• आधुनिक बँकिंग व वित्तीय प्रणाली

    आधुनिक बँकिंग व वित्तीय प्रणाली

    Aadhunik Banking v Vittiy Paddhati

    Rs.195.00
    Add to cart
  • आधुनिक बँकींग आणि भारतीय वित्तीय बाजार

    आधुनिक बँकींग आणि भारतीय वित्तीय बाजार

    आजच्या प्रगत काळात दिवसेंदिवस बँक व्यवहाराचे व वित्तीय बाजाराचे महत्त्व वाढत आहे. अर्थव्यवस्थेत बँका व वित्तीय संस्थांचा जस-जसा विकास आणि विस्तार होत जातो, तस-तसा आर्थिक विकासाचा वेग वाढत जातो. अर्थव्यवस्थेत अतिरिक्त निधी गोळा करण्याचे व तो गतिशील करण्याचे कार्य बँका व वित्तीय संस्था करीत असतात. अर्थव्यवस्थेत बँकांचे महत्व अनन्य साधारण आहे. बँक जे व्यवहार करते त्यात बरीच जोखीम असते. त्या जोखीमचे व्यवस्थापन करावे लागते. भारतासह जगातील सर्वच बँक व्यवसायामध्ये नवतंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. यात प्रामुख्याने बँकांचे संगणकीयीकरण, इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींग, कोअर बँकींग, एटीएम, डेबीट कार्ड, टेली बँकींग, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, इलेक्ट्रॉनिक क्लिअरींग सर्व्हिस, स्वीफ्ट, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, रियल टाईम ग्रास सेटलमेंट, नॅशनल सेटलमेंट सिस्टीम, ई-परचेस, ई-मनी, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर अ‍ॅट पाँईट ऑफ सेल इत्यादी साधनांचा वापर केला जात आहे. प्रतिभूती बाजार हे वित्तीय बाजाराचे एक अभिन्न अंग आहे. वित्तीय बाजारात अल्पकालीन आणि दिर्घकालीन कर्जाची देवाण-घेवाण केली जाते. नाणेबाजारात अल्पकालीन कर्जाची देवाण घेवाण चालते. यासाठी अल्पसूचनेद्वारे परत मिळणारी कर्जे, कोषागार हुंड्या, व्यापारी हुंडया या साधनांचा वापर केला जातो. भांडवल बाजार दीर्घकालीन कर्जे, गुंतवणूक देवाण घेवाण केली जाते.
    प्रस्तुत पुस्तकात आधुनिक बँकींग व वित्तीय बाजाराची इत्यंभूत माहिती देण्याचा यथोचित प्रयत्न केला आहे.

    Adhunik Banking Ani Bharatiya Vittiya Bajar

    Rs.325.00
    Add to cart