• कापूस प्रक्रिया उद्योग

    कापूस प्रक्रिया उद्योग

    महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत कापूस पिकास अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच जिल्ह्यात कापसाचे उत्पादन होते. सर्वच जिल्ह्यात कापूस प्रक्रिया उद्योग आहेत. या उद्योगाचा कल सामान्यतः विकेंद्रीकरणाकडे आहे. महाराष्ट्रातील या उद्योगधंद्यामुळे विशेषतः ग्रामीण भागाचे औद्योगिकीकरण होत आहे. हा उद्योग श्रमप्रधान आहे. यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होण्यास मदत होत आहे. तसेच शहरात होणार्‍या लोकांच्या स्थलांतराला या उद्योगामुळे काहीअंशी आळा बसतो. या उद्योगात एकाच वेळी अनेक क्षेत्राचा विकास होतो. यात स्थानिक साधनसामग्री मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. त्यामुळे उत्पादन खर्च कमी येतो. वेळ, श्रम, पैसा वाचतो म्हणून या उद्योगाला अतिशय महत्त्व आहे.

    या कारखान्यांचा पूर्वइतिहास पाहता, ब्रिटिशकाळापासून हे कारखाने महाराष्ट्रात स्थापन झाले आहेत. अनेकदा हे कारखाने सुरू झालेत आणि बंद पडले आहेत. भविष्यात महाराष्ट्रातील कापूस प्रक्रिया उद्योगाला स्थैर्य मिळवून देण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे ठरणार आहे. या पुस्तकाचा वाचकाबरोबर सरकार, संशोधक, उद्योजक, कापूस उत्पादक शेतकरी, तसेच या उद्योगावर आधारित पूरक उद्योगधंद्यातील उद्योजक यांना उपयोग होणार आहे. भारताच्या कृषीप्रधान अर्थव्यवस्थेत शेतीवर आधारित असलेल्या उद्योगांच्या प्रगतीसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे.

    अतिशय सोपी भाषा, स्थानिक भाषा व संकल्पनांचा वापर, आलेख, तक्ते, नकाशे, फोटो यांचा वापर केल्यामुळे हे पुस्तक समजण्यास सोपे झालेले आहे. लेखकाने क्षेत्र भेटी देऊन गोळा केलेली माहिती व आकडेवारीच्या साहाय्याने केलेले विश्लेषण वास्तव परिस्थितीचे दर्शन घडविते. अत्यंत मेहनत घेवून तयार केलेले हे पुस्तक कापूस उद्योगास तसेच अर्थशास्त्राच्या अभ्यासकास उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही.

    Kapus Prakriya Udyog

    Rs.180.00
    Add to cart
  • कृषी अर्थशास्त्र

    कृषी अर्थशास्त्र

    भारत हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. ग्रामीण भागात शेतीक्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रमाणात आहे. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 68% जनता या क्षेत्रात गुंतलेली आहे. जगातील कोणत्याही राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत शेतीला महत्वाचे स्थान असते.

    20 व्या शतकाच्या सुरूवातीला अर्थशास्त्राची एक स्वतंत्र शाखा म्हणून ‘कृषी अर्थशास्त्र’ कार्यरत झाले. दुसर्‍या जागतिक महायुद्धानंतर या शाखेचे महत्व मोठ्या प्रमाणात वाढले. सध्या जगातील बहुसंख्य विकसनशील अर्थव्यवस्थांमधील उदा. राष्ट्रीय उत्पन्न, निर्यात, अन्नधान्य, कच्चा मालाचा पुरवठा, रोजगार वगैरे क्षेत्रात कृषी क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे. वाढत जाणार्‍या लोकसंख्येची अन्नधान्याची आणि सातत्याने वाढत जाणार्‍या विविध उद्योगांच्या कच्च्या मालाची गरज शेती क्षेत्राकडूनच पूर्ण होत आहे.

    कृषी आधारीत अर्थव्यवस्थेचे रूपांतर उद्योगाधारीत अर्थव्यवस्थेत होण्यासाठी शेतीबद्दलचा पारंपारिक दृष्टीकोन बदलवून आधुनिक दृष्टीकोनाचा स्विकार होणे काळाची गरज ठरते. संसाधनाचा योग्य वापर, घटकांचा युक्त संयोग, पर्यायी उत्पादन तंत्राची निवड, विपणनाच्या समस्या, व्यवस्थापन, उत्पादन फलन इत्यादी अनेक बाबतीत कृषी अर्थशास्त्र महत्वाची भूमिका निभावू शकते. शेती क्षेत्रात व्यापारी दृष्टीकोन रुजवण्यात शेतीच अर्थशास्त्र महत्वपूर्ण योगदान देवू शकते.

    Krushi Arthashastra

    Rs.225.00
    Add to cart