Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

संरक्षणशास्त्र

भारताची संरक्षण संघटना आणि राष्ट्रीय सुरक्षितता

Defence Organisation and National Security of India

Rs.350.00

1947 मध्ये परकीयांचे जोखंड दूर करून भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर काही समस्या निर्माण झाल्या त्या दूर करण्याच्या हेतूने भारताने प्रयत्न करायला सुरूवात केली. भारताच्या उत्तरेला चीन, पश्चिमेला पाकिस्तान, पूर्वेच्या अंतर्गत भागात असलेला बांगला देश व बाहय भागात असलेला म्यानमार या सर्वच देशाबरोबरचे भारताचे संबंध म्हणावे तेवढे चांगले नाहीत त्याचप्रमाणे भारताच्या तिन्ही बाजूला सागरी संपदा लाभलेली आहे. आजच्या परिस्थितीमध्ये राष्ट्राची सुरक्षितता हा प्रश्न राष्ट्रीय जीवनाशी अविभाज्य घटक बनला आहे. राष्ट्राच्या राष्ट्रीय सुरक्षिततेचा ज्यावेळी आपण विचार करतो, त्यावेळी सर्वप्रथम आपल्यासमोर संबंधीत राष्ट्राचे राष्ट्रीय हित येते. राष्ट्रीय हिताच्या पर्यायाने राष्ट्रीय सुरक्षिततेच्या संरक्षणाची जबाबदारी फक्त सशस्त्र सेनेवरच नाही तर देशातील सर्व कर्तव्यदक्ष आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांची सुद्धा आहे.कोणत्याही देशाची राष्ट्रीय सुरक्षितता किंवा सुरक्षा संबंधित देशाच्या सामाजिक व आर्थिक घटकावर ही अवलंबून असते.

सदर पुस्तकात 1947 नंतरचे भारतीय सशस्त्र दलांचे पुनर्निर्माण, भारतीय उच्चस्तरीय संरक्षण संघटना, सशस्त्र दलाची संरक्षण यंत्रणा/यांत्रीकीकरण, गुप्तचर संघटना, सुरक्षेपुढील पारंपरिक व अपारंपरिक आव्हाने, हिंदी महासागराविषयीचे भारताचे धोरण वगैरे विविध मुद्दयांचा उहापोह केलेला आहे.

Bharatachi Sanrkshan Sanghatna Aani Rashtriya Surkshitta

  1. 1947 नंतरचे भारतीय सशस्त्र दलांचे पुनर्निर्माण : 1.1 लष्करी संघटना आणि प्रशासनाची तत्वे, 1.2 भारतीय भूसेनेची पुनर्रंचना किंवा विकास आढावा (1947 पासून), 1.3 भारतीय हवाईसेना पुनर्रंचना किंवा विकास आढावा (1947 पासून), 1.4 भारतीय नौसेनेची पुनर्रंचना किंवा विकास आढावा (1947 पासून), 1.5 अर्धसैनिक/पॅरामिलिटरी किंवा संरक्षणाच्या दुय्यम संघटनेची भूमिका
  2. भारतीय उच्चस्तरीय संरक्षण संघटना : 2.1 राष्ट्रपतीचे सैन्यदलासंबंधी अधिकार, 2.2 संसद आणि सशस्त्र सेना, 2.3 संसदीय संरक्षण स्थायी समिती/केंद्रिय मंत्रीमंडळाची संरक्षण समिती, 2.4 राष्ट्रीय सुरक्षा समिती (एनएससी)
  3. भारतीय सशस्त्र दलाची संरक्षण यंत्रणा/यांत्रीकीकरण : 3.1 चीफ ऑफ स्टाफ कमिटी किंवा सेनाध्यक्ष समिती, 3.2 भूसेना, नौसेना व हवाईसेना प्रमुख कार्यालयाची रचना व संघटना, 3.3 भूसेना, नौसेना व हवाईसेना कमांड कार्यालयाची रचना व संघटना, 3.4 जॉईट किंवा संयुक्त कमांड किंवा अंदमान निकोबार कमांड, 3.5 न्युक्लिअर किंवा आण्विक कमांड अथॉरिटी
  4. भारतीय गुप्तचर संघटना : 4.1 परिचय आणि इतिहास, 4.2 इंटेलिजन्स ब्युरो (आयबी), 4.3 संशोधन आणि विश्लेषण विंग (रॉ), 4.4 मिलिटरी इंटेलिजन्स
  5. राष्ट्रीय सुरक्षेचा अर्थ आणि संकल्पना : 5.1 परिभाषा किंवा व्याख्या, महत्त्व आणि व्याप्ती, 5.2 सामुहिक आणि प्रादेशिक सुरक्षा, 5.3 सामाजिक-सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय परिमाण, 5.4 भारतीय भूसीमेचे सविस्तर विवेचन
  6. भारतीय सुरक्षेपुढील आव्हाने : 6.1 भारतीय सुरक्षेपुढील अंतर्गत आव्हाने, अ) दहशतवाद व प्रतिदहशतवाद, ब) नक्षलवाद व फुटीरतावादी चळवळ, क) विप्लव व प्रतिविप्लव, ड) काश्मीर : अंतर्गत सुरक्षा समस्या, 6.2 भारतीय सुरक्षेपुढील बर्हिगत आव्हाने
  7. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसमोरील अपारंपरिक आव्हाने : 7.1 अपारंपरिक आव्हाने म्हणजे काय?, 7.2 पाणी, 7.3 ऊर्जा, 7.4 अन्न सुरक्षा किंवा अन्न समस्या, 7.5 पर्यावरण, 7.6 संगणक किंवा सायबर गुन्हे, 7.7 अमली पदार्थ्यांची तस्करी किंवा मादक पदार्थाचा व्यापार
  8. हिंदी महासागराविषयीचे भारताचे धोरण : 8.1 हिंदी महासागराचे भौगोलिक व सामरिक महत्त्व, 8.2 भारताची समुद्री सुरक्षा, 8.3 हिंदी महासागरातील भारताची सामरिक भूमिका

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारताची संरक्षण संघटना आणि राष्ट्रीय सुरक्षितता”
Shopping cart