Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

स्त्रीसाहित्य

शोध स्त्रीप्रतिमांचा

Rs.160.00

भारतीय समाजव्यवस्थेच्या संदर्भात ‘स्त्रीप्रतिमा’ ही संकल्पना लक्षात घेताना धर्म, संस्कृती आणि समाज यांच्या विविध अंगोपांगांमधील गुंतागुंत लक्षात घ्यावी लागते. ह्या संदर्भात पाश्चात्य स्त्रीवादाची परिमाणे पुरेशी ठरु शकत नाहीत. मुळात भारतीय स्त्रीचा विचार एकरेषीय पद्धतीने करता येऊ शकत नाही. वर्ग, जात यांच्या स्तरभेदांनुसार आकारास येणारे भारतीय समाजचित्र कळत नकळतपणे स्त्रीचे जगणेही त्यानुरुप बद्ध करीत जाते. अशा या स्त्रीची प्रतिमा नेमकेपणाने जाणून घेणे ही बाब आव्हानात्मक आहे. या दृष्टीने मराठीतील लेखिकांचे यासंदर्भातील आकलन जाणून घेण्याचा विचार मनात आला. लेखिका आपल्या कथा-कादंबर्‍यांमधून ज्या स्त्रीचे एकंदर स्वरुप कसे आहे, याबाबत जाणून घेण्याच्या भूमिकेतून सदर अभ्यासाला चालना मिळाली.

Shodh Stripratimancha

भूमिका :

  1. स्त्रीप्रतिमा : संकल्पना आणि स्वरूप
  2. सन 1975 पूर्व लेखिकांच्या कथालेखनातील स्त्रीप्रतिमा
  3. सन 1975 पूर्व लेखिकांच्या कादंबरीलेखनातील स्त्रीप्रतिमा
  4. सन 1975 नंतरच्या लेखिकांचे कथा आणि कादंबरीलेखन
  5. गौरी देशपांडे यांच्या कथा आणि कादंबरीलेखनातील स्त्रीप्रतिमा
  6. आशा बगे यांच्या कथा आणि कादंबरीलेखनातील स्त्रीप्रतिमा
  7. सानिया यांच्या कथा आणि कादंबरीलेखनातील स्त्रीप्रतिमा
  8. मेघना पेठे यांच्या कथा आणि कादंबरीलेखनातील स्त्रीप्रतिमा
  9. उपसंहार

परिशिष्टे : 1. अभ्यासलेल्या साहित्यकृती, 2. संदर्भसूची, 3. नामसूची

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शोध स्त्रीप्रतिमांचा”
Shopping cart