Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मराठी

मराठीचा भाषिक अभ्यास

Rs.275.00

इ.स.दहावे शतकात यादव काळात मराठी भाषा-संस्कृतीची जडण-घडण झाली. यादव काळातील या मराठी भाषेचा ‌‘अमृतातेहि पैजा जिंके’ अशा शब्दात गौरव केला जातो. मराठीचे हे वैभव कालिक, राजकीय स्थित्यंतरांनी नष्ट झाले. बहामनीकाळात मुस्लिम राजवट व त्यांची ‌‘उर्दू-फारसीमिश्रित हिन्दी’ या भाषासंपर्कामुळे मराठी भाषा भ्रष्ट झाली. शिवकाळात तीने आपले पूर्वरुप प्राप्त केले. पेशवेकाळ व आंग्लकाळातील अन्यभाषिकांच्या संपर्कात तिचे स्वरूप बदलत गेले. आजच्या मराठी प्रमाणभाषेचा या स्थित्यंतराशी संबंध आहे.
मराठी भाषेची पूर्वपीठिका, उत्पत्ती कालखंड, निश्चितीची साधने, त्यासंदर्भातील वैद्य-गुणे वाद, भाषा उत्पत्तीचे सिद्धान्त व भाषाकुल संकल्पना, मराठी भाषेवर झालेला अन्य भाषा परिणाम, प्रमाणभाषा व बोलीभाषा सहसंबंध, मराठीचे शब्दभांडार, मराठीचे कालिक भेद व प्रान्तिक भेद, भाषा आणि लिपी इ. घटकांचा संबंध ‌‘मराठीचा भाषिक अभ्यास’ या अभ्यासक्षेत्राशी निगडीत आहे. एम.पी.एस.सी. व यु.पी.एस.सी. स्पर्धात्मक परीक्षेत त्यांचा समावेश आहे. म्हणूनच विद्यापीठीय मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात त्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला जातो. प्रस्तुत पुस्तकात या विषय घटकांच्या संदर्भात मान्यवर अभ्यासकांनी मांडलेल्या विचारांचा आधार घेतला आहे. नव्या पिढीतील मराठी अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना व भाषाभ्यासकांना अभ्यासपूर्ण विवेचनासाठीच प्रस्तुत ग्रंथलेखनाचे प्रयोजन!

– प्रा. डॉ. प्रभाकर जोशी

Marathicha Bhashik Abhyas

1. भाषा : स्वरूप व कार्य :
1.1 भाषेचे स्वरूप
1.2 भाषा म्हणजे काय?
1.3 भाषेची संदेशन प्रक्रिया
1.4 भाषेची लक्षणे
1.5 भाषाभ्यासाची प्रमुख अंगे
1.6 भाषा अभ्यासाच्या पध्दती

2. भाषा उत्पत्ती आणि भाषाकुल संकल्पना :
2.1 भाषानिर्मितीची प्रक्रिया : वागेंद्रियाचे कार्य
2.2 भाषा उत्पत्तीचे सिद्धांत
2.3 भाषाकुल संकल्पना
2.4 होर्न्लेचा अंतर्वर्तुळ-बहिर्वर्तुळ सिद्धांत
2.5 मराठीचे भाषाकुल

3. मराठी भाषेची उत्पत्ती :
3.1 मराठीची उत्पत्ती : कालखंड
3.2 मराठी उत्पत्ती निश्चितीची साधने
3.2.1 मराठी ग्रंथरचना
3.2.2 लोकसाहित्यातील उल्लेख
3.2.3 शिलालेख
3.2.4 ताम्रपटांचे पुरावे
3.3 मराठी भाषेची पूर्वपिठीका
3.4 मराठीच्या उत्पत्तीसंदर्भातील वैद्य-गुणे वाद
3.5 मराठीची जनकभाषा : मतमतांतरे

4. मराठीचे कालिक भेद :
4.1 कालिकभेद : संकल्पना
4.2 यादवकालीन मराठी
4.3 बहामनीकालीन मराठी
4.4 शिवकालीन मराठी
4.5 पेशवेकालीन मराठी
4.6 आंग्लकालीन मराठी

5. मराठीचे प्रांतिक भेद व बोलीभाषा :
5.1 महाराष्ट्र प्रांतविस्तार आणि मराठी भाषा
5.2 मराठीचे प्रांतिक भेद
5.3 प्रमाणभाषा व बोलीभाषा : सहसंबंध
5.4 मराठी बोलीभाषा परिचय
5.4.1 वऱ्हाडी बोली
5.4.2 कोकणी बोली
5.4.3 अहिराणी बोली

6. मराठीवरील अन्य भाषांचा प्रभाव :
6.1 भाषा शुद्ध-अशुद्ध संकल्पना
6.2 भाषिक संपर्काची कारणे
6.3 मराठीवरील अन्य भाषा प्रभाव
6.3.1 संस्कृतभाषेचा प्रभाव
6.3.2 द्राविडी भाषांचा प्रभाव
6.3.3 अरबी-फार्सी भाषांचा प्रभाव
6.3.4 इंग्रजी भाषेचा प्रभाव
6.3.5 युरोपियन भाषा प्रभाव
6.3.6 हिंदी व गुजराथी प्रभाव

7. भाषा आणि लिपी :
7.1 भाषा आणि लिपी साम्यभेद
7.2 ब्राम्ही ते देवनागरी
7.3 देवनागरी लिपीची वैज्ञानिकता
7.4 देवनागरी लिपीतील त्रूटी
7.5 देवनागरी लिपीच्या सुधारण्याचे प्रयत्न
7.6 समारोप

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मराठीचा भाषिक अभ्यास”
Shopping cart