-
बँकींगची मूलतत्त्वे कार्यपद्धती
Rs.395.00वाणिज्य आणि व्यवस्थापन शास्त्र ही एक गतीमान विद्याशाखा आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक क्षेत्रात ज्या घडामोडी घडतात. त्या वाणिज्य विद्याशाखेत प्रतिबिंबीत होतात. खरे म्हणजे ही विद्याशाखा प्रत्येक देशात एक लिडरच्या भूमिकेत वावरत असते. अर्थव्यवस्थेचा गाडा सुरक्षित असेल तर देश सुरक्षित असतो. याची ही विद्याशाखा धोरणकर्त्यांना जाणिव करून देत असते. देशाच्या अर्थखात्याचा प्रमुख अर्थशास्त्र व वाणिज्यचा जाणकार असेल तर तो देशाच्या अर्थव्यवस्थेला एका उंचीवर नेवून पोहोचवतो हे प्रा. सी. डी. देशमुख, डॉ. मनमोहन सिंग ह्या माजी अर्थमंत्र्यांनी सिद्ध केले आहे.
वाणिज्य विद्याशाखेत बँकींग अॅन्ड फायनान्स हा एक कोअर विषय आहे. उद्योगधंद्यांना कर्जरूपाने रक्त पुरवठा करण्याचे कार्य बँका व वित्तीय संस्था करीत असतात. बँक हा एक नफा तोट्याला जबाबदार असणारा व्यवसाय आहे. काळानुरूप त्यात सतत बदल होत आहेत. आजची भारतीय बँकींग प्रणाली बरीच विकसित झाली आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारांची गती वाढविण्याचे कार्य बँका आणि वित्तीय संस्था करीत आहेत.Banking Multattve Karyapaddhati
-
भारतीय अर्थव्यवस्था : संधी आणि आव्हाने
Rs.225.00सदरील पुस्तकात भारतीय अर्थव्यवस्थेची समस्या व उपाययोजना, आर्थिक विकास, आत्मनिर्भर भारत, कामगार समस्या, रोजगार योजना आणि विकास, शेती समस्या आणि विकास, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू महाराज यांचे आर्थिक विचार इत्यादी घटकांचा आढावा घेतलेला आहे.
या संपादित पुस्तकामध्ये लेखकांनी त्यांचे लिखाण संशोधन करून मांडलेले आहेत तसेच या समस्येवर विविध उपाय सुचवले आहेत. त्या माध्यमातून त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या विविध पैलूंना स्पर्श करून त्यातील संधी व आव्हाने यांचा शोध घेऊन वाचकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सदर पुस्तक संपादक या नात्याने वैचारिक मेजवानी म्हणून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.Bhartiya Arthavyavastha- Sandhi ani Avhane