Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भाषा विज्ञान / मराठी व्याकरण

भाषा आणि कौशल्य विकास

Rs.125.00

21 व्या शतकात प्रगत कौशल्ये विकसित होत आहेत. तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे आपल्या सर्वांच्या व्यावहारिक जीवनातही दिवसेंदिवस अमूलाग्र बदल होत आहेत. संपूर्ण जीवनच जणू आधुनिक तंत्रज्ञानाने व्यापलेले आहे. असे असताना आपला मराठी विषय आणि भाषा त्यास अपवाद कशी असेल? या जाणिवेने डॉ. संदीप कडू माळी यांच्या अथक प्रयत्नांतून प्रस्तुत ग्रंथ साकारला गेला. वाङ्मयीन मराठीसह काळाची गरज ओळखून महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठे आणि शैक्षणिक परिघामध्ये सध्या व्यावहारिक आणि उपयोजित मराठीचे प्रस्थ वाढलेले आहे, याचे आपण सर्वांनीच स्वागत केले पाहिजे. भाषेच्या संदर्भातील प्रगत कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्यासाठी प्रस्तुत ग्रंथ प्रेरणादायी ठरेल. याशिवाय प्रशासकीय आणि विविध भाषिक कौशल्ये समजून घेण्यासाठी व उपयोजनासाठी विद्यार्थांना आकलन सुलभ होईल अशा पध्दतीने केलेले हे लेखन भाषा आणि कौशल्ये विकासाच्या संदर्भात दिशादर्शक ठरेल, अशी खात्री आहे.

– प्रा. डॉ. संदीप विठ्ठलराव सांगळे

Bhasha Ani Kaushalya Vikas

  1. अर्जलेखन : अर्ज कशासाठी?, अर्ज लिहितांना, अर्ज कसा लिहावा?; अर्जाचे विविध नमुने – विनंती अर्ज, कर्ज मागणी अर्ज, प्रतिज्ञापत्राचा नमुना, परवानगी अर्जाचा नमुना, ना-हरकत दाखला नमुना, नोकरीसाठी अर्ज, रजेचा अर्ज; माहितीच्या अधिकारातील अर्ज, जनमाहिती अधिकारी म्हणजे काय?, जनमाहिती अधिकार्‍याची कर्तव्ये, माहिती अधिकाराच्या अर्जासंबंधी; संगणकीय अर्जलेखन, यूनिकोड प्रणाली
  2. पत्रलेखन : पत्रलेखन म्हणजे काय?, खाजगी पत्र व्यवहार; खाजगी पत्रलेखनाचा नमुना – अनौपचारिक पत्र लेखन – अभिनंदनपर पत्र, अभिप्रायार्थ पत्र, तब्येतीची चौकशी करणारे पत्र; प्रशासनिक पत्रव्यवहार, प्रशासनिक पत्रव्यवहाराचे काही प्रकार – शासकीय पत्र, अर्धशासकीय पत्र, अनौपचारिक संदर्भ, ज्ञापन, पृष्ठांकन, परिपत्रक, कार्यालयीन आदेश, अधिसूचना, तार, प्रसिद्धीपत्रक, शासन निर्णय, सूचना; व्यावसायिक पत्रव्यवहार – मागणी पत्र, स्मरणपत्र; ई-मेल – नमुने
  3. प्रशासनिक मराठी : इतिवृत्त लेखन; सभा – सभेचे आयोजन, सभेची सूचना नमुना; इतिवृत्त – इतिवृत्ताचे प्रकार, इतिवृत्त लेखन, इतिवृत्त लिहिताना घ्यावयाची काळजी, इतिवृत्ताचा नमुना; माहितीपत्रक – माहितीपत्रक म्हणजे काय?, माहितीपत्रके कशी असतात?, माहितीपत्रके कुठे वापरली जातात?, माहितीपत्रक कसे असावे?, नोकरी अथवा रोजगार माहितीपत्रकाचा नमुना; जाहीर निवेदन – नमुना; वाणिज्य व माहिती तंत्रज्ञान विषयक पारिभाषिक संज्ञा
  4. प्रगत भाषिक कौशल्ये : सारांशलेखन – सारांशलेखनाचे शीर्षक देताना, सारांशलेखन करतांना, नमुना; भाषांतर – इंग्लिश-मराठी, भाषांतराचा नमुना; शासनाच्या प्रसिद्धीपत्रकाच्या भाषांतराचा नमुना
  5. जाहिरात लेखन : जाहिरात म्हणजे काय?, जाहिरातींची भाषा, जाहिरातीचा हेतू, सर्जनशीलता; वृत्तपत्रांतील जाहिराती – जाहिरातीचा मसुदा, जाहिरातीचे घटक, वृत्तपत्रातील जाहिरातींचे नमुने; आकाशवाणीवरील जाहिरात – नमुने; दूरचित्रवाणीवरील जाहिराती – दूरचित्रवाणीवर जाहिरात करताना, नमुने

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भाषा आणि कौशल्य विकास”
Shopping cart