-
औद्योगिक अर्थशास्त्र
Rs.380.00आधुनिक काळात औद्योगिक व आर्थिक विकासात उद्योगधंद्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची समजली जाते. आधुनिक काळात ‘औद्योगिक अर्थशास्त्र’ हा विषय विकसित होत आहे. 1930 च्या जागतिक महामंदीच्या काळात औद्योगिक अर्थशास्त्र प्रस्थापित झाले. इंग्लंड, अमेरिका या देशांमध्ये मोठे उद्योग, व्यवस्थापक आणि व्यवस्थापन कार्ये यांचे महत्त्व वाढल्यामुळे औद्योगिक अर्थशास्त्र असेही म्हणतात. म्हणून उद्योग आणि उद्योगासंबंधीचे घटक या विषयीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच औद्योगिक अर्थशास्त्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
या पुस्तकात औद्योगिक अर्थशास्त्राची व्याप्ती, आवश्यकता, महत्त्व याबरोबरच औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक, उद्योग संस्थेची वर्तवणूक, संगनमत एकत्रीकरण यांचा अभ्यास केलेला आहे. तसेच उद्योगाची स्थाननिश्चिती, स्थानिकीकरणाचे घटक त्यासंबंधीचा वेबरचा व फ्लोरेन्सचा सिद्धांत याविषयीचा अभ्यास या पुस्तकात केलेला आहे. तसेच गुंतवणूक संशोधन विकास किंमतविषयक पद्धती, प्रकल्पाचे मूल्यमापन या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. किंमतविषयक निर्णय, किंमत पद्धतींचा हा अभ्यास केलेला दिसून येतो. पहिल्या भागात वरील सर्व गोष्टींचा अभ्यास केलेला आहे तर दुसर्या भागात खाजगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र, उदारीकरण, जागतिकीकरण, लघुउद्योग व मोठे उद्योग, त्यांच्या भूमिका व समस्यांचा विचार केलेला आहे.
Audyogik Arthashastra
-
औद्योगिकीकरण आणि सामाजिक-पर्यावरणीय समस्या
Rs.295.00औद्योगिकीकरण म्हणजेच आर्थिक विकास म्हणता येईल. कोणत्याही देशाची प्रगती ही निरनिराळ्या घटकांवर अवलंबून असते. औद्योगिकरण हा त्यातील एक घटक होय. कारण औद्योगिकीकरणाच्या वेगावर देशाच्या आर्थिक विकासाचा वेग अवलंबून असतो. त्यासाठी प्रत्येक देशाने आपल्या देशाचा आर्थिक विकास जलद घडवून आणण्यासाठी औद्योगिकरणावर भर दिलेला आहे. जगात वरचढ स्थानासाठी प्रगत राष्ट्रांमध्ये चूरस निर्माण झाली आहे. त्यामुळे ही राष्ट्रे विकसनशील देशांत अधिकतम उद्योगधंदे निर्माण करायला प्रोत्साहन देत आहेत, वेळ प्रसंगी दबाव आणत आहेत. आज देशाचा औद्योगिक विकास साधण्यासाठी औद्योगिकीकरणाद्वारा उत्पादन वाढविण्याशिवाय पर्याय उरला नाही.
प्रदूषण, मानवी स्वास्थ्य व समाजातील विविध समस्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. औद्योगिकीकरणामुळे आपल्या समाजात विविध समस्या निर्माण होत आहे व प्रदूषणही वाढतांना दिसत आहे. या सर्वांचा विचार सरकार बरोबर सर्व जनतेनेही करणे आवश्यक आहे. त्यासाठी नवीन उद्योग हे शहराऐंवजी खेड्या-पाड्यात सूरु केले तर शहरीकरणाची समस्या कमी होऊन प्रदूषणही कमी होण्यात मदत होईल. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन आपल्या देशातील औद्योगिकरणाचा विकास वाढविला पाहिजे औद्योगीक क्रांती ही मानवी समाजाला काही बाबतीत वरदान तर काही बाबतीत शापही ठरली आहेत. औद्योगिक विकासामुळे मानवी जीवनात मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आहेत. नैसार्गिक साधन संपत्तीचा औद्योगिक विकासासाठी फार मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला. नैसार्गिक साधन संपत्तीच्या अति वापरामुळे पर्यावरणावर त्याच्या प्रभाव दिसून येत आहे.Audyogikikaran Ani Samajik-Paryavaraniya Samsya