Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मराठी

उपयोजित मराठी (भाग 2) (SGBAU)

Rs.95.00

विचारपूर्वक बोलता येणे व आपले विचार समर्पकपणे लिखित स्वरुपात मांडता येणे हे आज आवश्यक झाले आहे. ही क्षमता विकसित करण्यासाठी ‘वक्तृत्व’ स्पर्धामध्ये आपणास सहभाग घेता यावा, विविध उपक्रमांत ‘सूत्रसंचन’ करुन आपली नवी ओळख निर्माण करता यावी म्हणून पहिल्या दोन प्रकरणातून या कौशल्याची ओळख करुन दिली आहे. वक्तृत्व म्हणजे काय? उत्तम वक्ता होण्यासाठी कोणते प्रयत्न करावे? वक्तृत्व आणि भाषण यातील साम्यभेद कोणते? सूत्रसंचालनाचे तंत्र कसे आत्मसात करावे इत्यादी संदर्भातील माहिती आपणास या घटकाच्या अभ्यासातून मिळणार आहे. व्यावहारिक स्तरावर निमंत्रण पत्रिका-कार्यक्रम पत्रिका-विविध प्रकारची माहितीपत्रके यांचा परिचय आपणास असतोच. तिसरे व चवथे प्रकरणातून त्यासंदर्भातील माहिती समजून घेऊन त्याचे ‘लेखन कौशल्य तंत्र’ विकसित करता येईल. अभ्यासक्रमाशी संबंधित घटकांची सोदाहरण दिलेली माहिती नीट समजून देण्याचा प्रयत्न आहे. त्या आधारावर आपणास आपल्या ठिकाणी या कौशल्य अंगाचा विकास साधून आपले व्यक्तिमत्वाचा विकास साधता येईल. या हेतूनेच अभ्यासक्रमातील घटकनिहाय विवेचन प्रस्तुत पुस्तकात अभ्यासपूर्ण पद्धतीने देण्याचा प्रयत्न आहे. त्याचे स्वागत विद्यापीठाच्या परिसरातील अध्यापक, विद्यार्थीवर्ग करतील अशी आशा आहे.

Upyojit Marathi (Bhag  2) (SGBAU)

  1. वक्तृत्व कला : 1.1 ‘वक्तृत्व’ म्हणजे काय?, 1.2 वक्तृत्वाची पूर्वतयारी, 1.3 उत्तम वक्त्याची लक्षणे, 1.4 वक्तृत्वाची शैली, 1.5 भाषण तंत्र व उपयोजन
  2. सूत्र संचालन : 2.1 ‘सूत्र संचलन’ म्हणजे काय?, 2.2 सूत्र संचलन : एक कला, 2.3 सूत्र संचालकाची वैशिष्टये, 2.4 सूत्र संचलनाचे क्षेत्र, 2.5 सूत्र संचलनाचे तंत्र व उपयोजन
  3. ‘माहिती पत्रक’ लेखन तंत्र : 3.1 माहिती पत्रक : व्याख्या व प्रकार, 3.2 माहिती पत्रकाचे स्वरुप, 3.3 माहिती पत्रकाचे लेखन तंत्र, 3.4 माहिती पत्रकाची उपयुक्तता व उपयोजन
  4. निमंत्रण पत्रिका व कार्यक्रम पत्रिका : 4.1 निमंत्रण पत्रिका : व्याख्या व प्रकार, 4.2 निमंत्रण पत्रिका लेखन तंत्र, 4.3 कार्यक्रम पत्रिका : हेतू व उपयोजन, 4.4 कार्यक्रम पत्रिका : लेखन तंत्र, 4.5 कार्यक्रमाचे आयोजन स्वरुप व उपयोजन

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “उपयोजित मराठी (भाग 2) (SGBAU)”
Shopping cart