Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

ग्रंथालय व माहितीशास्त्र

वाचन संस्कृती आणि प्रेरणा

, ,

Rs.165.00

डॉ. अनिल नानाजी चिकाटे हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक म्हणून कार्यरत असून ग्रंथालय व माहितीशास्त्र या क्षेत्रात तीस वर्षाचा अनुभव आहे. ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयातील आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय नामांकित नियतकालिकेतून 20 संशोधनपर लेख प्रसिद्ध आहेत. तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये 30 संशोधनपर लेख प्रसिद्ध आहेत. मलेशिया, थायलंड, श्रीलंका, शांगाय इत्यादी देशात त्यांनी परिषदामधून लेख प्रस्तुत केलेत. तसेच तीन ग्रंथ देखील प्रकाशित केले आहेत. आतापर्यंत यांच्या मार्गदर्शनातून 12 विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्राप्त झाली आहे. णॠउ व खउडडठ या नामवंत संस्थेचे प्रकल्प पूर्ण केले आहेत. क.ब.चौ. उ.म.वि. जळगाव येथील महात्मा गांधी अभ्यास व संशोधन केंद्र तसेच खान्देश पुराभिलेखागार व संग्रहालयाचे ते प्रमुख आहेत. कला व मानव्यशाखा प्रशाळेचे संचालक म्हणूनही जबाबदारी पार पाडत आहेत. ग्रंथालयशास्त्र विषयातील अनेक संघटनांचे आजिव सदस्य आहेत.

हितेश गोपाल ब्रिजवासी हे खाशाबा अपंग क्रीडा प्रशिक्षण संस्थेचे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जळगाव येथे ग्रंथपाल पदावर कार्यरत आहे. ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या क्षेत्रात कार्यकरण्याचा त्यांचा सात वर्षापेक्षा जास्तीचा अनुभव असून. प्रकाशन क्षेत्रात सुध्दा त्यांची अनेक कार्ये आहे, यात त्यांनी लिहिलेल्या 3 ग्रंथांचा आणि 30 पेक्षा जास्त शोधनिबंधाचा समावेश होतो. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध देखील सादर केले आहे तसेच राष्ट्रीय परिषदेत Research Scientist Award for Best Research Paper या पुरस्काराने देखील त्यांना गौरविण्यात आले आले आहे. वर्तमानपत्रात देखील त्यांचे अनेक लेख सातत्याने प्रकाशित होत असतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोधपत्रीकेच्या संपादक मंडळावर देखील त्यांची निवड करण्यात आली असून विविध मासिक व नियतकालिकांच्या संपादनाचे कार्यसुध्दा त्यांनी केले आहे. ग्रंथालय भारती, नागपूर या संस्थेचे ते जळगाव जिल्ह्याचे सचिव असून या माध्यमातून समाजात वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सतत कार्यरत असतात. यांच्या कार्याबद्दल Smart Librarian या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

डॉ. तुषार मल्हारराव पाटील हे एस. एस. व्ही.पी. एस संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, शिंदखेडा. जि. धुळे येथे कार्यरत असून या क्षेत्रात कार्य करण्याचा त्यांचा एकूण 27 वर्षांचा अनुभव आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेत एकूण 38 पेपर व संपादित केलेल्या पुस्तकात 4 लेख देखील प्रकाशित आहे. अनेक कार्यशाळेत देखील त्यांचा सहभाग आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे ग्रंथालय आणि महितीशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाचे देखील ते सदस्य व विद्यावाचस्पती पदवी साठी मार्गदर्शक म्हणून देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या अनेक समितीचे अध्यक्ष आणि सदस्य म्हणून कार्यरत असून सामाजिक उपक्रमात देखील त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

Vachan Sanskriti Ani Prerana

 1. बदलत्या समाजात ग्रंथालयांची भूमिका – तुषार म. पाटील
 2. ग्रंथालय आणि बदलत्या आधुनिक संसाधनांचा प्रवास: एक दृष्टीक्षेप – हितेश गोपाल ब्रिजवासी, पंकज रमेश देशमुख
 3. मुद्रित आणि अमुद्रित वाचन साहित्य : एक परीचय – अतुल खैरनार
 4. जीवन समृध्दी आणि वाचन – मदन दत्तराव झाडे
 5.  वाचन अभिरुची : एक चिकित्सक अभ्यास – ज्योती शामराव मगर
 6. वाचन : जीवन समृद्धीसाठी एक वरदान – कल्पना आबाराव सिडाम
 7. बदलत्या काळातील वाचनसाहित्य व संसाधने – सागर अंकुशराव भोईटे
 8. ग्रंथ आणि जीवन समृद्धी – श्वेता कुमारसेन सरोदे
 9. वाचन सवयी वाढवण्याचे नवे प्रयोग – सुप्रिया महावीर नवले
 10. वाचन : बदलत्या काळाची गरज – तृप्ती मोहिते
 11. एक पाऊल ‌‘वाचन संस्कृती’ विकासाकडे – व्ही. ए. नाईकवाडी
 12. वाचन, प्रेरणा आणि जीवन समृद्धी – कोमल समिर भावसार
 13. वाचनः समृद्ध जीवनाचा पैलू – पंकज गोरख भदाणे
 14. सुसंस्कृत समाजात वाचनाचे महत्व – रामदास बापू काणे
 15. बदलता काळ आणि वाचन संस्कृती – राशिनकर शंकर वसंत
 16. व्यक्तिमत्व घडविण्यात वाचनाचे महत्व – रवींद्र सखाराम देवरे
 17. वाचन सवयी वाढविण्यात ग्रंथपालाची महत्त्वाची भूमिका – मनीषा स. गावंजे
 18. सोशल मिडीया वाचन संस्कृतीचे नवे पैलू – स्वाती ज्ञानोबाराव सावंत
 19. ग्रंथालय आणि ग्रंथपाल यांचे वाचन संस्कृतीतील योगदान – दीपाली येवले
 20. ग्रंथपालांची भूमिका आणि बदलती वाचन संस्कृती – अर्चना अरुण वणीकर
 21. वाचन आणि बदलता काळ – अभय शिवाजीराव देवरे
 22. सोशल मिडियाचा वाचन संस्कृतीवर झालेला प्रभाव – शेख शबाना एम.
 23. संशोधन कार्यात वाचनाचे महत्त्व – नेत्रा किशोर भट
 24. वाचन : व्यक्ती विकासातील महत्वाचा घटक – गोपाल राजाराम पाटील, ताराचंद पाटील
 25. वाचनातून विकास – मंजुषा अहिरराव, डॉ. हेमंत येवले
 26. वाचन पद्धती आणि फायदे – सुचेता चंदनशिवे, अतुल चंदनवनंदन
 27. मुद्रित आणि अमुद्रित वाचन साहित्याचा अभ्यास – शुभांगिनी योगेश आकोटकर
 28. जीवन उन्नत करण्याचा बीजमंत्र म्हणजे वाचन – वैशाली किशोर पाटील
 29. वाचन सवयी आणि ग्रंथालयाची भूमिका – मनिषा निमराज जाधव, डॉ. अनिल चिकाटे
 30. ग्रंथांना वाचक मिळवून देण्यात ग्रंथालय आणि ग्रंथपालांची भूमिका – माधवी द. वाईगडे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वाचन संस्कृती आणि प्रेरणा”
Shopping cart