Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

संतसाहित्य / लोकसाहित्य

संतांचे शब्दामृत

Santanche Shabdamrut

Rs.125.00

प्रस्तुत ग्रंथात ‌‘श्रीतुकाराम गाथा’ मधून निवडक अभंग घेऊन त्यावर भाष्य करण्यात आले आहे. क्षणोक्षणी हाचि करावा विचार, सुख पाहता जवापाडे, म्हणऊनि शरण जावे, कन्या सासुऱ्याशी जाये, बोल बोलता वाटे सोपे, बळियाचे अंकित, मढे झाकुनिया करिती पेरणी, असो खळ ऐसे फार हे निवडक व जीवनविद्या शिकविणारे अभंग घेतलेले आहेत. सर्वच अभंग जीवनाला योग्य वळण देणारे आहेत. म्हणून संतसंगतीची तातडी जीवनात करावी. कारण की आयुष्य हे क्षणभंगुर आहे. केव्हा काय होईल सांगता येत नाही. जीवनाची क्षणभंगुरता लक्षात घेऊन तातडीने संतसमागम करावा. म्हणजे पुढील विघ्ने टळतील. मनाला शांतता लाभेल. आपल्या हातून वाईट कार्य घडणार नाही.संपूर्ण विश्वालाच या संत विचारांची गरज आजही आहे. हा संत वारसा आपण सर्वांनी चालविण्याची गरज आहे. त्या दृष्टीने केलेले कार्य उत्कृष्ट आहे. सर्वांनी मनापासून वाचावा, जीवनाचे मोल समजून घ्यावे व भविष्याकडे योग्य वाटचाल करावी. प्रस्तुत ‌‘संतांचे शब्दामृत’ हा ग्रंथ जगत्‌‍मान्य-वाचकप्रिय होईल, यात शंकाच नाही.

Santanche Shabdamrut

  1. क्षणोक्षणी हाचि करावा विचार
  2. सुख पाहता जवापाडे
  3. असो खळ ऐसे फार
  4. म्हणउनि शरण जावे
  5. कन्या सासुऱ्याशी जाये
  6. आतां तरी पुढे हाचि उपदेश
  7. बळियाचे अंकित
  8. बोल बोलता वाटे सोपे
  9. मढे झाकुनिया करिती पेरणी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “संतांचे शब्दामृत”
Shopping cart