति तथा लोक-परंपराओं का अध्ययन अध्यापन कर सकते है । वैश्वीकरण या भूमंडलीकरण के इस युग में जब एक विश्वग्राम, एक विश्वबाजाऱ की तरह एक विश्वभाषा की कल्पना संजोयी जा रही है तब उसके परिणामस्वरूप हम देख रहे है कि आए दिन किसी न किसी लोक-भाषा और लोक-संस्कृति का कैसे लोप होता जा रहा है । सुप्रसिध्द भाषाविद् डॉ. गणेश देवी द्वारा किए गए ‘भाषा सर्वेक्षण’ से प्राप्त निष्कर्ष इस बात के प्रत्यक्ष प्रमाण है । इसलिए ऐसी विपरित परिस्थितियों में अपने-अपने भूप्रदेश और प्रांत की लोक-भाषा और लोक-संस्कृति का संरक्षण और संवर्धन करना तथा आने वाली नई पीढ़ी को इससे अवगत कराना यह हर एक का कर्तव्य बन गया है। इसी उद्देश्य को केंद्र में रखकर विश्वविद्यालय अनुदान आयोग, नई दिल्ली ने तथा भारत सरकार द्वारा प्रस्तावित नई शिक्षा नीति ने लोक-भाषा और लोक-संस्कृति का संरक्षण और संवर्धन करने हेतु उसे पाठ्यक्रम में समाविष्ट करने के निर्देश भारत में स्थित सभी विश्वविद्यालयों को दिए हैं । उन्हीं निर्देशों का अनुपालन करते हुए कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विश्वविद्यालय, जलगांव के हिन्दी अध्ययन मंडल ने स्नातक स्तर (बी.ए.) तृतीय वर्ष के षष्ट सत्र के अंतर्गत हिंदी विषय का चयन करने वाले छात्रों के लिए खान्देश का लोक साहित्य यह प्रश्नपत्र रखने का क्रांतिकारी निर्णय लिया । यह निर्णय आगत भविष्य काल में ग्लोबल के साथ-साथ लोकल का नारा बूलंद करेगा यह हमें पूर्णरूपेण विश्वास है ।

    Khandesh Ka Loksahitya

    125.00
    Add to cart
  • खान्देश काव्यप्रबोध समीक्षा

    ‌‘कविता’ हा चिंतनशील वाङ्मयप्रकार आहे. प्रत्येक कविता ही कविच्या खासगी अनुभवातून जन्मास आलेली असली तरी तिचे स्वरूप हे वैयक्तीक न राहता वैश्विक होते. साहित्य हे कालातित असल्याने प्रत्येक कविता ही नव्या कालखंडात नव्या अर्थासह आशयमान होते. कविता ही बहुअर्थी असल्याने आशयाचे विविध पदर त्यातून उलगडत असतात. कविता ही अत्युच्च संवेदनेतून येत असल्याने कवितेतील निवेदन हे सरळ स्पष्ट व निवेदनात्मक नसते तर प्रतिमा, प्रतिके यातून कमी शब्दात ती अभिव्यक्त होत असते. अशा वाङ्मय प्रकारचे अध्ययन आणि अध्यापन करणे हे सोपे नसते. अलिकडच्या काळात परिस्थिती ही झपाट्याने बदलत असल्याने विद्यार्थी हा ‌‘टेक्नोसॅव्ही’ होत चाललेला आहे. परिणामी तो कवितेच्या अस्सल अनुभवापासून दूर जात आहे. कवितेचा अनुभव हा खासगी असला तरीही सर्वव्यापक असतो. त्यामुळे विद्यार्थ्याला कवितेत गोडी निर्माण व्हावी, कवितेचे अध्ययन सोपे व्हावे याकरीता सदर समीक्षाग्रंथाची निर्मिती केलेली आहे.

    150.00
    Add to cart
  • खान्देश रत्नावली

    Khandesh Ratnavali

    100.00
    Add to cart
  • गणित अध्यापन पद्धती व आशयज्ञान (बी.एड.द्वितीय वर्ष)

    Ganit – Abhyasakram Aani Adhyapanshastriya Abhyas (B.Ed. Second Year (CPS 3 & 4))

    425.00
    Add to cart
  • गुंतवणूक आणि संपत्ती व्यवस्थापन

    ‌‘गुंतवणूक आणि संपत्ती व्यवस्थापन’ या पुस्तकात गुंतवणूक, प्रकार, वैशिष्ट्ये, उद्दिष्ट्ये, गुंतवणुकदरांचे प्रकार, पोर्टफोलिओ व्यवस्थापन, जोखीम आणि परतावा, वित्तीय संपत्तीवरील परतावा, जोखीमेचे मोजमाप, पद्धतशीर जोखमीचे स्रोत, गुंतवणूकीचे पर्याय, गुंतवणूकीचे मूल्यमापन, किंमत-उत्पन्न संबंध, व्याज दराची संरचना, संपत्ती व्यवस्थापन, व्याप्ती, घटक, प्रक्रिया, गरज, पक्षकाराच्या अपेक्षा, वैयक्तिक आर्थिक विवरण, वित्तीय साक्षरता, रोख प्रवाह, वित्तीय नियोजन बांधणी, वैयक्तिक आर्थिक नियोजन, गरज, फायदे, तत्वे इत्यादी मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यात आलेले आहेत. योग्य त्या ठिकाणी आकृत्या काढून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. पुस्तकाची अत्यंत साध्या व सोप्या भाषेत मांडणी केलेली आहे.
    प्रस्तुत पुस्तक वाणिज्य आणि व्यवस्थापन विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना निश्चितच उपयुक्त ठरेल.

    Guntavnuk Ani Sampatti Vyavsthapan

    175.00
    Add to cart
  • छात्रसेवाकाल (बी.एड.द्वितीय वर्ष)

    एनसीटीईच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्व विद्यापीठातील बी.एड. छात्राध्यापक आपल्या प्रशिक्षणाचा एक मोठा कालावधी शाळांमध्ये कार्यरत राहणार आहे. या कालावधीत त्यांनी कोणकोणती कामे करावीत, काय काय उपक्रम राबवावेत, शाळेशी संबंधित घटकांशी आंतरक्रिया करणे, शाळेचे दप्तर विविध नोंदी, मूल्यमापन, शासन व अन्य घटकांशी पत्रव्यवहार अशा सर्व बाबींचा परिचय छात्राध्यापकाला व्हावा असा छात्रसेवाकालाचा हेतू आहे. हा हेतू लक्षात घेवून प्रस्तुत पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे.
    प्रस्तुत पुस्तकात छात्रसेवाकालाचा अर्थ, संकल्पना, वैशिष्ट्ये, नियोजन व अंमलबजावणी, शाळेचा परिचय, कार्ये, विविध उपक्रम, शाळा व समुदाय, मुख्याध्यापकाची भूमिका, शिक्षकाची भूमिका, शैक्षणिक संशोधन, छात्रसेवाकालचे अहवाललेखन अशा सर्व मुद्द्यांचा उहापोह केलेला आहे.

    Chhatrasevakal

    225.00
    Add to cart