Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

साहित्य समीक्षा

व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘वावटळ’ आणि ‘करूणाष्टक’ कादंबरीची समीक्षा

Rs.165.00

व्यंकटेश माडगूळकर हे मराठी साहित्यातलं एक अस्सल देणं आहे. ज्या बारकाव्यानिशी त्यांनी मराठी साहित्यात माणदेशचा प्रांत उभा केला त्याच नजरेतून त्यांनी तिथला निसर्ग, प्राणी, पक्षी आणि माणसाचे दैनंदिन व्यवहार टिपले. प्रसंगानुरूप व्यक्तिचित्रणातून तिथल्या साध्या, कणखर, प्रेमळ माणसांना शब्दात मांडले.
‘वावटळ’ मधून महात्मा गांधीच्या खुनानंतर जी परिस्थिती शहरांसह खेडोपाडी उद्भवली त्याचे चित्रण माडगूळकर करतात तर ‘करूणाष्टक’ या कादंबरीतून मातृप्रेमाची अव्याहत चालणारी धडपड आपल्या दृष्टिस पडते. त्यामुळे प्रादेशिक ग्रामीण कादंबर्‍या म्हणून आजही त्या तितक्याच मौलिक वाटतात. हेच खरे तर माडगूळकरांच्या कादंबर्‍याचे यश म्हणावे लागले.

– डॉ. रवी केवट

Vyanktesh Madgulkaranchya Vavatal aani Karunashtak Kandambarichi Samiksha

  1. मराठी कादंबरीची वाटचाल आणि व्यंकटेश माडगूळकरांच्या कादंबर्‍या
  2. व्यंकटेश माडगूळकरांच्या व्यक्तिमत्वाची जडण-घडण
  3. ‘वावटळ’ व ‘करूणाष्टक’ कादंबरीतील नायक-खलनायक
  4. ‘वावटळ’ व ‘करूणाष्टक’ कादंबरीतील निसर्ग व पात्रे
  5. ‘वावटळ’ व ‘करूणाष्टक’ कादंबरीतील संघर्षाचे स्वरूप
  6. ‘वावटळ’ व ‘करूणाष्टक’ कादंबरीतील भाषाशैली
  7. समारोप

परिशिष्ट 1 : व्यंकटेश माडगूळकर यांची साहित्यसंपदा
परिशिष्ट 2 : संदर्भ ग्रंथसूची

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘वावटळ’ आणि ‘करूणाष्टक’ कादंबरीची समीक्षा”
Shopping cart