Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

स्त्रीसाहित्य

मुलींचे शिक्षण व महिला सक्षमीकरण

Rs.85.00

स्त्री ही आपल्या कुटूंबाचा आधारस्तंभ असते. एका स्त्रीला शिक्षित केल्याने तिचे संपूर्ण कुटूंब शिक्षित होते. ती आईच्या रूपात आपल्या मुलांवर योग्य ते संस्कार करते. देशाची सामाजिक आणि आर्थिक प्रगती साधावयाची असेल तर पुरूषांसोबत स्त्रियांनाही शिक्षित करायला हवे. स्त्री शिक्षणाचे अनेक फायदे आहेत. शिक्षण प्राप्त करुन स्त्रीमध्ये आत्मसन्मान निर्माण होतो. त्याचबरोबर आपल्या कुटूंबाला त्याचे फायदे होतात. मुलींच्या शिक्षणासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असून त्यांचा उपयोग करून घेणे आवश्यक आहे. स्त्रीशिक्षणामुळे समाजात विविधांगी दृष्टीने प्रगती घडून येते. शिक्षणामुळे मुली व महिलांमध्ये स्वयंनिर्णयशक्ती प्राप्त होते. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी स्त्रियांचे शिक्षण अतिशय महत्त्वाची बाब आहे, मात्र आजही एकविसाव्या शतकात महिलांना पूर्ण स्वातंत्र्य हव्या त्या प्रमाणात मिळालेले नाही. परिपूर्ण देश तेव्हाच घडेल ज्यावेळेस स्त्रीस पूर्ण स्वातंत्र्य मिळेल.
राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी, रमाबाई आंबेडकर, इंदिरा गांधी, कल्पना चावला, मेरी कोम, लता मंगेशकर, भिकाईजी कामा यासारख्या लोकोत्तर व्यक्तिमत्त्वांना या साहित्यकृतीतून प्रस्तुत केेले आहे. राष्ट्रनिर्मितीसाठी, समाजसुधारणीसाठी, महिला शिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे साहित्यलेखन प्रेरकशक्ती ठरतात.
प्रस्तुत पुस्तक हे विशेषकरून विद्यालयीन, महाविद्यालयीन मुली, महिला व त्यांच्या पालकवर्गासाठी उपयुक्त आहे.

Mulinche Shikshan va Mahila Sakshamikaran

  1. मुलींचे शिक्षण – पार्श्वभूमी
  2. मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व
  3. मुलींच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी
  4. स्त्री शिकली, प्रगती झाली
  5. स्त्री-पुरूष समानता प्रस्थापित होणे काळाची गरज
  6. मुलींच्या शिक्षणात शिक्षक व पालकांची भूमिका
  7. शिक्षणातून महिला सक्षमीकरण
  8. महिला-मुलींसाठी योजना
  9. महिला आणि उच्चशिक्षण
  10. महिला सक्षमीकरणात समाजाचा सहभाग

भारतातील यशस्वी महिला
परिशिष्ट – घोषवाक्ये

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मुलींचे शिक्षण व महिला सक्षमीकरण”
Shopping cart