Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मराठी

उपयोजित मराठी (भाग – 1) (SGBAU)

Rs.150.00

भाषा व वाङ्मय हे सौंदर्य निर्मिती करत असतात, जीवनमूल्यांची शिकवण देत प्रगत जीवन जगण्यास प्रेरणा देतात. त्यातून वाचकाला आनंद प्राप्त होतो. हे सत्य असले तरी आजच्या या स्पर्धेच्या युगात सौंदर्यनिर्मितीच्या आनंदप्राप्तीबरोबरच व्यावहारिक जीवनात उदरनिर्वाह करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपजत गुणांना प्रोत्साहन देणेही गरजेचे आहे. म्हणूनच पोट भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी सक्रिय राहावे म्हणून ‘उपयोजित मराठी’ या अभ्यासक्रमाला विद्यापीठाने प्राधान्य दिले आहे. आजच्या जागतिकीकरणात प्रादेशिक भाषा अस्तित्वासाठी संघर्ष करीत असतानाच्या काळात हा अभ्यासक्रम अधिक उपयुक्त आणि गरजेचा आहे. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना भाषिक – लेखन कौशल्ये आत्मसात करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास साधता येतो.
विद्यार्थ्यांनी लेखनात विरामचिन्हांचा वापर व लेखनाचे नियम, मुद्रितशोधन, कार्यालयीन संज्ञापन व पत्रव्यवहार, अर्ज लेखन – नोकरीसाठी अर्ज, स्वपरिचय पत्र, भाषिक कौशल्ये, पत्रलेखन कौशल्य व नोकरीसाठी अर्जलेखन ही कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करून त्यांचे व्यावहारिक जीवन सुकर करता येते. त्यावर आधारीत प्रस्तुत ग्रंथाची रचना आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला ही कौशल्ये उपयुक्त ठरणारी आहेत. डॉ. प्रभाकर जोशी यांनी परिश्रमपूर्वक वरील कौशल्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीतून या पुस्तकाचे संपादन केले आहे.
मराठीच्या जिज्ञासू अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रस्तुत पुस्तक उपयुक्त व मार्गदर्शनपर ठरेल असा विश्वास आहे.

Upayojit Marathi (Bhag 1) (SGBAU)

  1. लेखनातील विराम चिन्हांचा वापर व शुद्धलेखनाचे नियम : 1.1 लेखनातील विराम चिन्हांचे महत्व व उपयुक्तता, 1.2 विराम चिन्हांचे प्रकार, 1.3 लेखनातील विराम चिन्हांचे उपयोजन, 1.4 शुद्धलेखनाचे नियम, लेखन नियमाची उपयुक्तता व उपयोजन
  2. मुद्रितशोधन : 2.1 मुद्रितशोधन म्हणजे काय?, 2.2 अक्षरजुळणीत मुद्रित शोधनाचे महत्त्व, 2.3 मुद्रितशोधन कसे करावे?, 2.4 मुद्रित शोधनाच्या खुणांचा तक्ता, 2.5 मुद्रित शोधनाचे उपयोजन
  3. कार्यालयीन संज्ञापन व पत्रव्यवहार : 3.1 कार्यालयीन संज्ञापन स्वरूप व वैशिष्ट्ये, 3.2 कार्यालयीन संज्ञापनाची गरज व वेगळेपण, 3.3 इतिवृत्त लेखन, 3.3.1 इतिवृत्त म्हणजे काय?, 3.3.2 इतिवृत्त लेखनाचे तंत्र, 3.3.3 इतिवृत्त लेखनाचे उपयोजन ः कार्यकारी सभा इतिवृत्त, वार्षिक सभा इतिवृत्त, 3.4 टिप्पणी लेखन, 3.4.1 टिप्पणी म्हणजे काय?, 3.4.2 टिप्पणी लेखणीचे तंत्र व उपयुक्तता, 3.4.3 टिप्पणी लेखनाचे उपयोजन – रजाअर्ज टिप्पणी, तक्रारअर्ज टिप्पणी, मागणी अर्ज टिप्पणी
  4. अर्ज लेखन – नोकरीसाठी अर्ज, स्वपरिचय पत्र : 4.1 अर्ज लेखन म्हणजे काय?, 4.2 नोकरीसाठी अर्जलेखन, 4.3 स्व-परिचय पत्र
  5. पत्रलेखन कौशल्य व नोकरीसाठी अर्जलेखन : 5.1 पत्रलेखन म्हणजे काय?, 5.2 पत्रलेखनाची उपयुक्तता, 5.3 पत्रलेखनाचे प्रकार, 5.3.1 कौटुंबिक पत्रलेखन – व्यक्तिगत पत्र, प्रासंगिक पत्र, 5.3.2 सांस्कृतिक पत्रलेखन – निमंत्रण पत्र, आभार पत्र, 5.3.3 कार्यालयीन पत्रलेखन – अर्ज लेखन, आदेश पत्र, 5.3.4 व्यावसायिक पत्रलेखन – मागणी पत्र, स्मरण पत्र, 5.4 पत्रलेखनाचे उपयोजन
  6. भाषिक कौशल्ये : 6.1 भाषा म्हणजे काय?, 6.2 भाषिक क्षमतांचा विकास, 6.3 भाषिक कौशल्यांचा परिचय, 6.3.1 श्रवण कौशल्य, 6.3.2 भाषण कौशल्य, 6.3.3 वाचन कौशल्य, 6.3.4 लेखन कौशल्य, 6.4 भाषिक कौशल्य विकासाची उपयुक्तता

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “उपयोजित मराठी (भाग – 1) (SGBAU)”
Shopping cart