Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मराठी

भक्तीने भगवंताजवळ

 • ISBN: 9789394403642
 • Bhaktine Bhagwantajawal
 • Published : April 2022
 • Book Language : Marathi
 • Edition : First
 • Format : Paperback
 • Pages : 210
 • Category:
 • Download Book Ebook Link

Rs.275.00

आयुष्यात तुम्ही काहीही निवडलत तरी त्याबरोबर अंगभूत सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी येतातच. काटे नसलेला गुलाब शोधायला जाणे म्हणजे वेडेपणाच. नाण्याची एक बाजू तुम्ही निवडावी कि दुसरी बाजू, तुमच्या वाट्याला येतेच. कष्टविरहीत सुखासीन आयुष्याची अपेक्षा करूच नका. अगदी महात्म्यांनासुद्धा विपदाविरहीत सुखाचं आयुष्य लाभत नाही. असं आयुष्य असुच शकत नाही. महत्त्वाकांक्षा जेवढी मोठी तितके प्रश्नाचे डोंगर मोठे. तुम्हाला फक्त चालायचे असेल तर फारसे प्रश्न येत नाहीतच. जेव्हा तुम्ही तुमच्या सुप्त क्षमतांना साजेसं जगण्याचं आव्हान स्विकारता तेव्हा तुम्हाला अधिक आणि मोठे प्रश्न सोडवायला लागतात. काठीचं एक टोक उचलले कि दुसरे टोक आपोआप उचलले जाते. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. शिखराकडे जाण्याचा रस्ता सोपा नसतो. आणि शिखर ज्याने गाठलं त्यांना ते सोप कधीच गेले नाही.
भगवंत भक्तीशिवाय राहू शकत नाही. भक्ती भगवंताशिवाय राहू शकत नाही. भक्ती केल्यानेच भगवंत आपल्यावर प्रसन्न होतो. आपल्यावर त्यांची कृपा होते. यासाठी प्रत्येक मनुष्याने भगवंताची भक्ती करणे अनिवार्य आहे.त्या योगानेच मनुष्य भगवतस्वरूप होऊन परमेश्वराला प्राप्त होतो.
तुम्हाला जर आयुष्याचे चटके बसले तर लक्षात ठेवा. परमेश्वराची नजर तुमच्यावर खिळलेली आहे. माणसामध्ये एक प्रेषित दडलेला असतो. परमेश्वर मानव बनला तो एवढ्यासाठीच कि मानवाने पुन्हा ईश्वर बनावं. आयुष्य म्हणजे तुम्हाला पोळुन टाकणारी भट्टी नाही, तर तुमचे रूपांतर शुद्धतम चांदीत होण्यासाठी तुम्हाला झळाळी आणणारी पावक प्रक्रिया होय. ती ‌‘भक्तीने भगवंताजवळ’ या ग्रंथात तुम्हाला दिसेल. हा ग्रंथ एक उपहार आहे.

Bhaktine Bhagwantajawal

 1. गुरूचे अस्तित्व
 2. ईश स्तवन
 3. उपहार
 4. भक्ती
 5. संत श्री जगन्नाथ महाराज
 6. संत श्री ज्ञानेश्वर महाराज
 7. संत श्री तुकाराम महाराज
 8. संत श्री एकनाथ महाराज
 9. संत श्री नामदेव महाराज
 10. संत श्री गोरा कुुंभार
 11. संत मिराबाई
 12. तुझ्या कोणत्या स्वरूपाचे ध्यान करावे?
 13. भुमिका
 14. हे खरे कि ते खरे?
 15. प्रभूचा अर्थ
 16. भक्तीचे प्रकार
 17. पुरूषाच्या कल्याणाचे मार्ग
 18. साधकाने भक्तीत मग्न राहण्यासाठी काय करावे?
 19. शब्दपुष्प
 20. भगवंताच्या कथेचे माहात्म्य
 21. मोक्षप्राप्तीस कारण होणारे आत्मदर्शन रूप-ज्ञान
 22. जीवाची संसारातील स्थिती
 23. शुद्ध चैतन्यामुळे वासनाधिन आणि जन्ममृत्युचा फेरा
 24. जीवाच्या संगतीने परमार्थ कसा दुरावतो?
 25. भक्ती न करण्याने होणारे अन्य तोटे
 26. भक्ती न करण्याने पुष्कळ दु:ख भोगावे लागेल
 27. संसाररूपी वृक्षाचे सर्वांग
 28. पुजा किंवा साधनेमध्ये अंतर
 29. दुर्वास ऋषी कथा
 30. कालब्रह्मच्या साधनेने होणारे लाभ
 31. मार्कण्डेय ऋषी आणि उर्वशी कथा
 32. भक्तिने भगवंतापर्यंत कसे पोहोचाल?
 33. वासुदेवाची परिभाषा
 34. आध्यात्मिक शंका समाधान
 35. सृष्टी रचना (सूक्ष्मवेदाच्या निष्कर्षाने सृष्टी रचनेचे वर्णन)
 36. आत्मे काळाच्या जाळ््यामध्ये कसे अडकले?
 37. ब्रह्मा, विष्णु व महेश यांचे माता-पिता कोण?
 38. ब्रह्म (काल) ची अव्यक्त राहण्याची प्रतिज्ञा
 39. ब्रह्माचे आईवडीलांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न
 40. माता दुर्गेद्वारे ब्रह्मास शाप देणे
 41. विष्णूचे पित्याच्या प्राप्तीसाठी प्रस्थान
 42. परब्रह्माच्या सात संख ब्रह्मांडाची स्थापना
 43. पवित्र अथर्ववेदामध्ये सृष्टि रचनेचे प्रमाण
 44. पवित्र श्रीमद्देवी महापुराणात सृष्टी रचनेचे प्रमाण
 45. पवित्र शिवमहापुराणामध्ये सृष्टी रचनेचे प्रमाण (काल ब्रह्म व दुर्गापासुन विष्णु, ब्रह्मा व शंकराची उत्पत्ती)
 46. पवित्र श्रीमद्भगवत गीतेमध्ये सृष्टी रचनेचे प्रमाण
 47. भक्ति मर्यादा
 48. देवाची पुजा कशी करावी?
 49. जाता जाता…

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भक्तीने भगवंताजवळ”
Shopping cart