• मानव विकास व शासकीय कार्यक्रम

    मानव विकास व शासकीय कार्यक्रम

    मानव विकासाचा एकंदरीत विचार करता, मानव विकास काय ते प्रथम पहायला हवे. मानवाच्या विविध विकासाचा व वाढीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानव विकास होय. मानवी जीवनाचा प्रारंभ गर्भधारणेपासून होतो. गर्भधारणा ते किशोरावस्था या काळात मानवाची वृद्धी व विकास होतो. विकास प्रक्रियेचा प्रारंभ मात्र गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंत सुरु असतो. निसर्गात असणाऱ्या विविध प्रकारच्या जीवसृष्टीमधील श्रेष्ठतम अशी सृजनात्मक प्रक्रिया जेव्हा घडली तेव्हाच मनुष्य निर्मिती झाली. मानवाचा विकास ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यामध्ये मानवाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने येणाऱ्या सर्व प्रक्रियांचा अंतर्भाव होतो. विकास प्रक्रियेवर आंतरिक तसेच बाह्य घटकांचा प्रभाव पडत असतो. बालवयात शारीरिक व मानसिक क्षमतांच्या स्वरूपात क्रमिक परिवर्तन होतात त्याला विकास म्हणता येईल. अशा प्रकारे मानवाच्या सर्वांगीण विकासाचे व विविध अवस्थेतील परिवर्तनाचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करणारे शास्त्र हे मानव विकासशास्त्र होय असे म्हणण्यास हरकत नाही.

    Manav Vikas V Shaskiya Karyakram

    Rs.525.00
    Add to cart
  • मूलभूत अर्थशास्त्र

    मूलभूत अर्थशास्त्र

    अर्थशास्त्र हे एक गतिमान शास्त्र आहे. काळाबरोबर त्याचे स्वरूप आणि व्याप्ती बदलत गेली. अर्थशास्त्र हे एक मानवी जीवनाशी निगडीत अशा आर्थिक व्यवहारांचे अध्ययन करणारे एक सामाजिक शास्त्र आहे. मानवी जीवनात धन किंवा संपत्तीला अनन्य साधारण महत्त्व अहे. विकासाबरोबर मानवाच्या गरजांचे स्वरुप बदलत गेले आणि व्याप्ती विस्तारत गेली. गरजांची अमर्यादितता आणि साधनांची मर्यादितता व पर्यायी वापराची शक्यता यामुळे मानवासमोर अनेक आर्थिक प्रश्न निर्माण होत आहेत. त्या प्रश्नांची मानवाला आपल्या पातळीवर सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. प्रश्नांची सोडवणूक करताना वर्तमान काळाबरोबर भविष्यकालीन विकासाचाही त्याला विचार करावा लागतो. आर्थिक क्रियातून धन किंवा संपत्तीची प्राप्ती, त्यातून स्वत:च्या आणि इतरांच्या कल्याणात वाढ, दुर्मिळ अशा साधनसामग्रीचा वापर करून जास्तीत जास्त वस्तू व सेवांचे उत्पादन आणि जास्तीत जास्त गरजांची पुर्तता, अर्थव्यवस्थेचा विकास आणि वृद्धी इत्यादींशी संबंधीत बाबींचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. सदर पुस्तकात सतत विकास, समावेशक विकास, मानव विकास निर्देशांक, दशलक्ष विकास लक्ष्य, विकास व्यूहरचनेसाठी औद्योगिकीकरण की कृषी, बाजार की सरकार, चलन निचलनीकरण, रोख विरहित व्यवहार, देणी देण्याच्या आणि त्यांचा निपटारा करण्याच्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक पद्धती या मुद्द्यांचा समावेश केला आहे.

    Mulbhut Arthashastra

    Rs.375.00
    Add to cart