• कृषी विकासाचे अर्थशास्त्र (आव्हाने व उपाय)

    कृषी विकासाचे अर्थशास्त्र (आव्हाने व उपाय)

    भारत कृषीप्रधान देश असून भारतातील 70 टक्के लोक कृषी व्यवसायाशी प्रत्यक्ष निगडित आहे. राष्ट्रीय उत्पन्नात एकेकाळी सर्वाधिक व आजही बहुतांश वाटा कृषी क्षेत्राचा दिसून येतो. भारतातील लघु, कुटिर व इतरही उद्योग क्षेत्र शेतीमधून निर्मित होणार्‍या कच्च्या मालावर अवलंबून आहेत. अतिरिक्त लोकसंख्या असणार्‍या या देशातील रोजगार निर्माण करून देणारे सर्वात मोठे क्षेत्र कृषी हेच आहे. पुरातन काळापासून भारतीय शेतीमधील उत्पादित कृषी माल विविध देशात निर्यात होत आहे. असे असूनही भारतीय शेतीची अवस्था आजही अविकसित स्वरुपाची दिसून येते. याला कोणती कारणे असतील याचा शोध घेण्यासाठी एका जिल्ह्यापुरता प्रयत्न करीत आहे. अमरावती महसूल, विदर्भ, महाराष्ट्र व काही प्रमाणात संपूर्ण देशातील कृषी घटकांचा व विकासाचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा प्रयत्नदेखील या पुस्तकात करण्यात आला आहे. कृषी क्षेत्रातील विविध पिकांचे, बाजारपेठेचे अध्ययन करून कृषकांची आज असलेली आर्थिक स्थिती अभ्यासण्याचा प्रयत्न केला आहे. संशोधनासाठी निवडलेल्या विषयाची सखोलता, विविध प्रकारच्या मर्यादा व अडचणी लक्षात घेऊन अधिक वास्तविकता वाचकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेतून मांडणी करण्याचा आणि वाचण्याची गोडी निर्माण होईल, असाही प्रयत्न केला आहे.

    Rs.150.00
    Add to cart
  • कौटुंबिक संसाधनांचे व्यवस्थापन आणि आंतरिक सजावट

    कौटुंबिक संसाधनांचे व्यवस्थापन आणि आंतरिक सजावट

    गृहव्यवस्थापन आणि अंतर्गत सजावट करतांना महिलांना अनेक प्रश्न पडतात. अशा वेळी महाविद्यालयीन स्तरापासूनच विद्यार्थिनींना व भावी गृहिणींना तसेच स्वतः व्यवसाय उभारणाऱ्या गृहिणीना सहकार्य करण्याच्या उद्देशाने लिखित हि पुस्तिका असून यामध्ये गृहअर्थशास्त्राचे महत्व, विविध शाखा, कौटूंबिक साधन संपत्ती व्यवस्थापन, निर्णय प्रक्रिया, रंग व रंग योजना, पुष्परचना, कार्यक्रमाचे व्यवस्थापन, कार्यसरलीकरणाचे महत्त्व, घरगुती कामात कार्यसरलीकरणाचे तंत्र, फर्निचर मांडणी, फर्निचर निवड व त्याची काळजी, जलसंधारण सांडपाण्याचे निष्कासन, कचऱ्याची विल्हेवाट, स्वयंरोजगार, गृहअर्थशास्त्रातील रोजगार संधी, महिला सक्षमीकरणात जिल्हा उद्योग केंद्र, स्वसहाय्यता गटाचे योगदान, महिला आर्थिक विकास मंडळाची भूमिका ब्लॉकचा परिचय, ब्लॉक प्रिंटींग तयार करणे, स्कार्फ, उशी, टेबल क्लॉथ हे सर्व प्रात्यक्षिक या सर्वभागाचा या पुस्तकात समावेश केला आहे. याचा उपयोग करुन उत्सुक महिला आवडीप्रमाणे व्यवसाय सुरु करुन आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करु शकतील. सदर पुस्तक हे विद्यार्थिनी, गृहिणी तसेच अध्यापकाकरिता उपयुक्त ठरणार आहे.

    Kautubik Sansadhanache Vyavsthapan V Antarik Sajawat (Part 1)

    Rs.525.00
    Add to cart