-
महाराष्ट्राचे राजस्व
Rs.250.00भारतीय राज्यघटनेने राज्याकडे अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आणि कार्ये सोपविलेली आहेत. राज्यांनी कल्याणकारी राज्यांची संकल्पना स्वीकारल्यामुळे राज्यातील जनतेला जास्तीत जास्त सुविधा पुरविण्याची जबाबदारी राज्याची आहे. राज्य सरकारे अर्थ संकल्पाच्या माध्यमातून या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. आर्थिक, सामाजिक उद्दिष्ट्ये साध्य करण्याचे एक साधन म्हणून देखील राज्याच्या अर्थसंकल्पाला महत्त्व आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासूनच राज्याच्या आर्थिक व सामाजिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न राज्याच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केला गेला आहे.
प्रस्तूत संशोधनात्मक ग्रंथात महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पासंदर्भातील पूर्वसंशोधन साहित्य, अर्थसंकल्पातील जमा-खर्च बाजू, अर्थसंकल्पातील विविध तुटींची स्थिती, राज्याची कर्ज स्थिती व शिल्लक कर्जाचे प्रमाण, राज्याचा विकास खर्च व विकासेत्तर खर्च, अर्थसंकल्पातील तुटीचे तुलनात्मक अध्ययन त्याचप्रमाणे केंद्रीय सरकारने नुकतीच लागू केलेली वस्तू आणि सेवा कर प्रणाली (जीएसटी) याविषयीचे सविस्तररित्या, अभ्यासपूर्ण विश्लेषण करण्यात येवून काही ठळक निष्कर्षांचीही माहिती देण्यात आल्याने प्रस्तुत ग्रंथ हा सर्वसामान्य वाचक, अभ्यासक-संशोधक यांच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, यात शंकाच नाही.Maharashtrache Rajasv (1991-92 to 2020-21)
-
मानव विकास (भाग-2)
Rs.150.00पालकत्व म्हणजे खरतर घरामध्ये नित्यनेमाने घडणारे विविध छोटे मोठे प्रसंग, मतभेद, संघर्ष आणि अचानक उद्भवणार्या घटनावरील प्रतिसादांची एक न संपणारी मालिकाच असते. चांगल्या पालकत्वासाठी आवश्यकता आहे ती कौशल्याची. आजचे पालकत्व जास्त जबाबदारीचे आणि जोखीमेचे झाले आहे. आई वडिलांप्रमाणे त्यांची मुले असतात असा समज समाजामध्ये आढळतो. बालकाचा रंग, रुप, आकार, बौध्दिक क्षमता आपल्या आई वडिलाशी मिळते जुळते असते. वास्तविक शरीररचना व बाह्यवेषभूषेवरून चांगले अगर वाईट व्यक्तित्व ठरविणे दोषपूर्ण ठरेल. मानवी विकासाच्या विविध पैलूचा अभ्यास करतांना व्यक्तित्व इतरांच्या आपल्याबद्दलच्या अपेक्षा व अभिवृत्ती यांना अनुसरून निश्चित होईल. व्यक्तिपरत्वे व्यक्तीत्व बदलत जाईल. नेतृत्व हे व्यक्तीसापेक्ष व परिस्थितीसापेक्ष आहे. समाज परिवर्तनासाठी शिक्षकांची भूमिका खूप महत्वाची असल्यानेच समाजात शिक्षकांना अनन्यसाधारण महत्व आहे.
सदरील पुस्तकात अनुवंशिकता, वातावरण, विकासात यांची भूमिका, वातावरणाचे प्रकार, संयुक्त, विभक्त कुटुंबाची विकासात भूमिका, व्यक्तीमत्व संरक्षण यंत्रणा, स्वत्वकल्पना, प्रकार, नेतृत्व, प्रकार, गुण, बालकाच्या वर्तनसमस्या लैंगिक शिक्षण, महत्व, अपंग बालकाच्या शैक्षणिक अडचणी, किशोरावस्थेतील शारिरिक भावनिक बदल, सवयी, पालकत्व, प्रकार पालकबालक संबंध, महत्व, बालसंगोपनाच्या पद्धती, पालकांना आव्हान इ. विविध मुद्द्यांचा यथोचित समावेश केला आहे.Manav Vikas