Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

संरक्षणशास्त्र

युद्ध आणि शांती (1945 पासून इतिहास)

War and Peace

, ,

Rs.250.00

युद्धप्रवृत्ती सर्व प्राणीमात्रात निसर्गतःच जोपासली गेली आहे. आदिमानवापासून आतापर्यंत उत्क्रांतीमुळे बदलत्या मानवी जीवनातील युद्धाचे स्थान कधीही ढळले नाही; महत्व कमी झालेले नाही. मानवी सभ्यता आणि संस्कृतीचा विकास युद्धाशी संबंधित आहे. समाजाचे अस्तित्व आणि विकास युद्धामुळेच नियंत्रित होत आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर उदयास आलेल्या अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन्ही महाशक्तींनी आपआपले अस्तित्व जोपासण्याचा प्रयत्न केला. दोन्ही महाशक्तींमध्ये संघर्ष तेवत राहिला तरी त्याचे रूपांतर प्रत्यक्ष युद्धात न होता शीतयुद्धात झाले. जागतिक राजकारणात अनेक स्थित्यंतरे दुसर्‍या महायुद्धानंतर झालीत.
महायुद्धानंतर सर्व देशात जागतिक स्तरावर, आर्थिक, सामाजिक, राजकीय व लष्करीशक्तीची नवीन मांडणी पुढे आली. त्या परिस्थितीत स्थानिक संघर्षानेही जोम धरला. शीतयुद्ध समाप्तीच्या उंबरठ्यावर असताना राजकीय घडामोडींना गतीमानता आली. महासत्तेचे केंद्र असलेल्या आशियाई खंडातील चीन, रशिया, भारत, जपान याच बरोबर इराणचे सत्ता वर्चस्व वाढीस लागले.
प्रस्तुत पुस्तकात युद्ध संकल्पना, युद्धाची कारणे, युद्ध प्रकार, अणुयुद्ध, रासायनिक व जैविक युद्ध, जागतिक पुनर्रचनेची निर्मिती, शीत युद्ध, युद्ध आणि अर्थव्यवस्था, आधुनिक युद्ध सामरिकी, विविध करार, संघटना, सत्ता संतुलन, अलिप्ततावादी चळवळ वगैरे मुद्द्यांचा सर्वंकष विचारविमर्श केलेला आहे.

Yudha and Shanti

  1. युद्ध संकल्पना : संकल्पना आणि युद्धाची व्याख्या. युद्धाची कारणे – राजकीय, आर्थिक, सामाजिक, मानसशास्त्रीय, लष्करी आणि अन्य. युद्ध प्रकार : सर्वंकष, मर्यादित, क्रांतीकारी, पारंपारिक, वैशिष्ट्यपूर्ण युद्ध-पर्वत, वाळवंट आणि जंगल. युद्ध हे राष्ट्रीय धोरणाचे उपकरण. अणुयुद्ध : विकास व सामरिकी. रासायनिक व जैविक युद्ध.
  2. युद्ध उपयुक्तता : दुसर्‍या महायुद्धानंतर जागतिक पुनर्रचनेची निर्मिती. शीत युद्ध (संक्षिप्त इतिहास) पहिल्या व दुसर्‍या महायुद्धाची कारणे व वैशिष्ट्ये. युद्ध आणि अर्थव्यवस्था : साधन-संपत्ती निर्मितीचे प्रश्न, भारताचे संरक्षण अंदाजपत्रक, शस्त्रास्त्रे पुरवठा आणि व्यापार. युद्ध आणि मानसशास्त्र : सशस्त्र सेनेतील मानसशास्त्राचे कार्य आणि महत्व. युद्धपद्धती : प्रचार, अफवा आणि बुद्धी भ्रंश.
  3. आधुनिक युद्ध सामरिकी : लिडीलहार्टर्च शांततेचे 8 आधारस्तंभ. वादविवादाचे व्यवस्थापन- प्रशांत आणि योग्यपद्धती. सशस्त्र संघर्ष निवारणाचे कायदेशीर मुद्दे. शस्त्र नियंत्रण आणि नि:शस्त्रीकरण : नि:शस्त्रीकरणाचे मार्ग आणि संकल्पना. अण्वस्त्र प्रसार बंदी. अण्वस्त्र चाचणी बंदीकरार.
  4. सामुहिक संरक्षण : युनाची रचना, सुरक्षामंडळाचे कार्य. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचे व्यवस्थापन. सत्ता संतुलन. सामुहिक सुरक्षा आणि सामुहिक संरक्षण. अलिप्ततावादी चळवळ, ध्येय, शांततेचे मार्ग, तत्व, चर्चासत्र – आजच्या युगातील मुल्यमापन.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “युद्ध आणि शांती (1945 पासून इतिहास)”
Shopping cart