Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

संतसाहित्य / लोकसाहित्य

संतप्रबोधन

Rs.250.00

संत आणि महाराष्ट्र हे नातं अतूट आहे. वारकरी संप्रदायाच्या आचारविचारांनी अखिल मराठी जगताचं जगणं समृद्ध अन्‌‍ सुगंधित केलं. संत विचार कालातीत आहेत. प्रत्येक काळात त्यांनी सकारात्मक मार्ग दाखविला. भेदाभेदाला तिलांजली देत माणसाला माणूसपण दिलं. कीर्तन परंपरेनं तर संत विचारांची पताका कायम फडकवत ठेवली. संतनगरी शेगाव येथील निवासी ह.भ.प. डॉ. श्री. हरिदास आखरे यांनी केवळ उक्तीच नव्हे, तर कृती आणि लेखणीतूनही सद्विचार मांडला. त्यांच्या दैनंदिन जगण्यातून वारकरी जीवनपद्धतीला प्रकट केलं. वारकरी तत्त्वज्ञान त्यांनी अतिशय तन्मयतेनं प्रस्तुत केलं. जगण्याचा भाग बनविलं.
विविध माध्यमांमध्ये वेळोवेळी लेखणीतून पसरलेला हा सुगंध या पुस्तक रूपात एकत्र आला आहे. अतिशय सुलभ व लाघवी भाषालंकारानं नटलेला हा संग्रह एक विचारकस्तूरी आहे!

– संदीप भारंबे,
कार्यकारी संपादक, सकाळ, विदर्भ

Santprabhodhan

  1. सदा माझे डोळा | जडो तुझी मूर्ती
  2. संत तुकारामांच्या अभंगातील जीवन मूल्यविचार
  3. भेटीलागी जीवा
  4. या रे नाचू प्रेमानंदे..!
  5. ज्ञानिया घरी दिवाळी
  6. कृष्णं वंदे जगद्गुरू…!
  7. याला जीवन ऐसे नाव
  8. जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूति…
  9. कर्मे ईशू भजावा
  10. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम
  11. सत्य असत्याशी मन केले ग्वाही
  12. धन्य आजि दिन… संत दर्शनाचा
  13. गुरु परमात्मा परेषू…
  14. तरुणांनो, सर्वगुण संपन्न व्हा…
  15. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा…
  16. चला पंढरीसी जाऊ… विठ्ठल डोळ्याने पाहू
  17. वारी… अनुभूती आनंदाची..!
  18. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी…!
  19. गीतार्थ थोरवी..!
  20. संत साहित्यातील समाजप्रबोधन
  21. विदर्भातील संत परंपरा
  22. गुरु माउली गजानन
  23. आपुले मरण पाहिले म्या डोळा..!
  24. माझे माहेर पंढरी..!
  25. देश हा देव असे माझा
  26. मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका
  27. शानदार हो मेरा भारत
  28. वर्तमान स्थितीतील समस्यांची उकल करण्याची क्षमता संत साहित्यात
  29. श्रीज्ञानेश्वरीतील विकर्मे : एक शोध व बोध
  30. संत तुकारामांचा विश्वात्मक मूल्यविचार
  31. संत तुकारामांचा ज्ञानमूल्य विचार

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “संतप्रबोधन”
Shopping cart