• हमीद दलवाईंच्या कथा : शोध आणि बोध

    हमीद दलवाईंच्या कथा : शोध आणि बोध

    हमीद दलवाई म्हणजे इस्लामी विश्वातील भारतीय चार्वाक! तीन तलाक, हलाला, दारिद्य्र, लैंगिकता अशा मुस्लीम जीवनाला व्यापणार्‍या ज्वलंत प्रश्नावर हमीद दलवाईंच्या कथा जन्माला आल्या. पण या कथाविश्वाची उपेक्षा डॉ. माधव कदम या नव्या दमाच्या व नव्या जाणिवेच्या समिक्षकाने मोडीत काढून हमीद दलवाईना न्याय दिला. हमीद दलवाईचे साहित्य विश्व त्यांच्या जिवंतपणी व मृत्यूनंतरही उपेक्षीतच राहिले. पण या अस्सल निरिश्वरवादी मुसलमान विचारवंत लेखकाच्या कलेतील मनःस्वेदनाना पेलण्याचे-कुरवाळण्याचे व पचविण्याचे काम डॉ. माधव कदम यांनी समर्थपणे केले आहे. अभिनंदन-शुभाशिर्वाद व शुभेच्छा!

    – डॉ. श्रीपाल सबनीस, अध्यक्ष, 89 वे अखिल भारतीय, मराठी साहित्य संमेलन

    Hamid Dalwaichya Katha : Shodha And Bodha

    Rs.95.00
    Add to cart
  • हवामानशास्त्र

    हवामानशास्त्र

    पृथ्वीवरील सजीवसृष्टी, पर्यावरण आणि मानवी जीवनाची सुरक्षितता या दृष्टीकोनातून हवामानशास्त्र अधिक महत्त्वाचे शास्त्र आहे. पर्यावरणातील संपूर्ण हालचाली, भुपृष्ठावरील घडामोडी, अवकाशातील अस्थिरता, जलभागातील प्रदुष्ण, वादळ-वारे, पाऊस आणि जागतिक तापमानातील वाढ इत्यादी सर्व घटकांचा आणि संकल्पनांचा समावेश ‘हवामानशास्त्रात’ केलेला आहे. फक्त सजीवांचे संरक्षण म्हणून नव्हे तर त्यांची उत्पादनशीलता, राहणीमान, उद्योगधंदे, व्यवसाय यातील सुखकारकता यासाठी सुद्धा हवामानशास्त्र उपयोगी ठरले आहे.
    मराठी भाषीय विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या अभ्यासक्रमासाठी, स्पर्धापरीक्षा, नेट सेट आणि विद्यापीठीय स्तरावरील संशोधन व मार्गदर्शनासाठी हे पुस्तक निश्चितपणे उपयुक्त ठरेल. ओझोनचा होणारा र्‍हास, ग्लोबलवार्मिग यासारख्या सतत भेडसावणार्‍या समस्यांच्या निराकरणासाठी मार्गदर्शक म्हणून हवामानशास्त्रातील संकल्पना उपयुक्त आहेत. सर्व विद्यापीठातील अभ्यासक व शिक्षक यांना मार्गदर्शनासाठी ‘हवामानशास्त्र’ निश्चितपणे बहुगुणी ठरेल.

    Hawamanshastra

    Rs.350.00
    Add to cart