-
सूक्ष्म अर्थशास्त्र
Rs.195.00सदरील पुस्तकात अर्थशास्त्राची ओळख, मागणी आणि पुरवठा, घटत्या किंवा र्हासमान सीमांत उपयोगितेचा सिध्दांत, व्यय (खर्च) आणि प्राप्ती (उत्पन्न) विश्लेषण, बाजारपेठांची संरचना, उत्पादनाचे घटक या घटकांचे यथोचित विश्लेषण करण्यात आलेले आहे. ग्रामीण भागातील विद्याथीवर्ग डोळ्यासमोर ठेवून अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना साध्या व सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आवश्यक तेथे कोष्टके, आकृत्या, भरपूर मुद्दे व व्यावहारिक उदाहरणांचा वापर केलेला आहे. पुस्तकाची मांडणी विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल अशा सोप्या व सुटसुटीत भाषेत केलेली आहे. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र हा विद्यार्थीवर्गाला कठीण वाटणारा विषय सहजतेने समजून तो सोपा वाटेल अशी खात्री वाटते.
Sukshma Arthashastra
-
सूक्ष्म अर्थशास्त्र
Rs.450.00सूक्ष्म अर्थशास्त्र हे एक मानवी जीवनाशी निगडीत अशा आर्थिक व्यवहारांचे अध्ययन करणारे एक सामाजिक शास्त्र आहे. मानवी जीवनात धन किंवा संपत्तीला अनन्य साधारण महत्व आहे. धन किंवा संपत्ती म्हणजेच पैशाची प्राप्ती करण्यासाठीच मानव विविध वस्तू वा सेवांचे उत्पादन करतो. उत्पादनासाठी भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन या चार घटकांचे प्रमाणशिर एकत्रीकरण केले जाते. उत्पादन घटकांच्या वापराबद्दल घटक किंवा घटक मालकांना खंड, वेतन, व्याज आणि नफा रूपात आर्थिक मोबदला प्राप्त होतो. प्राप्त मोबदल्याच्या साहाय्याने वस्तू वा सेवांचा विनिमय केला जातो आणि त्यांचा उपभोग घेतला जातो. उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या आर्थिक क्रिया करतांना मानव जे वर्तन करतो त्याचे सूक्ष्म अर्थशास्त्रात अध्ययन केले जाते. 1776 मध्ये अॅडम स्मिथ यांचा ‘राष्ट्राची संपत्ती’ हा मौलीक ग्रंथ प्रकाशित झाला आणि तेव्हापासून अर्थशास्त्र ह्या अभ्यास विषयाला एक स्वतंत्र शास्त्र म्हणून मान्यता मिळाली. 1776 पासून ते आजपर्यंत सूक्ष्म अर्थशास्त्र ह्या विषयाचा प्रचंड विकास आणि विस्तार झाला आहे. या प्रदीर्घ काळात अर्थशास्त्राची व्याख्या, स्वरूप, व्याप्ती यात अनेक बदल झाले आहेत.
प्रत्येक मुद्यांचे विस्तृत विवेचन करण्याचा यथायोग्य प्रयत्न या पुस्तकात केला आहे. विषयाच्या आकलनासाठी आवश्यक तेथे आकृत्यांचा वापर केलेला आहे. प्रत्येक संज्ञा व संकल्पना सर्वांना सहज ज्ञात होतील अशा सुलभ भाषेत मांडण्यात आल्या आहेत.Sukshm Arthashastra