• मौद्रिक प्रणाली

    मौद्रिक प्रणाली

    “मौद्रिक प्रणाली” हा विषय विविध स्पर्धा परीक्षा तसेच अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी या पुस्तकामध्ये नवीन आकडेवारीनुसार मांडणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नोटाबंदीचा मुद्राबाजारावर झालेला परिणाम व त्याचे फायदे आणि तोटे इत्यादी बाबींचे विश्लेषण करण्यात आले आहे. या पुस्तकाची पाच प्रकरणामध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणामध्ये वस्तुविनिमय आणि त्याच्या अडचणी; मुद्रेचा इतिहास, अर्थ, व्याख्या आणि स्वरूप; मुद्रेची कार्ये आणि महत्व; मुद्रेचे प्रकार आणि निश्चलनीकरणाचे फायदे आणि तोटे बाबींचे विश्लेषण करण्यात आले आहे. दुसर्‍या ‘मुद्रामूल्य’ या प्रकरणात मुद्रेची मागणी व मुद्रेचा पुरवठा त्यांचा अर्थ आणि निर्धारक घटक, मुद्रेचे मूल्य, मुद्रेची मागणी व पुरवठा यांचे संतुलन, फिशरचा मुद्रा परिमाण सिद्धांत याबाबत विश्लेषण करण्यात आले आहे. तिसर्‍या प्रकरणामध्ये स्फिती व अपस्फिती आणि व्यापारचक्र; चौथ्या मुद्राबाजार या प्रकरणामध्ये भारतीय मुद्राबाजार व्यवस्था आणि त्यावर निश्चलनीकरणाचा झालेला परिणाम तर पाचव्या भांडवल बाजारावरील प्रकरणामध्ये भारतीय भांडवल बाजार, त्याचे महत्व आणि कार्य त्याचप्रमाणे सेबीच्या जबाबदार्‍या आणि कार्ये इत्यादीसंदर्भात मांडणी करण्यात आली आहे. नवीन आकडेवारीनुसार लिहिलेल्या या पुस्तकाचे स्वागत प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील अभ्यासक करतील याबद्दल विश्वास आहे.

    Maudrik Pranali

    Rs.160.00
    Add to cart
  • रोजगार हमी योजना आणि शेतमजूर स्त्रियांचे आर्थिक सबलीकरण

    रोजगार हमी योजना आणि शेतमजूर स्त्रियांचे आर्थिक सबलीकरण

    स्वातंत्र्यानंतर विविध वैद्यकीय सोयीत वाढ झाल्यामुळे लोकसंख्या वेगाने वाढली. वाढत्या लोकसंख्येला रोजगार पुरविणे अत्यंत आवश्यक होते – कारण बेरोजगारांचा बोझा अर्थव्यवस्थेच्या विकासाला अडथळा निर्माण करतो हे शासनाच्या लक्षात आले होते. त्याकरिता रोजगार उपलब्ध करुन देणारी योजना स्थापने अनिवार्य होते. महाराष्ट्रातील सिंचीत क्षेत्राखालील जमिनीचे प्रमाण खूपच कमी होते व आहे. कोरडवाहू जमिनीचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे शेतीतून विशिष्ट कामासाठीच रोजगार उपलब्ध होत होता. उर्वरीत काळात भूमीहीन शेतमजूर, शेतकरी व अन्य रोजगारावर अवलंबून असणारे मजूर यांची अवस्था अत्यंत हलाखीची होत असे. राज्याचा कोणता ना कोणता भाग अवर्षणाच्या छायेत असायचा. ग्रामीण भागातील अल्पभूधारक, प्रचंड उपासमारी यामुळे ग्रामीण परिसरातील लोक स्थलांतर होत होते. वाढत्या स्थलांतरामुळे ग्रामीण भाग ओस पडून शेती उत्पादनावर विपरित परिणाम होत होता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष श्री.वि.स. पागे यांनी या योजनेची आखणी केली.
    देशाला स्वातंत्र्य मिळाले, वेगाने विकासासाठी पंचवार्षिक योजनाही सुरु झाल्यात, परंतु गत सहा दशकात दारिद्य्र निर्मलून व बेरोजगारी नष्ट झाली नाही. एकूण लोकसंख्येत स्त्रियांचा वाटा समाधानकारक असतानाही समाजात आजही स्त्रियांचे स्थान दुय्यमच आहे. समाज व्यवस्थेतील पुरुषांप्रमाणे स्त्रियांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. या हेतूने रोजगार हमी योजना आणि शेतमजूर स्त्रियांचे आर्थिक सबलीकरण या ग्रंथात अत्यंत बारकाईने रोजगार हमी योजनेचे स्वरुप व कार्यपध्दती, स्त्री शेतमजुराची आर्थिक स्थिती, रोजगार हमी योजनेत स्त्री श्रमिकांना उपलब्ध रोजगार व सोयी, रोजगार हमी योजनेतील निधी, खर्च व त्याचे रोजगारावरील परिणाम, स्त्री सबलीकरण व शासन स्तरावरील योजना, जागतिकीकरण व स्त्री सबलीकरण : स्वरुप व परिणाम या अनेक घटकांचा सखोल अभ्यास करण्यात आलेला असून, सदरील ग्रंथ समाजचिंतक, अभ्यासक, धोरणकर्ते यांच्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.

    Rojgar Hami Yojana Ani Shet Majoor Sriyanche Aarthik Sablikaran

    Rs.225.00
    Add to cart