Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

विचार आणि विचारवंत

भारतीयांच्या हृदयातले सरदार वल्लभभाई पटेल

Rs.399.00

वयाच्या तब्बल चाळीस वर्षापर्यंत स्वातंत्र्यलढ्यापासून अलिप्त राहिलेल्या सरदारांनी स्वातंत्र्यलढ्यात प्रवेश केल्यावर त्यास मिळालेली ऊर्जा, गती, दिशा व अनुषंगाने बदललेली लढ्याची सर्वसमावेशक दशा याचे समग्र, सादयंत शब्दचित्रण लेखिकेने प्रभावीपणे, समर्थपणे चित्तारले आहे.

महात्माजींच्या अहिंसेचा सार्थ अर्थ आणि हेतू सरदारांमुळे सिद्ध होतो. शारीरिक मानसिकदृष्ट्या समर्थ असूनही अहिंसेने ‘लढा देऊन’ संघटनशक्तीने विघटनशक्तीचे उच्चाटन करण्याचा पराक्रम ‘सरदारच’ करू जाणे या सर्वांचा शब्दवेल्हाळ परिचय करण्यात लेखिका यशस्वी झालेली आहे.

‘अहिंसेचे जनकत्व’ जसे बापूंकडे जाते तसे भारताच्या अखंडतेचे मातृत्व सरदारांकडे जाते. अखंड, एकसंघ, एकात्म भारतीय संघराज्याच्या निर्माणाचा पुरूषार्थ घडवितांनाच्या घटना, प्रसंग घ्यावे लागलेले कठोर निर्णय याचे समग्र विवेचन परिणामकारकरित्या या पुस्तकात समर्पक व सहज सुलभ शब्दात आपल्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.

भारतीयांच्या हृदयातले ‘सरदार’ वल्लभभाई पटेल हे चरित्र्यपुष्प सरदारांच्या अनेकविध लोकदुर्लभ गुणवैशिष्ट्यांचा अजरामर कस्तुरीसुगंध भारतीय वाचकांपर्यंत खचितच पोहचविणार आहे यात शंका नाही.
या पुस्तकाच्या अनुषंगाने सरदारांवरील मराठी वाङ्मयात नक्कीच भर पडली आहे. सदर पुस्तक हे समस्त भारतीयांना सरदारांच्या विषयी असलेल्या जिज्ञासेला नक्कीच पूर्ण करेल.

Bharatiyancha Hridyatle Sardar Vallabhabhai Patel

  1. सरदारांचा जीवनप्रवास : 1.1 कौटुंबिक पार्श्वभूमी व पूर्वायुष्य (1875 पूर्व ते 1900), 1.2 असामान्य धैर्य आणि बॅरिस्टरची पदवी (1900-1913), 1.3 सरदारांचा अहमदाबाद नगरपालिकेत प्रवेश (1914), 1.4 मोहनदास गांधी : राजकारणाच्या क्षितीजावर नवीन तारा (1915-1917), 1.5 खेडा सत्याग्रह (1917), 1.6 एक न समजलेला अध्याय (1917), 1.7 भारताच्या स्वातंत्र्यात सत्याग्रहाचा मार्ग (1918), 1.8 वल्लभभाईंमधील आमुलाग्र बदल (1919-1921), 1.9 राष्ट्रीय निशाण (झेंडा सत्याग्रह) (1922-23), 1.10 बोरसद (बोरसाड) सत्याग्रह (1923-24), 1.11 बार्डोलीचा सत्याग्रह (1926-1928), 1.12 लाहोर अधिवेशन (1929), 1.13 दांडीयात्रा (मिठाचा सत्याग्रह) (1930)
    1.14 सरदार काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष (1930), 1.15 सरकारची दडपशाही (1931), 1.16 येरवडा तुरूंगात गुरू-शिष्य (1933), 1.17 गांधीजींचा राजकारणातून संन्यास (1934-35), 1.18 सरदार निवडणूक मंडळाचे अध्यक्ष (1934), 1.19 1935 चा नवा कायदा (1935)
  2. एकसंघ भारताचे शिल्पकार (संस्थानांचे विलीनीकरण) : 2.1. स्वातंत्र्यापूर्वी भारतात असलेली संस्थाने, 2.2 संस्थानांच्या विलीनीकरणाची पार्श्वभूमी, 2.3 त्रावणकोर संस्थान (पहिले बंड), 2.4 पहिला संघर्ष पूर्वेकडे : पूर्वेकडील राज्य, 2.5 काश्मिर संस्थान, 2.6 काठियावाड, 2.7 राजस्थान आणि जोधपूर, 2.8 जुनागड संस्थान, 2.9 हैदराबाद संस्थान, 2.10 भोपाळ संस्थान, सरदारांच्या विविध समर्थक भूमिका (फोटो)
  3. एकाच ध्येयाचे सरदारांसोबतचे संघर्षयात्री : 3.1 पार्श्वभूमी, 3.2 वल्लभभाई आणि विठ्ठलभाई, 3.3 सरदार आणि महात्मा गांधीजी, 3.4 सरदार आणि नेताजी, 3.5 सरदार पटेल आणि पंडित नेहरू, परिशिष्ट : 1. सरदारांचे पंडित नेहरूंना पत्र, 2. विठ्ठलभाईंचे मृत्युपत्र, 3. आठवणी; 3.1. माऊंटबॅटन, 3.2. एक आणीबाणीचा क्षण, 3.3. त्र्यं. र. देवगिरीकर यांच्या आठवणी, 3.4. श्री. प्रकाश यांनी डाह्याभाई यांना लिहिलेल्या पत्रात सरदारांविषयीच्या आठवणी, 4. प्र. के. अत्रे यांनी आपल्या आत्मचरित्रात ‘सरदार पटेलांचा कैलासवास’ या शीर्षकाखाली सरदारांविषयी लिहिलेले आहे. (संदर्भ – कर्‍हेचे पाणी, खंड चौथा), 5. फाळणी स्मृती संग्रहालय, 6. एकतेची मूर्ती (स्टॅच्यू ऑफ युनिटी), 7. मानसन्मान

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीयांच्या हृदयातले सरदार वल्लभभाई पटेल”
Shopping cart