Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मराठी

मराठी भाषा आणि भाषाविज्ञान

Rs.175.00

पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात भाषाविज्ञान हा विषय आज प्राधान्याने शिकविला जातो आहे. प्रारंभी नवीन असणारा हा विषय आता कोणत्याही भाषेचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांसाठी अपरिहार्य झालेला आहे. वर्णनात्मक भाषा विज्ञानाचा पाया घालणाऱ्या फेर्दिनां द स्योसुर या भाषाअभ्यासकापासून आजपावेतो भाषाविज्ञानाने अनेक क्षेत्रामध्ये शिरकाव केलेला दिसतो. संगणक विज्ञान, भाषा नियोजन, कोष विज्ञान आदिसारख्या संपूर्ण मानवी जीवनाला व्यापून टाकणाऱ्या या विषयाचे स्वरूप आज आंतर-अभ्यासक्षेत्रीय झालेले आहे. सर्वच भाषेच्या अभ्यासाच्या दृष्टीने पायाभूत ठरणारा हा विषय असल्याने आज तो आवश्यक ठरलेला आहे. सदर पुस्तकात भाषेची उत्पत्ती, भाषेचे स्वरूप, वैशिष्ट्ये आणि कार्य, स्वनिम व रूपिम विचार, वाक्यविचार, मराठीची वर्णमाला, मराठीचे ध्वनीपरिवर्तन, मराठीचे अर्थपरिवर्तन, प्रमाण मराठी भाषा आणि बोली या घटकांची विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या व शिकविणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे भाषाविज्ञान सुलभ पद्धतीने शिकता यावे, यादृष्टीने या पुस्तकाची मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Marathi Bhasha ani Bhashavidnyan

  1. भाषेची उत्पत्ती : 1.1 भाषेच्या उत्पत्तीचा काळ, 1.2. भाषा उत्पत्तीचे सिद्धांत, 1.2.1 इंगित सिद्धांत, 1.2.2 मुखाभिनय, 1.2.3 अनुकरण सिद्धांत, 1.2.4. रणन सिद्धांत, 1.2.5 भावनाभिव्यक्ती सिद्धांत, 1.2.6 श्रमपरिहार सिद्धांत, 1.2.7 प्रेमगानमूलक सिद्धांत, 1.2.8 संपर्क सिद्धांत, 1.2.9 क्रीडासक्ती सिद्धांत, 1.2.10समन्वय सिद्धांत.
  2. भाषेचे स्वरूप, वैशिष्ट्ये आणि कार्य : 2.1 भाषेच्या व्याख्या, 2.2 भाषेचे स्वरूप, 2.3 भाषेची वैशिष्ट्ये.
  3. स्वनिम व रूपिम विचार : 3.1 स्वनविचार, 3.1.1 स्वनांतरे, 3.1.2 स्वनिम निश्चितीची तत्त्वे, 3.1.3 स्वनिमाचे प्रकार, 3.2 रूपिम विचार, 3.2.1 भाषिक रूप आणि रूपिका, 3.2.2 रूपिका-रूपिम-रूपिकांतर, 3.2.3 रूपिकांतराचे प्रकार, 3.2.4 रूपिमांचे प्रकार, 3.2.5 विकारसरणी.
  4. वाक्यविचार : 4.1 पदबंधाचे स्वरूप, 4.2 वाक्याचे स्वरूप, 4.3 वाक्याचे प्रकार, 4.4 वाक्याचे पृथक्करण.
  5. मराठीची वर्णमाला : 5.1 ध्वनी व वर्ण, 5.2 मराठीची वर्णमाला, 5.3 स्वरांचे ध्वनिशास्त्रदृष्ट्या व उच्चारस्थानानुसार वर्गीकरण, 5.4 मराठीतील व्यंजन विचार.
  6. मराठीचे ध्वनीपरिवर्तन : 6.1 मराठीचे ध्वनीपरिवर्तन, 6.2 ध्वनिपरिवर्तनाची कारणे, 6.3 ध्वनिपरिवर्तनाचे प्रकार.
  7. मराठीचे अर्थपरिवर्तन : 7.1 अर्थाच्या व्याख्या, 7.2 अर्थपरिवर्तनाचे स्वरूप, 7.3 अर्थपरिवर्तनाची कारणे, 7.4 अर्थपरिवर्तनाचे प्रकार, 7.5 अर्थपरिवर्तनाचा मराठी भाषेवरील परिणाम.
  8. प्रमाण मराठी भाषा आणि बोली : 8.1 प्रमाण मराठी भाषा आणि बोली, 8.1.1 प्रमाणभाषा व बोली-भेद, 8.1.2 बोलीभाषा : स्वरूप व विशेष, 8.1.3 बोलीच्या निर्मितीची कारणे, 8.1.4 बोली आणि गैरसमज, 8.1.5 प्रमाणभाषा : स्वरूप व विशेष, 8.1.6 प्रमाणभाषा आणि बोली : वेगळेपण, 8.1.7 बोलींच्या अभ्यासाची गरज, 8.2 मराठीच्या बोली, 8.2.1 वऱ्हाडी बोली, 8.2.2 अहिराणी (खानदेशी) बोली, 8.2.3 चंदगडी बोली, 8.2.4 मालवणी बोली.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मराठी भाषा आणि भाषाविज्ञान”
Shopping cart