प्रस्तुत ग्रंथात अमेरिका आणि चीन या देशातील शासन-प्रशासन आणि राजकारणाची अद्ययावत माहिती देण्यात आली आहे.
अमेरिका या देशासंबंधी माहितीत अमेरिकेचे संविधान, अमेरिकेचे शासन आणि प्रशासन, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळांची रचना, अधिकार आणि भूमिका, राज्यसरकारे, विविध पक्ष व त्यांच्या भूमिका, हितसंबंधी गट व सामाजिक चळवळी तसेच प्रसारमाध्यमे व त्यांची भूमिका वगैरे बाबींचा समावेश असून अभ्यासकांना महत्वपूर्ण ठरेल.
चीन या देशासंबंधी माहितीत चीनचे संविधान, घटनात्मक हक्क व कर्तव्ये, शासन आणि प्रशासन, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळांची रचना, अधिकार आणि भूमिका, चीनमधील प्रमुख राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे व त्यांची भूमिका या बाबींचा यथायोग्य समावेश केलेला आहे.चीनमध्ये माओ-त्से-तुंग नंतरच्या काळात मोठे बदल झाले असून चीनसाठी ते राजकीयच नव्हे तर आर्थिकदृष्ट्या फार मूलभूत आणि महत्वाचे ठरले आहेत.
America Aani Chinche Shasan Aani Rajkaran