-
-
भारतीय अर्थव्यवस्था 1980 पासून (भाग 1)
Rs.395.00दरवर्षी सरासरी 7% आर्थिक विकास साध्य करणारी, एक उद्योन्मुख अर्थव्यवस्था म्हणून जगातील सहाव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्था वेगाने पुढे येत आहे. अलीकडील भारतीय अर्थव्यवस्था ही एक गतीमान अर्थव्यवस्था आहे. जागतिक पातळीवर विकासाबाबत अग्रेसर आहे. असे असले तरी भारतीय अर्थव्यवस्थेसमोर दारीद्य्र, बेरोजगारी, विषमता, काळा पैसा या प्रमुख समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी भारत सरकारने अलीकडील काळात थेट लाभ हस्तांतरण, जनधन योजना, मुद्रा योजना, कौशल्य विकास योजना, मेक इन इंडिया ह्या योजना सुरू केल्या आहेत. काळा पैशावर आघात करण्यासाठी चलन निश्चलनीकरण केले. अप्रत्यक्ष करांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी वस्तू आणि सेवा कर लागू केला.
सदरील पुस्तकात भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, मानव संसाधन व संबंधित समस्या, पायाभूत संरचना, भारतीय कृषीशी संबंधित बाबी, औद्योगिक व सहकारी क्षेत्र, नियोजन आणि नीति आयोग आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील अलिकडील बदलांचा समावेश केलेला आहे.
Bharatiya Arthavyavastha 1980 Pasun (Bhag 1)