-
हवामानशास्त्र आणि सागरविज्ञान
Rs.250.00पृथ्वीवरील सजीवसृष्टी, पर्यावरण आणि मानवीजीवनाची सुरक्षितता या दृष्टीकोनातून हवामानशास्त्र, अत्यधिक महत्त्वाचे शास्त्र आहे. पर्यावरणातील संपूर्ण हालचाली, भुपृष्ठावरील घडामोडी, अवकाशातील अस्थिरता, जलभागातील प्रदुषण, वादळ-वारे, पाऊस आणि जागतिक तापमानातील वाढ इत्यादी सर्व घटकांचा, संकल्पनांचा समावेश ‘हवामानशास्त्रात’ केलेला आहे. तसेच सागरीय भूस्वरूपे, सागरीजल गुणधर्म, सागरी जलाच्या हालचाली, सागरी किनारा महत्त्व इत्यादींचा समावेश सागरी विज्ञानात केलेला आहे. फक्त सजीवांचे संरक्षण म्हणून नव्हे तर त्यांची उत्पादनशीलता, राहणीमान, उद्योगधंदे, व्यवसाय यातील सुखकारकता यासाठी सुध्दा हवामानशास्त्र उपयोगी ठरले आहे.
मराठी भाषीय विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या अभ्यासक्रमासाठी, स्पर्धापरीक्षेसाठी, नेट सेटसाठी आणि विद्यापीठीय स्तरावरील संशोधनासाठी व मार्गदर्शनासाठी हे ‘हवामानशास्त्र’ व ‘सागरविज्ञान’ निश्चितपणे उपयुक्त आहे. ओझोनचा होणारा र्हास, ग्लोबलवार्मिग यासारख्या सतत भेडसावणार्या समस्यांच्या निराकरणासाठी मार्गदर्शक म्हणून हवामानशास्त्रातील संकल्पना उपयुक्त आहेत. सर्व विद्यापीठातील युवक युवतीसाठी अभ्यासक व शिक्षक मार्गदर्शनासाठी हे ‘हवामानशास्त्र’ व ‘सागरविज्ञान’ निश्चितपणे बहुगुणी आहे.Havamanshastra Ani Sagarvidnyan
-