Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मराठी

असे सोमेश्वर पुरातन

 • ISBN: 9789389501292
 • Ase Someshwar Puratan
 • Published : February 2020
 • Book Language : Marathi
 • Edition : First
 • Format : Paperback
 • Pages : 88
 • Category:
 • Download Book Ebook Link

Rs.150.00

श्रीस्कंदपुराणाने प्रभासक्षेत्रातील सोमेश्वराचा उल्लेख केलेला आहे आणि श्रीसंत नामदेव महाराजांनी आपल्या अभंगातून केलेला सोमेश्वराचा उल्लेख हा श्रीस्कंदपुराणातील सोमेश्वराचा आहे. त्यामुळे श्रीस्कंदपुराणातील सोमेश्वर, श्रीसंत नामदेव महाराजांच्या अभंगातील सोमेश्वर आणि श्रीक्षेत्र मेहूण तापीतीर येथील सोमेश्वर हा एकच आहे, हे पटवून देण्यासाठी अ‍ॅड. गोपाल दशरथ चौधरी (दाशरथी) यांनी ‘असे पुरातन सोमेश्वर’ हा ग्रंथनिर्मितीकरीता केलेला खटाटोप वाखाणण्याजोगा आहे. अ‍ॅड. गोपाल दशरथ चौधरी (दाशरथी) यांनी वयाची 68 वर्ष ओलांडली असून ते 90 टक्के अंध आहेत. असे असले तरी आपल्या संपूर्ण आयुष्यात केलेल्या संत वाङ्मयाच्या अभ्यासाच्या बळावर त्यांनी आपल्या दांडग्या स्मरणशक्तीने तोंडी सांगावे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुलोचनाबाई चौधरी यांनी ते लिहून घ्यावे अशा पद्धतीने ‘असे सोमेश्वर पुरातन’ हा ग्रंथ सिद्धीस आला आहे. श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई यांच्या गुप्तस्थळाचे महत्त्व अधोरेखित व्हावे या हेतूने तयार करण्यात आलेला हा ग्रंथ वाचक, भाविक, मुमुक्षु, वारकरी सांप्रदायिक यांच्यासाठी तसेच संत वाङ्मयाचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी किंबहुना सर्वांसाठी निश्चितच उपयोगी पडेल अशी खात्री आहे.

– डॉ. जगदीश पाटील, भुसावळ

Ase Someshwar Puratan

 1. मानवी उत्क्रांतीच्या पाऊलखुणा
 2. उग्रादित्याची संकल्पना : मेहूणचा शिलालेख
 3. प्रभासक्षेत्राचा परिचय
 4. प्रभासक्षेत्राचे महत्व
 5. धन्य सोमेश्वर : त्र्यंबकाची परिकल्पना
 6. धन्य तापीतीर योगियांचे
 7. धन्य महत्नगर : संत मुक्ताईंचे गुप्तस्थळ

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “असे सोमेश्वर पुरातन”
Shopping cart