Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

साहित्य समीक्षा

प्राक्कथन : आंबेडकरी साहित्यवेध

Rs.225.00

डॉ. अशोक नामदेव पळवेकर यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या साहित्य-प्रकारांतील साहित्यकृतींना लिहिलेल्या निवडक प्रस्तावना एकत्रित करून हा समीक्षाग्रंथ सिद्ध झालेला आहे. या ग्रंथात ‌‘काव्य’ या साहित्यप्रकारातील साहित्यकृतींना लिहिलेल्या अधिकांश प्रस्तावना असून हे सर्व लेखन म्हणजे प्रस्तावनांचे एक ‌‘मॉडेल’ आहे.
प्रस्तुत ग्रंथातील सुसूत्र अशा साहित्यविषयक विवेचनात
डॉ. पळवेकरांनी समाज आणि साहित्याची प्रकृती व प्रयोजन यांच्यातील अन्योन्य सहसंबंध अगत्याने राखला आहे. त्यांचे समाज आणि साहित्यविषयक सैद्धान्तिक चिंतन अत्यंत मूलगामी स्वरूपाचे असून एखाद्या विवक्षित साहित्यकृतीच्या अंगाने प्रकट झालेला त्यांचा साहित्यविचार मराठी समीक्षादृष्टीला समृद्ध करणारा आहे.
डॉ. पळवेकरांच्या या मौलिक चिंतनातून आंबेडकरवादाला अपेक्षित असलेले समाज, साहित्य आणि सामाजिक चळवळीच्या अन्योन्य सहसंबंधाचे नवे मूल्यभान अत्यंत प्रगल्भपणे अभिव्यक्त झाले आहे. हे मूल्यचिंतन, हे मूल्यभान समकालीन पिढीला बुद्ध-फुले-मार्क्स-आंबेडकर यांच्या सैद्धान्तिक विचाराच्या सामाजिक-राजकीय आणि साहित्यविषयक चळवळींची कृतिशीलता गतिमान करण्यासाठी निश्चितच नवदृष्टीची प्रखर ऊर्जा प्रदान करणारे आहे.

Prakkathan : Ambedkari Sahityavedh

 1. सूर्यफूल आणि काळोख : आंबेडकरी अस्तित्ववादाच्या सूर्यबळाची कविता
 2. वज्रनाद : अस्वस्थ आभाळमनातील विजांचे अंतरंग मांडणारी कविता
 3. युद्धयात्रा : युगाच्या काळजाचा ठाव घेणारी गझल
 4. यापुढे माझी लढाई : झोत
 5. निवडुंगाला आलेली फुलं : बदलत्या जगाच्या नकाशाविषयी
 6. उजेडवाटा : उजेडयात्रिकाच्या पावलांची मनोगते मांडणारी कविता
 7. केंद्र हरवत चाललेल्या वर्तुळाचा परिघ : मराठी कवितेतील वेगळेपणाची अभिव्यक्ती!
 8. युद्धपोत : संघर्षाची वज्रलिपी!
 9. कॅक्टससल : समकालीन वेदनेचा उच्चार
 10. इत्यर्थ : प्रत्ययकारी अनुभवांचे वास्तव चित्रण करणारी कथा
 11. आंबेडकरी जाणिवांचा अक्षरप्रकाश : आस्वादक समीक्षेची वेधक निरीक्षणे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्राक्कथन : आंबेडकरी साहित्यवेध”
Shopping cart