Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

तत्वज्ञान / विचार / विचारवंत

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार : शोध आणि बोध

Rs.50.00

क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक असामान्य, अलौकीक तेजस्वी आणि वंदनीय महापुरुष होते.
डॉ. आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षातील ही जयंती आंतरराष्ट्रीय स्तरावर आनंदाचा आणि स्वाभिमानाचा दिवस ठरली. संयुक्त राष्ट्रसंघाने 14 एप्रिल हा दिवस ‘ज्ञानदिवस’ घोषित करुन बाबासाहेबरुपी विचारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देऊन सर्व सदस्य राष्ट्रांना हा जयंती उत्सव साजरा करण्याच्या सूचना दिल्या. जपान, भूतान, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, रोमानिया, डेन्मार्क, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, हंगेरी, दुबई, कजाकीस्तान इत्यादी देशांमध्ये विशेष स्वरुपात डॉ. आंबेडकरांची जयंती मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आल्यामुळे भारताची मान अभिमानाने उंचावली.
डॉ. आंबेडकरांनी सामाजिक समानतेसाठी आयुष्यभर लढा दिला ती समानता आज तरी प्रस्थापित झाली आहे का? या देशात आंबेडकरांना अपेक्षित समानता आजही दिसून येत नाही. या देशात समानता प्रस्थापित करण्याचे आंबेडकरांचे स्वप्न आपण नक्कीच पूर्ण करु शकतो. परंतु त्यासाठी परिवर्तनवादी आंबेडकरी विचार समजून घेऊन प्रत्यक्षात साकार करण्यासाठी कटिबध्द होणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित समानता अद्याप प्रस्थापित झालेली नाही कारण समानता हा फक्त लिहिण्याचा आणि वाचनाचा विषय नसून तो समजून घेऊन कृती करण्याचा विषय आहे.
चला तर मग आजपासून आपण सर्व डॉ. आंबेडकरांचे विचार प्रत्यक्षात साकार करण्यासाठी कटिबद्ध होऊ या! आणि प्रत्यक्षात कृती करू या!
जयभीम… जय भारत…

Dr Babasaheb Ambedkaranche Vichar : Shodha Ani Bodha

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन वृत्तांत : संक्षिप्त
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही पंचसुत्री
  3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय एकात्मता
  4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक नितिमत्ता
  5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू कोडबील
  6. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यापीठविषयक विचार
  7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बॅ. सावरकर
  8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व म. गांधी संघर्ष
  9. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पं. नेहरु
  10. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर : एक दृष्टीक्षेप

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार : शोध आणि बोध”
Shopping cart